डिजिटल क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानात सतत बदल होत आहेत. आज खरेदी केलेला मोबाईल, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉडेम, सर्वर इत्यादी उपकरनं पुढील दोन वर्ष आपल्या उपयोगात राहतीलचं याची शास्वती नसते. सॉफ्टवेअर सतत अपडेट होत असतात. जुनं हार्डवेअर नवीन सॉफ्टवेअरला अपूरं पडतं. नवीन सॉफ्टवेअरला जास्त मेमरी स्टोरेज लागतं. मग नाईलाजाने लगेच हार्डवेअर अपडेट करावं लागतं. मेमरी वाढवावी लागते. उद्योजकाला प्रवाहानुसार 'अपडेट' व्हावं लागतं कारण स्पर्धेतून मागे पडून 'आउटडेट' होण्याची भिती असते. प्रसंगी जुनं हार्डवेअर बदलून नवीन खरेदी करावं लागतं.
असं वारंवार उपकरण बदलाव लागत असेल तर येत्या काळात किती डिजिटल कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट (इ-वेस्ट) निर्माण होईल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वाढत्या डिजिटल तंत्रज्ञान आणि 5G इंटरनेटमुळे येणाऱ्या काळात सर्व उद्योगात आर्टिफिशियल इंटलीजन्स, आयओटी, रोबोटीक्स शिरकाव करणार आहेत. त्यामुळे नवनवीन उपकरणे वापरात येतील. याच कारणाने इ-वेस्ट वाढून पृथ्वीवरील पर्यावरण दूषित होऊन वनस्पती आणि प्राणिमात्रांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. याच कारणामुळे सर्व आशियाई राष्ट्र आता ई-वेस्ट कमी करण्यासाठी 'सरकुलर इकॉनॉमि' वर भर देत आहेत. ज्यामध्ये कमीत कमी पर्यावरणाची हानी करणारे उपकरण तयार करने, उपकरण लिजवर देणे, उपकरणाची दुरुस्ती देखभाल करुन त्याला पुनर्वापर (रि्युज) करने याचा समावे्श आहे.
पूर्वी गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगार खरेदीदारच्या हातगाडीवार वृतमाणपत्राची, वह्या मासिकाची रद्दी नजरेस पडायची. हल्ली जुना टिव्ही, मॉनिटर, सीपीयू, माउस, मोडेम, फ्रिज, बॅटरी, मिक्सर नजरेस पडतात. शहरात घरोघरी ई-वेस्ट निघत असल्यामुळे शहरातील घनकचऱ्यात सुद्धा ई-वेस्ट वाढत आहे. हा खरेदी केलेला इ-वेस्टचं योग्यप्रकारे रिसायकल करणे किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावने आवश्यक असते. घरगुती कचऱ्यात गेलेल्या ई-वेस्ट वस्तूचं योग्यप्रकारे विल्हेवाट होतंच असते असं नाही. बराच इ-वेस्ट मातीत किंवा पाण्यात मिसळत असतं. इ-वेस्ट जेंव्हा माती किंवा पाण्याच्या संपर्कात येतं तेंव्हा त्यातील विषारी घटक पाण्यात मिसळून ते पर्यावरणातील वनस्पती आणि प्राण्यासाठी खूप धोकादायक ठरतात. अशा पाण्यामुळे पचनसंस्थेचे, फुफुसाचे, मेंदूविकाराचे आजार होण्याचा धोका वाढतो. वाढत्या तंत्रज्ञानाचा मानवजात आणि पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. पर्यावरण आणि इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट (ई-वेस्ट) संबंधी शासनाच्या काही पॉलिसी आहेत त्यानुसार पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वेस्टच प्रमाण नियंत्रित करण्याचा तरतुदी आहेत. नादुरुस्त उपकरनं लगेच कालबाह्य न करता दुरुस्त करुन जेंव्हा आपण वापरतो तेंव्हा अप्रत्यक्षपने आपण इ-वेस्ट कमी करत असतो.
हेच कारण कि येणाऱ्या काळात 'दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रा' ला चांगले दिवस येणार आहेत. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकाकडे यंत्र आणि कॉम्पुटर लॅब उपकरणाच्या दुरुस्ती आणि देखरेखीसाठी खास 'मेंटेन्स विभाग' असतो. उपकरणाची नियमित देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर असते. मध्यम किंवा छोटया उद्योजकाकडे असा विभाग नसतो. अशी दुरुस्ती आणि देखरखीची कामे ते फ्रि लांसरना 'आऊट सोर्स' करत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात डिजिटल उपकरण दुरुस्ती आणि ग्राहक सेवा क्षेत्राला प्रचंड मागणी असणार आहे. दुसरी बाब अशी कि ग्राहक कोणतंही तांत्रिक उपकरण खरेदी करण्यापूर्वी ब्रँडचं विक्री नंतरच्या सेवेची खात्री करुन घेत असतो. कारण विक्रीनंतर ऐनवेळी लागणारी सेवा त्वरित मिळाली नाही तर प्रोसेस खोळंबून मोठं नुकसान होणार असतं. त्यामुळे मागील काही वर्षात कस्टमर केअर सेंटर मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हल्ली खरेदीदार गुगलवरील रिविव्ह बघूनच खरेदी करत असतात. त्यामुळे एखादा असंतुष्ट ग्राहक कंपन्याचं नुकसान करू शकतं. काळात ग्राहक त्यासाठी गुगलवर रिव्हीयू बघत असतात. ग्राहक तुमच्या सेवेमूळे संतुष्ट नसेल तर तो गुगल किंवा शॉपिंग साईटवर त्याची प्रतिक्रिया नोंदवेल. वाईट किंवा नकारात्मक रेव्हिवमूळे उपकरणाच्या विक्रीत मोठी घट होते. त्यामुळे त्वरित सेवा देण्यासाठी कंपन्याना स्वतःच विक्री पश्चात सेवा (आफ्टर-सेल-सर्विस) विभाग असने आवश्यक आहे.
रिफर्बीशड उपकरणाची वाढती मागणी :
पूर्वी कोणतंही उपकरण ग्राहक नवीनच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असायचा. ती एक दीर्घाकालीन गुंतवणूक असल्यामुळे आणि तांत्रिक बिघाडीचा मनस्ताप टाळण्यासाठी ग्राहकांची शक्यतो ते उपकरण किंवा यंत्र 'नवीनच घ्यायचं' अशी मानसिकता असायची. त्या नवीन उपकरनाशी भावना जुळलेल्या असायच्या. जुनं किंवा वापरलेलं यंत्र(यूजड, सेकण्ड हॅन्ड ) उपकरण सहसा कुणी खरेदी करत नसे. आता ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. रिफरबीशडं उपकरन उपयुक्त असून सर्व गरजा भागवत असेल तर वाजवी किमतीत का खरेदी करायचं नाही? असा विचार नवीन पिढी करत असते. तेंव्हा वारंवार नवीन उपकरण खरेदी करने टाळून ते रिफरबीशडं खरेदी करतात. कोरोनाच्या महामारीत वेतन कपात, आर्थिक तंगी आणि सर्व व्यवसाय ऑनलाईन झाल्यामूळे कॉम्पुटर व मोबाईलची मागणी खुपचं वाढली होती. त्या तंगीत नवीन खरेदी शक्य नव्हती. याचं कारनामुळे रिफर्बीशड उपकरनाच्या मागणीत खुप वाढ झाली. आज फक्त कॉम्पुटर, प्रिंटर मोबाईल नाही तर इंडस्ट्रियल गॅझेट्स, प्रिंटिंग, बांधकाम, वैद्यकीय, शेतीसंबंधीत अशा सर्वच क्षेत्रातील यंत्र-उपकरनाच्या रिफर्बीशडचं मार्केट वाढलं आहे. रीयुज व रीसायकलिंग वस्तूच्या खरेदीविक्रीत मोठी उलाढाल होऊन 'सरकुलर इकॉनॉमि' ला चालना मिळाली आहे. अशियाई राष्ट्रात 'सरकुलर इकॉनॉमी'चा उद्योगाचा आलेख चढताचं आहे. पृथ्वीच्या पर्यावरणाला इ-वेस्टचा मोठा धोका आहे. हा धोका लक्षात घेवून भारताने रिफर्बीशडवर आधारित सरकुलर इकॉनॉमिला एक प्रकारची चालणाचं दिली आहे. कॉम्पुटर व मोबाईलसारख्या डिजिटल उपकरणाचा रिफर्बीशडमध्ये मोठा वाटा आहे. या उद्योगात जुने उपकरण खरेदी करुन त्यातील तांत्रिक दोष दूर करुन नेमलेल्या डीलर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नवीन वस्तूच्या किमतीच्या ५०-७०% स्वस्त किमतीत ते सर्रास विकले जातात. पुढील वर्षापर्यंत भारतीय मार्केट 2X म्हणजे दुपटीने वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. इंटरनेटचा वाढता वापर 4G, 5G स्पीड मूळे येणाऱ्या काळात डिजिटल उपकरणाची खरेदी निश्चित वाढणार आहे. वाऱ्याची दिशा बघून आता आंतर्देशीय कंपन्यानी या क्षेत्रात उतरल्या आहेत. वॉरंटी, उत्तम ग्राहक सेवा व विक्री किमतीमध्ये स्पर्धा करुन त्या रिफर्बीशडमध्ये मोठी उलाढाल करत आहेत. त्यामुळे उपकरणाच्या दुरुस्ती आणि देखभाल व्यवसायातसुद्धा खूप वाढ होणार आहे.
गरज आहे पर्यावरण रक्षणाची, इ-वेस्ट कमी करण्याची, इ-वेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून पृथ्वीच्या पर्यावरणाला दूषित होण्यापासून वाचविण्याची.
©प्रेम जैस्वाल, छ. संभाजीनगर
९८२२१०८७७५
No comments:
Post a Comment