ad1

Friday, 22 November 2019




डॉक्टर तुम्हीसुद्धा..


मुंबईच्या प्रसिद्ध केईएम इस्पितळात घडलेली 29 वर्षीय डॉ. प्रणय जैस्वालची आत्महत्या मनाला चटका लावून गेली. एखादया आत्महत्येची वार्ता आपण वृत्तमानपत्रात
मध्ये वाचतो तेंव्हा ती फक्त एक बातमी असते, पण जेव्हा निघून गेलेली व्यक्ती उच्चशिक्षित,  उंच शिखरावर पोहचली असते तेंव्हा त्या घटनेचं आपल्याला गांभिर्य कळतं. हल्ली शेतकरी आत्महत्या हा नित्याचीच बाब झाल्यामुळे सरकार प्रमाणे वाचकालाही अशा बातमीकडे बघायला वेळ नाही. पण मागील काही दिवसापासून घडत असलेल्या उद्योग-व्यवसायातील लोकांच्या आत्महत्या हा खरंच चिंताजनक प्रकार आहे.

मृत्यू अटळ आहे, येथे कुणीच अमर नाही.  येणारा तो जाणारच हे त्रिकालवादी सत्य. पण असं अवेळी स्वतःहून यमराजाला आमंत्रण देणं हे मनाला न पटणार आहे.  अजून तरी या घटनेमागील खरं कारण माहित पडलं नाही. पण कारण काही का असेना त्याला आत्महत्या हा एकच उपाय नक्की नव्हता आणि नाही.  या धर्तीवर असा एकही मनुष्यप्राणी नाही की ज्याच्या वाट्याला फक्त सुख, सुख आणि सुखच आलं.  जीवनात चढ-उतार, सुखदुःख आणि यश अपयश येतच असतात. प्रत्येक समस्येला उपाय असतात. बऱ्याच समस्या काही न करता काही काळानंतर सुटतात. पण यशाचे मोठमोठे घोट घेणारे आपण क्वचीत आलेलं दुःख मात्र चघळत बसतो. खरं म्हणजे त्या दुःखाशिवाय जीवनाला अर्थही नाही. खूप कमी लोकांच्या वाट्याला 'संथ वाहे कृष्णामाही' सारखं संथ सुखी जीवन येतं. जस अंधाराशिवाय उजेडात महत्व कळत नाही, तसंच दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नाही,  हेही तितकंच खरं.  मग अंधार बघून उद्या सूर्य उगवणारच नाही अशी नकारात्मक मानसिकता बाळगणे किती बरोबर?

डॉ. प्रणय जैस्वाल हे शल्यचिकित्सा विभागात निवासी डॉक्टर होते. अर्थात शालेय जीवनापासून त्यांनी भरपूर अभ्यास, कष्ट करून आज ते या पदावर पोहचले असतील. पुढील काही वर्षात ते एक निष्णात सर्जन म्हंणून प्रसिद्ध झाले असते. या जीवनात येऊन त्यांच्या हातून किती तरी चांगले कामं घडले असते. किती तरी रुग्णाचे इलाज करून, प्राण वाचवून, समाज, देशसेवा करून, नाव कमवून ते चांगलं जीवन जगू शकले असते. त्यामुळेच त्यांच्या ह्या अचानक 'एक्झिट' च अतिव दुःख होतं आहे.

वरील घटनेची कारणमीमांसा केली तर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्या अशा की हल्लीच्या युवकांमध्ये 'इमोशनल कोशन्ट' वर त्यांचं 'इंटेलिजन्ट कोशन्ट' हे भारी पडत आहे.  विध्यार्थ्याचं जीवन हे वह्या, पुस्तक, शाळा-कॉलेज, ट्युशन, परीक्षा आणि रँक येथपर्यंतच मर्यादित झालं आहे.  या दुष्टचक्रातून बाहेर डोकावयास त्यांच्याकडे वेळ आणि मुख्य म्हणजे इच्छाहि नसते. त्यामुळे जवळचे नातेवाईक कोणते हे त्यांना चार्ट, फॅमिली ट्री बनवून समजून द्यावं लागतं. त्यामुळे महत्वाच्या अशा भावनिक नात्याला ते मुकतात. नाते-गोत्यातील भाऊ-बहीण, चांगले मित्र जवळ नसल्यामुळे असे अभ्यासू विद्यार्थी आपल्या भावना इतरांशी सामायिक(इंग्लिशमध्ये 'शेअर') करत नाही. किंबहुना असं करणं त्यांना कमी पणाच वाटतं. मग ' एक तू हि सहारा' म्हणून ते स्वतःला जीवनसाथी मोबाईलच्या हवाली करतात. खरं म्हणजे अशा विद्यार्थी किंवा व्यक्तीस योग्यवेळी समुपदेशनाची(कौन्सिलिंग) गरज असते. महाभारतात साक्षात अर्जुनाला समुपदेशनाची गरज पडली होती. भर युद्धभूमीत श्रीकृष्णाने अर्जुनाच समुपदेशन केलं. कदाचित ते पहिलं समुपदेशन असावं. मग जेंव्हा देवाला समुपदेशनची गरज पडते तर मनुष्याला त्याची गरज का नसावी?

या घटनेचा दुसरा पदर असा की या नवीन पिढीला दुःख, कष्ट किंवा थोडक्यात 'प्रतिकूल परिस्थिती' मध्ये जीवन जगणे म्हणजे काय याची किंचितशी जाणीव नाही. तसेच कुणी अनावधानाने केलेला अपमान, कुणाचं जोरात बोलणं सहन करण्याची त्यांना सवय नाही. जमिनीवर कसं राहायचं त्यांना माहित नाही. लहानपणापासूनच सर्व सुखसोयी समोर लोटांगण घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये थोडंही दुःख सहन करण्याची सहनशीलता दिसत नाही. मग अगदी टीव्हीचा रिमोट न दिल्यामुळे आत्महत्या, मोबाईलवर गेम खेळू न दिल्यामुळे आत्महत्या, वडील रागावले म्हणून आत्महत्या, अभ्यास न झेपत असल्यामुळे आत्महत्या, परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या अशा फालतू गोष्टीसाठी टोकाची भूमिका घेणाऱ्या बातम्या आपण वाचतो.

आज गरज आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःची जबाबदारी समजून घेण्याची. काबाड कष्ट करणारे, स्वतः उपाशी राहून तुम्हाला काहीच कमी पडू न देणारे, तुम्ही ब्रँडेड नेसावे म्हणून स्वतः जुने कपडे नेसणारे आई-वडील मुलांना यासाठी शिकवत नाहीत की त्यांनी भरपूर शिकून भर तारुण्यात आत्महत्या करून निघून जावं. उलट मी तर सांगेन आपण लहानाचे मोठे होतांना फक्त पालकांकडून नाही तर या देश आणि समाजाकडून आपण बऱ्याच गोष्टी घेत असतो आणि त्या समाजाला परत करणे आपली नैतिक जबाबदारी असते. आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांनी देश समाजाचा नाही तर किमान जन्मदात्या वृद्ध आई-वडिलांचा तरी विचार करावयास पाहिजे होता. ज्यांनी जन्म दिला, स्वतः झिजून केजी पासून वैद्यकीय पीजी पर्यन्त शिक्षणाचा खर्च केला त्याबद्दल मुलांची पालकाप्रति काही जबाबाबदारी असते की नाही?

हल्ली फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाटसप सारख्या आभासी युगात वावरणाऱ्या पिढीला खऱ्याखुऱ्या जगाबद्दल काहीच आस्था राहिली नाही. त्यांच्या संवेदना फक्त 'इमोजी' पुरत्या मर्यादित राहिल्या आहे.  त्यामुळे आज गरज आहे की विद्यार्थ्यांनी जीवन म्हणजे काय हे प्रथम समजून घेण्याची आणि त्यानुसार जीवनात सकारात्मकतेने पुढे पुढे जाण्याची.  शेवटी एव्हडच सांगेन,

*'जिंदगी हंसने गाणे के लिये है
पल दो पल, इसे खोना नही, खो
के रोना नही, तेरे गिरने में भी
तेरी हार नही, के तू आदमी है,
अवतार नही।'*

© प्रेम जैस्वाल (premshjaiswal@gmail.com)
  औरंगाबाद




बाऊन्सर नको, कौन्सेलर हवे!


एकदा प्रबोधनकार ठाकरेकडे शाळेचे शिक्षक तक्रार घेऊन गेले की तुमचा मुलगा शाळेत खूप खोड्या करतो. आता शिक्षकाला वाटलं की प्रबोधनकार ठाकरे आपल्या मुलाला मोठी शिक्षा करतील. पण झालं भलतंच, प्र. ठाकरे म्हणाले,' अहो गुरुजी या साठीच तर मी त्याला शाळेत पाठवलं!' तो मुलगा म्हणजेच हिंदू ह्रदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे!!

येथे हे नमूद करण्याचं कारण म्हणजे परवाच वृत्तमानपत्रात  एक बातमी वाचली. शालेय मुलं खोड्या करतात म्हणून शिक्षणाच माहेरघर असलेल्या पुण्यातील एका शाळेय व्यवस्थापनाने मुलांना शिक्षा देण्यासाठी  चक्क बॉउन्सर नेमले. बायन्सर म्हणजे उत्तम देहयष्टी असलेले, सहसा गडद कपडे परिधान केलेले धिप्पाड, उग्र चेहरा असलेले भितीदायक मानवप्राणी. सिने कलाकार म्हणजे सेलेब्रिटी, राजकीय व्यक्तीना जमावाकडून होणाऱ्या संभाव्य त्रासापासून रक्षणासाठी नेमलेले बाऊन्सर आपण नेहमी पाहतो. शिवाय बार, डान्सबार सारख्या ठिकानी ग्राहकांवर एक वचक रहावा म्हणून ही उभे केलेले बाऊन्सर आपण चित्रपटात पाहात असतो. त्यात वावगं असं काहीच नाही. पण शाळेसारख्या पवित्र ठिकाणी बाऊन्सर असा प्रकार पहिल्यांदाच ऐकावयास मिळाला.  खरंच शाळेत त्याची गरज आहे का?

मुलं हि उडान, मस्तीखोर असतातच कारण ते त्यांचं बालपण असतं. जीवनावश्यक शिक्षण, शिस्त आणि संस्कार देताना पालकांना घरी बऱ्याच मर्यादा येतात म्हणून आपण मुलांना शाळेत पाठवतो. पण संस्कार न देता त्यांना बाऊन्सरकडून १०० उठबैठकाची शिक्षा मिळत असेल तर ते किती योग्य? त्यातच जो शिक्षा भोगत होता त्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली नव्हती. अशा असंवेदनशील प्राण्याची विद्येच्या मंदिरात गरजच काय?

डी.एड, बी.एड. पदवीच्या अभ्यासक्रमात शिक्षकांना फक्त     विद्यार्थ्यांना एखादा विषय कसा शिकवावा एव्हडच प्रशिक्षण दिलं जातं नाही तर विद्यार्थ्यांशी कसं वागावं, कसं भावनिक नातं जपावं याचही शिक्षण दिलं जातं. परंतु, सत्य परिस्थिती अशी कि हल्लीचे शालेय शिक्षक स्वतःला एक-दोन विषय व त्या संबंधित प्रश्न-उत्तर आणि परिक्षेपुरतं मर्यादित ठेवतात. मग शिस्त आणि व्यवस्थापन ' नो वन्स कप ऑफ टी' होऊन जातं.  वाढत्या वयात शालेय विद्यार्थ्यांच्या शरीरात बरेच बदल घडत असतात. सभोवतालच्या सर्वच वस्तूबद्दल जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. काही प्रमाणात संगतीचा परिणाम होत असतो.   त्यात मोबाईल, फिर क्या कहेने! अशा वेळेस विद्यार्थ्याच डोकं टाळ्यावर आणण्यासाठी शिक्षक सौम्य शिक्षा किंवा योग्य समुपदेशन करू शकतात.

थोडक्यात असे अघोरी प्रकार टाळण्यासाठी शाळेंनी बाऊन्सरची नेमणूक करता उत्तम समुपदेशकाची नेमणूक करावी. तसेच शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रम शिकवितानाच विद्यार्थ्यांच्या शिस्त आणि संस्कारावर भर द्यावी.


© प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

Friday, 12 July 2019



          वैद्यकीय क्षेत्राची दुरावस्था
           
आज वर वर जरी वैद्यकीय व्यवसाय (डॉक्टरकी पेशा) पद, सामाजिक प्रतिष्ठा आणि पैसा कमविणारा दिसत असला तरी संत तुकारामांनी म्हंटल्याप्रमाणे तो दिसतो तसा नाही आहे. तुका म्हणतात,

             पाण्यातील मासा, झोपणार कैसा,
              जावे त्यांच्या वंशा, तेंव्हा कळे।


आजच्या साधारण तीन दशकांपूर्वी परिस्थिती खुपचं वेगळी होती. त्या वेळेस डॉक्टरची मुलं वैद्यकीय क्षेत्रचं निवडायची. बारावीनंतर काय? असा करियरविषयीचा गंभीर प्रश्न सहसा कुणी डॉक्टरपुत्राला विचारत नसे. किंबहुना डॉक्टर पालकांसाठी तो सोयीचा पर्याय असे. डॉक्टरला समाजात अत्यन्त मानाचं स्थान, आदर, एक वेगळं वलय आणि प्रतिष्ठा होती.  डॉक्टर पालकांचा गाव किंवा शहरात स्वतःचा 'सेट' दवाखाना असायचा. शिवाय सामान्य जनतेची इमानेइतबारे सेवा केलेली पुण्याई गाठी असायची. त्यामुळे वडिलांच्या छत्रछायेत मुलांचीही 'प्रॅक्टिस'  बहरायची. पण आज देशातील सामाजिक परिस्थिती खूपच बदलली आहे. आज ९९% डॉक्टर आपल्या पाल्यांना 'बेटा डॉक्टरकी नको, इतर काहीही कर'  असा चेतावणीवजा सल्ला देताना दिसत असतात. कदाचित त्यामुळेच आज अत्यन्त हुशार, बुद्धिमान मुलं वडिलांकडून 'डॉक्टरकीचा डीएनए' मिळूनसुद्धा वैद्यकीय क्षेत्र न निवडता चक्क अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे. देशातील आयआयटी, एनआयटी, बिट्स सारख्या उच्चअभियांत्रिकी संस्थेत उत्तम पदवी घेऊन ती देशात न राहता परदेशात स्थायिक होत आहेत. अशी उत्तम बुद्धिमत्ता असलेली मुलं वैद्यकीय क्षेत्र न निवडता अभियंते बनून बाहेर देशात सेवा देत राहिली तर भविष्यात 'ब्रेनड्रेन' वाढून देशात वैद्यकीय सेवेसाठी चांगले डॉक्टर मिळणे कठीण होईल. आणि जर देशाच्या आरोग्यासंबंधित वैद्यकीय क्षेत्राचीच एव्हडी दयनीय स्थिती असेल तर तिथे देशाची प्रगती तरी कशी होणार? असं का घडत असावं या बद्दल प्रथम देशातील सामान्य जनतेने व त्यासोबत शासकीय यंत्रनेंने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मग या समस्येचं कारण काय?

आपल्याकडे एक जुनी प्रचलित म्हण आहे -

      मला आला ताप तर वैद्य माझा बाप,
      माझा गेला ताप मग मी वैद्याचा बाप!

रूग्णालयात भरती झालेला रुग्ण ठणठणीत होईपर्यंतच डॉक्टरला देव मानतो.  एकदा का तो ठणठणीत झाला तर मग तो बिलासाठी झिकझिक करत बसतो.  मग त्याला एक क्षण जास्त रुग्णालयात थांबू वाटत नाही. एरव्ही पर्यटन मौजेसाठीच्या खर्चात ₹ ५०००/- प्रतिदिनच्या रूम भाड्यापेक्षा त्याला दवाखान्याची ₹४०००/- प्रतिदिन भाडे त्याला जास्त वाटतो.  शेवटी आजार बाजूला राहून शरीरप्रकृतीपेक्षा त्याला पैसा मोठा वाटतो,  बिल महत्वाचे वाटते. मग वेळप्रसंगी ओळखीच्या व्यक्तीला, नगरसेवक, एखाद्या थिल्लर पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन बिलात घट करण्याचे प्रयत्न होतात . रुग्ण ठीक करण्यासाठी डॉक्टर, स्टाफने घेतलेले कष्ट, त्यांनी प्रपंच सोडून जागलेल्या रात्रीशी त्याला काहीच घेणंदेन नसतं. त्यातच इलाज करताना यदा कदाचित एखाद्या रुग्णाचे बरे-वाईट झाले तर देव रुपात दिसणारे पेशन्टचे नातेवाईक क्षणात दानवाचं रूप धारण करतात. मग सर्व नातेवाईक गोळा करून टोकाचे पाऊल उचलायला पुढे मागे बघत नाही,  कायदा हातात घेऊन रुग्णालयाची तोडफोड होते. हा प्रकार येथे न थांबता डॉक्टरवर प्राणघातक हल्ले होतात.  अशा देशभरातील शेकडो घटना आपण रोजच वृत्तपत्रात वाचत असतो. पश्चिम बंगालमध्ये तर हद्दच झाली. एक अंशी वर्षाचा वृद्ध रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने दगावल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारकर्त्या डॉक्टरवरच प्राणघातक हल्ला केला. दगडविटांनी अक्षरशः त्यांच्या डोक्याचं हाड(स्कल) मोडलं. अशी एखादी दुसरी बातमीच वृत्तमानपत्रात झळकते. राजकीय नेत्यांच्या दबावापुढे अशी प्रकरण दाबली जातात त्यावर वृत्तपत्रात किंवा समाजमाध्यमामध्ये चर्च होत नाहीत. पण खरी गोष्ट अशी कि अशा घटना प्रत्येक डॉक्टरच्या जीवनात नव्या नसून त्यांच्या तो दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. 

मुळातच वकील, डॉक्टर , सीए, इंजिनियर इत्यादी जीवनभर 'प्रॅक्टिस' करत असतात. कुणीही देव किंवा परफेक्ट नसतंच. सर्व रुग्णाची राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रकृती, शरीररचना, जनुके भिन्न असल्या कारणाने एक औषध सर्वांना सारखं लागू  होईलच असं नसतं. एखाद्या औषधाची रिएक्शन येऊ शकते. पण याचा अर्थ डॉक्टरचा त्या इलाजामागील हेतू अशुद्ध नसतो. आणि हो, डॉक्टरच जनरीक नाव 'मनुष्य' च, त्यामुळे इतर मनुष्याप्रमाणे एखादया डॉक्टरच्या हातून चूकही होऊ शकते. पण त्यामुळे त्यावर प्राणघातक हल्ला करणे अत्यन्त चूक. तसेच अशा एखाद्या अनुचित घटनेमुळे सरसगट सर्वच डॉक्टरांना एकाच भिंगाने बघणे खूप चुकीचे ठरेल. वाईट प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात असतातच त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. पण त्यासाठी इलाजकर्त्या डॉक्टरचा जीवच घेणे हा काही समस्येचा इलाज होऊ शकत नाही.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी लोकांची सेवा विकत घेत असतो. जसेकी चारचाकी रिपेअर, दुचाकी रिपेअर इ.   विशेष म्हणजे स्वतःच्या जिवापेक्षा आपल्याला या भौतिक सुख देणाऱ्या वस्तू मोठ्या वाटतात. कारण आपण स्वतःच्या शरीराचा आरोग्य विमा न काढता आधी भौतिक सुख देणाऱ्या इतर वस्तूचा इमानेइतबारे विमा काढलेला असतोच. अर्थात शरीराला दुययम स्थान असते. मुख्य म्हणजे यदाकदाचित गाडी रिपेरमध्ये काही त्रुटी झाली तर त्या रिपेअरवाल्याशी आपण त्याच्या पातळीवर जाऊन भांडु शकत नाही. कारण त्या 'हार्ड टार्गेट' समोर आपला इलाज चालत नसतो.  कारण रिपेअररशी भांडनाच प्रकरण आपल्याच अंगलट येऊ शकतं. पण डॉक्टर म्हणजे समाजातील 'सॉफ्ट टार्गेट' त्यामुळे तिथेच लोकांची मर्दुमकी चालते.

हल्लीच्या नवीन डिजिटल जनरेशनमध्ये वावरणाऱ्या मुलांच संवादकौशल्य पाहिजे तेव्हड चांगलं नसत. त्यातच व्हाटसप, मेसेजिंगमुळे मानवी संभाषण मागे पडत आहे. त्यामुळे आयक्यु जरी उत्तम असला तरी इक्यू (इमोशनल कौशन्ट) पाहिजे तेव्हड चांगलं नसतं.  त्यामुळे रुग्णांशी त्यांच्या पातळीवर येऊन भावनिक संयमशीर संवाद साधने मुलांना जमत नाही. तसेच डॉक्टर वडीलाप्रमाणे रुग्णाचे संभाव्य हल्ले झेलण्याची क्षमता, कला त्यांच्या मुलांमध्ये नसते. त्यामुळे भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेऊन कुणीही डॉक्टर आपल्या पाल्याला स्वतःसारखं डॉक्टर बनवू इच्छित नाही. दुसरी महत्त्वाची कौटुंबिक समस्या अशी की निष्णात डॉक्टर बनेपर्यंत डॉक्टराला आपल्या जीवनाची तिशी-पस्तीशी पार करावी लागते. आज सुपरस्पेशालिस्टच्या जमान्यात फक्त एमबीबीएस किंवा एमडी, एमएस डिग्री पुरेशी नाही. त्यामुळे श्रीरामाच्या चौदा वर्षाचा वनवास सारखी अभ्यासाची मेहनत, अभ्यास आणि तपश्चर्या करूनही शेवटी काहीही साध्य होत नाही. तसेच रुग्णसेवेसाठी शासकीय मानांकननुसार स्वतःचा दवाखाना उभा करण्यासाठी आणि उपकरण खरेदीसाठी डॉक्टरला ५-६ करोड रुपये खर्च करावा लागतो. मग वैद्यकीयपेक्षा बारावी नंतर चार वर्षांनी अभियांत्रिकी पदवी घेऊन परदेशात एमएस करून तेेेथेच  स्थायिक होणे कधीही सोयीचा पर्याय वाटतो.

वैद्यकीय क्षेत्रांच्या समस्या येथेच संपत नाही त्यात अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत.  मुळात शासनाचं वैद्यकीय क्षेत्राबाबतच उदासीन धोरण यास तेव्हढेच जबाबदार आहेत. एकशे चाळीस कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची समस्या खूपचं बिकट आहे. जागोजागी वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची घोषणा केली असली तरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱया गुणवन्त विद्यार्थाना  राहण्यासाठी, भोजनासाठी स्वच्छ वसतिगृह नाहीत की पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यातच दहा डॉक्टराच ओझं तीन डॉक्टरवर येऊन पडतं. मग रात्रीच्या पाळ्या, रुग्णांशी वादविवाद यामुळे त्यांच्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उदभवत असतात. त्यातच लाल फितीत अडकलेला औषधाचा तुटवडा, बंद उपकरणे यामुळे समस्या वाढत जातात.  शिवाय शेकडो पक्षाचे कार्यकर्ते कायम डॉक्टराशी हुज्जत घालत असतात. एकंदरीत या सर्वांचा फटका इलाजकर्त्या डॉक्टरला बसतो. त्यामुळे परिस्थिती स्फोटक बनून रुग्ण आणि डॉक्टरमध्ये वाद उद्दभवतात. प्रसंगी त्याची परिणीती भांडणात होते. शेवटी प्रशासनालाच नमते घेऊन वाद मिटवला जातो.

अशा उपद्रवी रुग्णाचा पायबंद करण्यासाठी भारतीय घटनेत कायद्याचे काही कलम असतीलही पण आजपावेतो कुणालाही शिक्षा झालेली ऐकिवात नाही. प्रत्येक कायदा आणि व्यवस्थेच्या समस्येसाठी आपल्याकडे शासकीय न्यायालय आहेत त्यामुळे रुग्णांनी स्वतः कायदा हातात न घेता सरळ सरळ न्यायालयात धाव घेतली पाहिजे जेणेकरून झाल्या प्रकरनाच 'दूध का दूध' होऊन दोषी रुग्ण किंवा डॉक्टराला शिक्षा मिळू शकेल.

वर नमूद केल्याप्रमाणे आज जरी हि समस्या मोठी वाटत नसली तरी भविष्यात तिचे वाईट परिणाम निश्चित दिसू लागतील. तेंव्हा आज गरज आहे कि शासनाने या समस्येकडे जातीने लक्ष घालून योग्य असे पाऊल उचलावेत.

© प्रेम जैस्वाल,  9822108775
(नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)

                    - - - - - -



...तर इलाजासाठी निष्णात डॉक्टर मिळणार नाहीत

           
आज वर वर जरी वैद्यकीय व्यवसाय (डॉक्टरकी पेशा) पद, सामाजिक प्रतिष्ठा आणि पैसा कमविणारा दिसत असला तरी संत तुकारामांनी म्हंटल्याप्रमाणे तो दिसतो तसा नाही आहे. तुका म्हणतात,

             पाण्यातील मासा, झोपणार कैसा,
              जावे त्यांच्या वंशा, तेंव्हा कळे।


आजच्या साधारण दोन दशकांपूर्वी परिस्थिती खुपचं वेगळी होती. त्या वेळेस डॉक्टरची मुलं वैद्यकीय क्षेत्रचं निवडायची. बारावीनंतर काय? असा करियरविषयीचा गंभीर प्रश्न सहसा कुणी डॉक्टरपुत्राला विचारत नसे. किंबहुना डॉक्टर पालकांसाठी तो सोयीचा पर्याय असे. डॉक्टरला समाजात अत्यन्त मानाचं स्थान, आदर, एक वेगळं वलय आणि प्रतिष्ठा होती.  डॉक्टर पालकांचा गाव किंवा शहरात स्वतःचा 'सेट' दवाखाना असायचा. शिवाय सामान्य जनतेची इमानेइतबारे सेवा केलेली पुण्याई गाठी असायची. त्यामुळे वडिलांच्या छत्रछायेत मुलांचीही 'प्रॅक्टिस'  बहरायची. पण आज देशातील सामाजिक परिस्थिती खूपच बदलली आहे. आज ९९% डॉक्टर आपल्या पाल्यांना 'बेटा डॉक्टरकी नको, इतर काहीही कर'  असा चेतावणीवजा सल्ला देताना दिसत असतात. कदाचित त्यामुळेच आज अत्यन्त हुशार, बुद्धिमान मुलं वडिलांकडून 'डॉक्टरकीचा डीएनए' मिळूनसुद्धा वैद्यकीय क्षेत्र न निवडता चक्क अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे. देशातील आयआयटी, एनआयटी, बिट्स सारख्या उच्चअभियांत्रिकी संस्थेत उत्तम पदवी घेऊन ती देशात न राहता परदेशात स्थायिक होत आहेत. अशी उत्तम बुद्धिमत्ता असलेली मुलं वैद्यकीय क्षेत्र न निवडता अभियंते बनून बाहेर देशात सेवा देत राहिली तर भविष्यात 'ब्रेनड्रेन' वाढून देशात वैद्यकीय सेवेसाठी चांगले डॉक्टर मिळणे कठीण होईल. आणि जर देशाच्या आरोग्यासंबंधित वैद्यकीय क्षेत्राचीच एव्हडी दयनीय स्थिती असेल तर तिथे देशाची प्रगती तरी कशी होणार? असं का घडत असावं या बद्दल प्रथम देशातील सामान्य जनतेने व त्यासोबत शासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मग या समस्येचं कारण काय?

आपल्याकडे एक जुनी म्हण प्रचलित आहे -

            मला आला ताप तर वैद्य माझा बाप,
            माझा गेला ताप मग मी वैद्याचा बाप!

आपल्याकडे रूग्णालयात भरती झालेला रुग्ण ठणठणीत होईपर्यंतच डॉक्टरला देव मानतो.  एकदा का तो ठणठणीत झाला तर मग तो बिलासाठी झिकझिक करत बसतो.  मग त्याला एक क्षण जास्त रुग्णालयात थांबू वाटत नाही. एरव्ही पर्यटनमौजेसाठीच्या खर्चात ₹ ५०००/- प्रतिदिनच्या रूम भाड्यापेक्षा त्याला दवाखान्याची ₹४०००/- प्रतिदिन भाडे त्याला जास्त वाटतो.  शेवटी आजार बाजूला राहून शरीरप्रकृतीपेक्षा त्याला पैसा मोठा वाटतो,  बिल महत्वाचे वाटते. मग वेळप्रसंगी ओळखीच्या व्यक्तीला, नगरसेवक, एखाद्या थिल्लर पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन बिलात घट करण्याचे प्रयत्न होतात . रुग्ण ठीक करण्यासाठी डॉक्टर, स्टाफने घेतलेले कष्ट, त्यांनी प्रपंच सोडून जागलेल्या रात्रीशी त्याला काहीच घेणंदेन नसतं. त्यातच इलाज करताना यदा कदाचित एखाद्या रुग्णाचे बरे-वाईट झाले तर देव रुपात दिसणारे पेशन्टचे नातेवाईक क्षणात दानवाचं रूप धारण करतात. मग सर्व नातेवाईक गोळा करून टोकाचे पाऊल उचलायला पुढे मागे बघत नाही,  कायदा हातात घेऊन रुग्णालयाची तोडफोड होते. हा प्रकार येथे न थांबता डॉक्टरवर प्राणघातक हल्ले होतात.  अशा देशभरातील शेकडो घटना आपण रोजच वृत्तपत्रात वाचत असतो. पश्चिम बंगालमध्ये तर हद्दच झाली. एक अंशी वर्षाचा वृद्ध रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने दगावल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारकर्त्या डॉक्टरवरच प्राणघातक हल्ला केला. दगडविटांनी अक्षरशः त्यांच्या डोक्याचं हाड(स्कल) मोडलं. अशी एखादी दुसरी बातमीच वृत्तमानपत्रात झळकते. राजकीय नेत्यांच्या दबावापुढे अशी प्रकरण दाबली जातात त्यावर वृत्तपत्रात किंवा समाजमाध्यमामध्ये चर्च होत नाहीत. पण खरी गोष्ट अशी कि अशा घटना प्रत्येक डॉक्टरच्या जीवनात नव्या नसून त्यांच्या तो दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. 

मुळातच वकील, डॉक्टर , सीए, इंजिनियर इत्यादी जीवनभर 'प्रॅक्टिस' करत असतात. कुणीही देव किंवा परफेक्ट नसतंच. सर्व रुग्णाची राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रकृती, शरीररचना, जनुके भिन्न असल्या कारणाने एक औषध सर्वांना सारखं लागू  होईलच असं नसतं. एखाद्या औषधाची रिएक्शन येऊ शकते. पण याचा अर्थ डॉक्टरचा त्या इलाजामागील हेतू अशुद्ध नसतो. आणि हो, डॉक्टरच जनरीक नाव 'मनुष्य' च, त्यामुळे इतर मनुष्याप्रमाणे एखादया डॉक्टरच्या हातून चूकही होऊ शकते. पण त्यामुळे त्यावर प्राणघातक हल्ला करणे अत्यन्त चूक. तसेच अशा एखाद्या अनुचित घटनेमुळे सरसगट सर्वच डॉक्टरांना एकाच भिंगाने बघणे खूप चुकीचे ठरेल. वाईट प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात असतातच त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. पण त्यासाठी इलाजकर्त्या डॉक्टरचा जीवच घेणे हा काही समस्येचा इलाज होऊ शकत नाही.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी लोकांची सेवा विकत घेत असतो. जसेकी चारचाकी रिपेअर, दुचाकी रिपेअर इ.   विशेष म्हणजे स्वतःच्या जिवापेक्षा आपल्याला या भौतिक सुख देणाऱ्या वस्तू मोठ्या वाटतात. कारण आपण स्वतःच्या शरीराचा आरोग्य विमा न काढता आधी भौतिक सुख देणाऱ्या इतर वस्तूचा इमानेइतबारे विमा काढलेला असतोच. अर्थात शरीराला दुययम स्थान असते. मुख्य म्हणजे यदाकदाचित गाडी रिपेरमध्ये काही त्रुटी झाली तर त्या रिपेअरवाल्याशी आपण त्याच्या पातळीवर जाऊन भांडु शकत नाही. कारण त्या 'हार्ड टार्गेट' समोर आपला इलाज चालत नसतो.  कारण रिपेअररशी भांडनाच प्रकरण आपल्याच अंगलट येऊ शकतं. पण डॉक्टर म्हणजे समाजातील 'सॉफ्ट टार्गेट' त्यामुळे तिथेच लोकांची मर्दुमकी चालते.

हल्लीच्या नवीन डिजिटल जनरेशनमध्ये वावरणाऱ्या मुलांच संवादकौशल्य पाहिजे तेव्हड चांगलं नसत. त्यातच व्हाटसप, मेसेजिंगमुळे मानवी संभाषण मागे पडत आहे. त्यामुळे आयक्यु जरी उत्तम असला तरी इक्यू (इमोशनल कौशन्ट) पाहिजे तेव्हड चांगलं नसतं.  त्यामुळे रुग्णांशी त्यांच्या पातळीवर येऊन भावनिक संयमशीर संवाद साधने मुलांना जमत नाही. तसेच डॉक्टर वडीलाप्रमाणे रुग्णाचे संभाव्य हल्ले झेलण्याची क्षमता, कला त्यांच्या मुलांमध्ये नसते. त्यामुळे भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेऊन कुणीही डॉक्टर आपल्या पाल्याला स्वतःसारखं डॉक्टर बनवू इच्छित नाही. दुसरी महत्त्वाची कौटुंबिक समस्या अशी की निष्णात डॉक्टर बनेपर्यंत डॉक्टराला आपल्या जीवनाची तिशी-पस्तीशी पार करावी लागते. आज सुपरस्पेशालिस्टच्या जमान्यात फक्त एमबीबीएस किंवा एमडी, एमएस डिग्री पुरेशी नाही. त्यामुळे रामासारखी चौदा वर्षाचा अभ्यासाची मेहनत, अभ्यास आणि तपश्चर्या करूनही शेवटी काहीही साध्य होत नाही. तसेच रुग्णसेवेसाठी शासकीय मानांकननुसार स्वतःचा दवाखाना उभा करण्यासाठी आणि उपकरण खरेदीसाठी डॉक्टरला ५-६ करोड रुपये खर्च करावा लागतो. मग वैद्यकीयपेक्षा बारावी नंतर चार वर्षांनी अभियांत्रिकी पदवी घेऊन परदेशात एमएस करून स्थायिक होणे कधीही सोयीचा पर्याय वाटतो.

वैद्यकीय क्षेत्रांच्या समस्या येथेच संपत नाही त्यात अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत.  मुळात शासनाचं वैद्यकीय क्षेत्राबाबतच उदासीन धोरण यास तेव्हढेच जबाबदार आहेत. एकशे तीस कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची समस्या खूपचं बिकट आहे. जागोजागी वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची घोषणा केली असली तरी वैद्यकीय शिक्षण घेणाऱया गुणवन्त विद्यार्थाना  राहण्यासाठी, भोजनासाठी स्वच्छ वसतिगृह नाहीत की पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यातच दहा डॉक्टराच ओझं तीन डॉक्टरवर येऊन पडतं. मग रात्रीच्या पाळ्या, रुग्णांशी वादविवाद यामुळे त्यांच्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उदभवत असतात. त्यातच लाल फितीत अडकलेला औषधाचा तुटवडा, बंद उपकरणे यामुळे समस्या वाढत जातात.  शिवाय शेकडो पक्षाचे कार्यकर्ते कायम डॉक्टराशी हुज्जत घालत असतात. एकंदरीत या सर्वांचा फटका इलाजकर्त्या डॉक्टरला बसतो. त्यामुळे परिस्थिती स्फोटक बनून रुग्ण आणि डॉकटरमध्ये वाद उद्दभवतात. प्रसंगी त्याची परिणीती भांडणात होते. शेवटी प्रशासनालाच नमते घेऊन वाद मिटवला जातो.

अशा उपद्रवी रुग्णाचा पायबंद करण्यासाठी भारतीय घटनेत कायद्याचे काही कलम असतीलही पण आजपावेतो कुणालाही शिक्षा झालेली ऐकिवात नाही. प्रत्येक कायदा आणि व्यवस्थेच्या समस्येसाठी आपल्याकडे शासकीय न्यायालय आहेत त्यामुळे रुग्णांनी स्वतः कायदा हातात न घेता सरळ सरळ न्यायालयात धाव घेतली पाहिजे जेणेकरून झाल्या प्रकरनाच 'दूध का दूध' होऊन दोषी रुग्ण किंवा डॉक्टराला शिक्षा मिळू शकेल.

वर नमूद केल्याप्रमाणे आज जरी हि समस्या मोठी वाटत नसली तरी भविष्यात तिचे वाईट परिणाम निश्चित दिसू लागतील. तेंव्हा आज गरज आहे कि शासनाने या समस्येकडे जातीने लक्ष घालून योग्य असे पाऊल उचलावेत.

© प्रेम जैस्वाल, 9822108775
(नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)

                    - - - - - -



Tuesday, 28 May 2019


व्यवहारिक ज्ञान आवश्यकच !

काही वर्षापूर्वी गुजरातची स्मार्ट सिटी, सुरत शहरात घडलेल्या आगीच्या घटनेमुळे अख्खा देश दुःख सागरात बुडाला होता.  देशात आगीची हि पहिलीच घटना होती अशातला भाग नाही पण ज्या प्रकारे या आगीत गुदमरून तरुण कोवळ्या मुला-मुलींनी मृत्यूला कवटाळले, काहींनी धडपड करत जोखीम घेऊन चौथ्या माळेवरून उड्या मारल्या, त्यातही काही जखमी झाले, एकंदरीत मन हेलावणारा तो प्रकार होता. 

आपत्ती व्यवस्थापनाची गरज आपण सर्वांनाच आहे. जीवनात संकट समयी  सक्षमपणे खंबिर तोंड देण्याची कला उद्याच्या नागरिकांना नको का यायला? ९० ते ९९% टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० फुटाच्या उंचीवरून काही कल्पकता वापरून सुखरूप खाली कसं उतरावं याचा साधा विचारसुद्धा ते करू शकले नाही. खरं तर पाच जीन्सला किचैन-चावीच्या रिंगणी एकमेकाला जोडून त्यांनी सहज खाली येण्याचा किमान प्रयत्न केला असता तर अनेक जीव वाचू शकले असते. असो.

या घटने नंतर समाजमाध्यमामध्ये सर्व जनता चालू शिक्षण व त्यातील उणिवा, त्रुटीबद्दल बोलत होती आणि त्यांच्याशी मी अगदी सहमत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण हा मुद्दा आपल्याकडे घासून घासून गुळगुळीत झाला आहे पण अजूनही आपलं शिक्षण जागतिक दर्जाची उंची गाठू शकलं नाही, हि मोठी शोकांतिका आहे. देशातील शिक्षणात नोकरीसाठी आवश्यक मृद कौशल्याप्रमाणे जीवनासाठी आवश्यक जीवनकौशल्य गरजेच आहेच. हाच सूर सगळीकडे उमटत आहे. सुरत आगीत मरण पावलेली बिचारी कोवळी मुलं कदाचित दहावीत ९०% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेली असतील पण आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याचं शिक्षण त्यांना दिलं गेलं नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. या समस्येच्या मुळाशी गेल्यास दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे शिक्षणात  जीवनोपयोगी कौशल्याचा अभाव असणे. आणि दुसरी बाब म्हणजे संगोपन होतानाच मुलांना प्रतिकूल परिस्थितीशी झटण्याची सवय नसणे.

' जीवनात जास्तीत जास्त पैसा म्हणजेच सक्सेस'  हे एक सर्वमान्य समीकरण बनलं आहे. त्यामुळे चांगले मार्क/रँक, उच्चपदवी, लवकर नोकरी, मोठं पॅकेज लाईफ सेट! साधारण सर्वच पालकांना हा मार्ग सोयीचा वाटतो. पण त्या कमवलेल्या पैशाचा जीवनात उपभोग घेण्यासाठी जीवनात इतर कौशलेही तितकीच महत्वाची आहेत हे नंतर कळतं.

पूर्वी गाव-खेड्यात जन्मलेल्या, प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कायम प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जीवनमूल्य आत्मसात व्हायची. जसेकी एसटी बसची सुविधा नसल्यामुळे ८-१० किमी पायी चालणे. झाडावर चढुन उतरताच येत नसल्याने उंच फांदीवरून उडी मारणे. नदी ओलांडण्यासाठी पोहून जाणे, वेळप्रसंगी बुडणाऱ्याना वाचवणे,  स्वतःचे कपडे धुणे, स्वतः स्वयंपाक करणे किंवा आईला मदत करणे किंवा पैसाच कमी असल्यामुळे दुकानातून सामान खरेदी करताना भावटाव करणे इत्यादी. थोडक्यात दैनंदिन जीवनात विपरीत परिस्थितीच मुलांना समोर उभ्या समस्येशी दोन हात करणे शिकवते. पण आज वाढत्या शहरीकरनात सर्वच पालकाची मानसिकता बदलली आहे. सर्वच कमवते झाल्याने 'आम्ही जे कष्ट सोसले ते मुलांच्या नशिबी येऊ नयेत' म्हणून पाल्याला एकंदरीत सर्वच सुखसोयी पुरवल्या जातात. प्रतिकूल परिस्थितीशी त्यांचा संबंध येतच नाही मग त्याशी झगडने ते कधी शिकतील?

शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असल्याने आणि स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतल्याने क्वचीत विद्यार्थ्याचे व्यवहारिक ज्ञान तपासता खरोखरच त्यांची कीव येते -

- बारावी शिकलेल्या विद्यार्थाना १ फूट म्हणजे किती इंच, १ मीटर म्हणजे साधारण लांबी किती हे माहित नाही. मग चार माळे म्हणजे किती फिट कसं कळणार?

- बारावी मेरिटच्या विद्यार्थ्यांना १ तोळा, १ छटाक, पावशेर माहित नाही

- क्वचितच एखाद्या मुलाला साधी गाठ, बैल पक्का फासा, चाड्याची गाठ मारता येत असेल.

- रँकरला स्वतःचा स्वयंपाक, कपडे धुणे,  प्रेस करणे जमत नाही. घरात आले कि कपडे फेकून देतात.

-   खरेदीसाठी पाठवले तर भावटाव करता येत नाही, आर्थिक नुकसान करून घेतात. काहींना कमीपणा वाटतो.

- जास्तीत जास्त मुलांना आपले जवळचे नातेवाईक जसेकी मामा, काका, आत्या आणि चुलत नातेवाईक याबद्दल माहिती नाही. फेबु, व्हाट्सप्प हेच मित्रविश्व.

- मोदी, राहुल गांधी  माहित असले तरी विधानसभा, विधान परिषद लोकसभा, राज्यसभा, सरपंच ग्रामसेवक आणि त्यांच्या जबाबदाऱ्या नाहीत नाही. नागरिकशास्त्र परीक्षेतील मार्कापुरत वाचून मोकळे.

- विविध शासकीय अधिकारी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. मग तक्रार करता येत नाही.

या आणि अशा गोष्टीला आमच्या-तुमच्या सारखे पालकच जबाबदार आहेत. भूक लागण्याआधी ताट समोर ठेवणारे, साधं उन्हहि अंगावर न घेऊ देणारे, १ किमी पायी चालू न देणारे आपणच. फक्त रँकवर लक्ष केंद्रित करून इतर ऍक्टिव्हिटी पासून त्यांना दूर नेणारे आपणच. आज विभक्त कुटुंब पद्दतीत पालकाकडे भरपूर पैसा आहे पण जीवन कौशल्य तर दूर पण साधे जीवनमूल्य आणि संस्कार देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही, हि मोठी शोकांतिका आहे. त्यातच सर्व मुलांच्या हाती गुगल असल्याने ते गुगललाच गुरु मानतात.

काही वर्षापूर्वीची गोष्ट. संगणक प्रशिक्षक म्हणून आम्ही एका उच्चशिक्षित तरुणांची नेमणूक केली. एम.एस्सी शिक्षित हा तरुण पालकांना एकुलता होता. त्यामुळे त्याच संगोपन कसं झालं असेल,  आपण समजू शकता. तर झालं असं की, एका उत्सवासाठी आम्ही आमचं कार्यालय सुशोभित करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मी त्याला हाताशी घेतलं. एक तोरण बांधण्यासाठी मी त्याला वर चढवलं तर त्याला ते तोरनाची साधी गाठ बांधता आली नाही. मग मी त्याला गाठ कशी बांधतात ते शिकवलं. आता उरलेला दोरा कापण्यासाठी मी त्याला कैची दिली तर तो अक्षरशः ती कैची तो दोऱ्यावर चाकू प्रमाणे घासत होता. अतीच झाल्यामुळं म्हणून मला हसू आलं. आता काही महाशय अशा मुलांची हे सांगून पाठराखण करतील कि त्या संगणक पदवीधराला अशा गोष्टीची गरजच काय? त्याच काम तर संगणकाशी! तर मी सांगेन पैसे कमविण्यासाठी जरी ज्ञान पदवी पुरी असली तरी समृद्ध जीवन जगण्यासाठी जीवन कौशल्य आवश्यकच.

- प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com
(नावा सह शेअर करावयास माझी हरकत नाही)
       

Thursday, 11 April 2019



                           वेब सिरीज

आपल्या पैकी अनेक जणांनी आपल्या आवडत्या नटाचा चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहण्यासाठी वाटेल ते उपदव्याप केले असतील. प्रसंगी जास्त पैसे मोजून 'ब्लॅक टिकेट'  खरेदी करणारे अतिउत्साही महाभाग होतेच. किंबहुना ब्लॅक टिकेट हा प्रकार 'फर्स्ट डे फर्स्ट शो' मुळेच सुरु झाला असावा. बदलत्या काळात चित्रपटाचं तिकीट खरेदी करणं खूपच सोप झालं. आज नवीन चित्रपट एकाच दिवशी अख्या देशातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे चित्रपटग्रहासमोरच्या रांगा बघायला मिळत नाही. डिजिटल क्रांतीमुळे चित्रपट प्रदर्शित झाल्या बरोबर त्याची तिकीट ऑन-लाईन उपलब्ध होतात.  ना रांगेत ताटकळत उभे राहण्याचा त्रास ना योग्य आसन मिळण्याची कटकट.  ज्या प्रमाणे मनोरंजन क्षेत्रात बदल घडत आहेत त्यावरून असे भासते कि भविष्यकाळात नवीन चित्रपटचा आनंद घेणे अजूनही सोपे होणार आहे. वाढत्या स्मार्टफोन, लॅपटॉपच्या वापरामुळे आगामी काळात  चित्रपट सिनेमाग्रहाच्या पडद्यावर प्रदर्शित न होता तो सरळ आपल्या प्राणप्रिय स्मार्टफोन, कंप्युटरवरील नेटवरच प्रदर्शित केला जाईल. त्यामुळे नवीन चित्रपट सहज आपल्या स्मार्टफोनवर उपलब्ध होतील, मग ना तिकीट ना बाहेर कुठे जायची गरज. आजच्या डिजिटल युगात 'वेब सिरीज' नावाचा असाच प्रकार चालू आहे, त्याबद्दल हा लेख.

दूरचित्रवाणीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या मालिका आपण किती तरी वर्षांपासून बघत आलो आहोत. त्याला 'डेली सोप' असेही म्हणतात. या मालिकेचे ठराविक एपिसोड असतात. काही मालिका मात्र वर्षोनवर्ष चालत राहतात. या दूरचित्रवाणी मालिकेचा एकही एपिसोड पुन्हा प्रसारित होतनसल्याने ठराविक दिवशी ठराविक वेळेवर आपण दूरचित्रवाणीसमोर हजर राहणं आवश्यक आहे.  त्यामुळे एखादी क्रिकेटचा सामना बघण्यासाठी बऱ्याचदा हातातलं काम सोडून आपण टीव्ही समोर हजर होतो.  घरातील सर्व सदस्यांच्या आवडी-निवडी वेगळ्या असल्या तर मग कठीणच. रिमोटसाठी घरातील सदस्यामध्ये वाद होतात. पण आजच्या डिजिटल युगात या समस्येचंही निराकरण झालं आहे.  हल्ली आपण सर्व नेटकरी झालो आहोत. आपण जास्तीत जास्त वेळ नेटवर असतो. त्यामुळे आपल्या मनोरंजनाच साधन 'स्मार्टफोन' नेहमी आपल्या सोबत असतं. त्यामुळे टीव्हीची फारशी गरज उरली नाही. हीच गोष्ट हेरून जगातील अनेक मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांनी 'वेब सिरीज' हा प्रकार सुरू केला आहे. नावाप्रमाणे नेटवर चालणाऱ्या शेकडो सिरीयल आज नेटवर उपलब्ध आहे. टीव्ही सिरीयल प्रमाणे वेब सिरियलचेही ठराविक भाग असतात. ऑन-लाईन पेमेंट करून आपण तो बघू शकतो. वाढत्या नेट मुळे दिवसंदिवस वेब सिरीजची लोकप्रियता वाढत आहे. टीव्हीसाठी केबल किंवा डिश आवश्यक आहे परंतु या वेब सिरीजचा आनंद आपण जगात कुठेही कधीही घेऊ शकता. फक्त गरज आहे इंटरनेटची. आगामी काळात आपल्याकडे 5जी नेटवर्क सुरु होणार त्यामुळे जलदगतीच नेट उपलब्ध होऊन हाय डेफिनेशन (एचडी) च्या सिरीयल आपण बघू शकू. या वेब सिरीजचे एपिसोड दोन मिनीटापासून 30 मिनीटापर्यंत असतात. आपण वेब सिरीजचे एपिसोड डाउनलोड करून पाहिजे तेंव्हा 'ऑफ-लाईन' बघू शकता. आज हाय-स्पीड नेटमुळे शहरी भागात वेब सिरीयल तर नेट नसल्या कारणाने ग्रामीण भागात टीव्ही सिरीयल लोकप्रिय आहेत. हल्ली जास्तीत जास्त वेब सिरीज ह्या कॉमेडी किंवा सस्पेन्स-थ्रिलर प्रकारच्या आहेत.

वेब सिरीज कुणी सुरु केली ?
वेब सिरीज आपल्याकडे आता लोकप्रिय होत असली तरी या  मनोरंजन तंत्रज्ञानाची सुरुवात १९९० मध्येच झाली.
१९९५ मध्ये स्कॉट झकेरीनने स्पॉट.कॉमवर टाकलेला 'द स्पॉट' हि कथा म्हणजे पहिला वेब एपिसोड आहे. सुरुवातीच्या काळात कलाकारांना न घेता हे एनिमेटेड व्हिडीओ असायचे. त्यामुळे वेब एपिसोड निर्मितीसाठी जास्त खर्च येत नसे. एखादा वेबएपिसोड तयार करून तो नेटवर टाकल्या जात असे. जस जसे इंटरनेटच जाळं दाट आणि विस्तीर्ण होत गेलं तस तशी वेब सिरीज बघणाऱ्याची संख्या वाढत गेली. हल्ली आपण फेसबुकवर नेटफलिक्सची जाहिरात बघतो तो वेब सिरीजचाच प्रकार आहे. आपल्याकडे पूर्वी फक्त चित्रपटसंबंधित सिनेअवॉर्डचे सोहळे साजरे व्हायचे. नंतर यामध्ये टीव्ही सिरीयल अवॉर्डचा समावेश झाला. आगामी काळात निश्चितच याआपल्याला वेब सिरीज अवॉर्डचे नॉमिनी आणि अवॉर्डस बघायला मिळतील. परदेशात वेब सिरीज खूपच लोकप्रिय आहेत. आपल्या देशातसुद्धा मेट्रो शहरी भागातील तरूण वर्ग वेब सिरीजचा दिवाना आहे.  काही गाजलेल्या भारतीय वेब सिरीज पुढील प्रमाणे :


1.द पिचर्स - टीव्हीएफ
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हेल्ली या वेब सिरीजकडून प्रेरणा घेऊन द व्हायरल फिवर ने तयार केलेली ही वेब सिरीज आहे. ती आयटी क्षेत्रात काम करून स्टार्ट-अप सुरु करणाऱ्या चार मित्राबद्दल आहे.
2. मॅन'स वर्ड-वाय फिल्म्स
पुरुषप्रधानसमाजातील पुरुष-महिला लैंगिक विषमतेवर आधारित या सिरीजमध्ये महिला सबलीकरण, स्त्रियांच्या सामाजाकी समस्यांच चित्रण केलं आहे.
3. परमानण्ट रुममेट्स – टिव्हीएफ
द व्हायरल फिवरचीच एक रोमँटिक आणि वस्तुस्थितीवर आधारित वेब सिरीज आहे ज्यामध्ये एका जोडप्याची कथा चित्रित केली आहे.
4. ट्रिपलिंग- वेब सिरीज
हि एक मनोरंजक वेब सिरीज आहे.
5. व्हॉट दी फोक्स
जुन्या चालीरीती झुगारून मॉडर्न कुटुंब नव्या पद्धतीने कसं जीवणाचा आनंद घेतात, याबद्दल हि सिरीज आहे.
6.आम आदमी फॅमिली वेब सिरीज: हि एक कुटुंबासोबत पाहण्याची वेबसिरीज आहे
7. बँग बाजा बारात – वाय फिल्म्स (यशराज फिल्म)
8. ट्विस्टेड - बाय विक्रम भट्ट
9. माया : सलेव्ह ऑफ डिजायर - बाय विक्रम भट्ट

अशा किती तरी वेब सिरीज प्रसिद्ध आहेत.

वेब सिरीज निर्मात्याला उत्पन्न जाहिरातीपासून मिळत असतं. अनेक कंपन्या वेब सिरीजवर जाहिराती करतात. जाहिरातीतून त्यांना प्रचंड उत्पन्न मिळतं. शिवाय उपयोगी वस्तूचे कन्टेन्ट जाणूनबुजून वेब सिरीजमध्ये सामील केले जातात. ते बघून दर्शक जेंव्हा ती वस्तू विकत घेतो तेंव्हा त्या व्यवहारातील काही रक्कम वेब सिरीजला मिळते. हा एक प्रकारचा 'आफिलीयेटेड मार्केटिंग' चाच प्रकार आहे. थोडक्यात 'डिजिटल मार्केटिंग' साठी वेब सिरीज एक प्रभावी माध्यम आहे.

हल्ली समाजात इंटरनेट टीव्ही पेक्षा जास्त लोकप्रिय आहे. दिवसातील कितीतरी तास आपण नेटवर असतो. गेम, ताज्या घडामोडी, व्हिडीओ,मेसेजिंग, चॅटिंग आणि सर्वच मनोरंजन स्मार्टफोनवर उपलब्ध असताना टीव्ही बघायची गरज राहत नाही.  नेटफ्लि, हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईम वर आपण दोन प्रकारे मनोरंजन बघू शकतो. प्रिमियम आणि नॉर्मल. प्रीमियम मध्ये जे कालच प्रदर्शित, अत्यन्त लोकप्रिय एपीसोड पैसे मोजूनच बघावे लागते. तर नॉर्मलमध्ये आपल्याला पूर्वीचे एपिसोड निःशुल्क बघायला मिळतात. बहुतेक खासगी टीव्ही कंपन्या वेब सिरीजच्या क्षेत्रात उतरत असल्यामुळे हुकलेल्या मालिकेचा भाग आता आपण इंटरनेटवर बघू शकणार. त्यामुळे भविष्यात वेब सीरिजचीच चलती राहील. दररोज नवीन अप्लिकेशन जसेकी  नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम व हॉटस्टार सारखे वेब सिरीज स्पेस सुरु होत आहेत जिथे आपण वेब सिरीज पाहू शकतो. आज तळागाळात वेब सिरीजचा प्रसार झाला नसला तरी तरुण वर्गात वेब सिरीज बघण्याचं मोठं क्रेझ आहे आणि आगामी काळात अजून वाढणार आहे.

हळूहळू का होईना वेब सिरीज टीव्ही सिरीयलला चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. वर्षोनवर्ष चालणाऱ्या सासू-सुनेच्या षडयंत्राच्या मालिका आता युथ वर्गांना कंटाळवाण्या वाटतं आहे. भारतातील साधारण ७०% लोकसंख्या युवकवर्गाची आहे आणि हा वर्ग कायम ऑन-लाईन असतो. त्यातच सेन्सार बोर्डची कटकट नसल्याने युवकांना आवडेल असं वेब कन्टेन्ट मनोरंजक उद्योगातील कंपन्या टाकत आहेत. आताच उदाहरण बघा, लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांचा कल झुकेल म्हणून निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी वरील चित्रपटाचे प्रदर्शन थांबवलं. पण त्यांच्याच जीवनावर आधारित वेब सिरीज ते थांबवू शकले नाही, वेब सिरीज चालू आहे आणि देश-परदेशातील नेटकरी युवकवर्ग ती बिनरोक बघत आहे.

अक्षरशः साध्या स्मार्टफोनचा उपयोग करून कमी खर्चात एक चांगली सिरीज आपण शूट करून इंटरनेटवर लोड करू शकतो. पण चांगल चित्रण, संगीत, कलाकार आणि  गुणवत्ता असलेल्या सिरीज तरुणांना आवडतात. सरसगट सर्वच जनतेला याच प्रसारण होत नसल्यामुळे वेब सिरीजचा आज घडीला तरी चित्रपट बोर्डासारखी सेन्सार बोर्डची रोकटोक नाही. त्यामुळे निर्माते तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी आवडेल असा मसाला टाकून झटपट वेब सिरीज तयार करून नेटवर टाकत आहेत. शेवटी काय बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.

वेब सिरीजमुळे करियरच्या अनेक संधी चालून आल्या आहेत.  मनोरंजन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकार, निर्माते, दिगदर्शक, संगीतकार यांना या निमित्ताने आपली प्रतिभा दाखविण्याची संधी चालून आली आहे. वेबसिरीजमध्ये चमकून पुढे त्यांना चित्रपटात काम मिळू शकतं. बऱ्यास वेब सिरीजमध्ये एनिमेशन, वेब डिजाईन सारख्या सॉफ्टवेअरचा उपयोग होत असल्याने संगणक क्षेत्रातील युवकांनाही चांगली संधी आहे.



© प्रेम जैस्वाल,  9822108775
(लेखक ESPEE INFOTECH, औरंगाबाद या सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्युट चे संचालक व करियर अडव्हाझर आहेत) 

Thursday, 4 April 2019






वेल्लो 'वॉटर व्हील': गावाकडचे जलचक्र


माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम सांगत कि मानवी शरीर निरोगी आहे किंवा नाही याचा तपास करण्यासाठी डॉक्टर प्रथम ह्रदयाची तपासणी करतात त्याच प्रमाणे एखाद्या देशाचं आरोग्य तपासायचं झाल्यास सर्वप्रथम गाव-खेड्यातील लोकांच जीवनमान बघावयास हवं. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि खरा भारत खेड्यातच आहे. ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी अनेक शासकीय योजना असतात पण त्या कागदोपत्रीच पूर्ण होत असतात,  गावातील गरीब जनतेपर्यंत त्या पोहचतातच असं नाही.  बदलते हवामान आणि बेभरवशाच्या पावसामुळे गाव-खेड्यात पाण्याचा प्रश्न अत्यन्त बिकट होतो. स्वातंत्र्य मिळून आपल्याला ७० वर्ष झालीत. विज्ञानाच्या नवनवीन शोधामुळे मानवाच्या भौतिक सुखात वाढ होऊन देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. आज शहरातील राहणीमान सदाबहार वाटत असलं तरी गावखेड्यातील जनतेला २-३ किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. त्यासाठी त्यांचा दिवसातील बराच वेळ आणि शारीरिक श्रम खर्च होतात.  कमी पावसामुळे पाण्याची पातळी दिवसंदिवस खाली जाते. शासकीय योजनेमुळे गावोगावी शौचालयाच बांधकाम तर पूर्ण होतं पण त्यासाठी आवश्यक पाणी मात्र नसतं. गावाकाठी विहीर असते पण सततच्या भारनियमनामुळे वीज खंडीत होऊन पाणी पुरवठा खंडीत होतो. खास करुन उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या अधिकच बिकट होऊन दुष्काळासारखी परिस्थिती उदभवते.  पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी आवश्यक असते. गावा जवळील पाण्याचा साठा संपल्यामुळे २-३ किमी अंतरावरून पाणी आणावं लागतं. त्यासाठी गावातील लहान-मोठे महिला-पुरुष सकाळीच उठून पाणी वाहत असतात. डोक्यावर, कडेवर पाणी वाहून त्यांना मानेचा, पाठीच्या मणक्याचे आजार उदभवतात. आजार, गरोदरपणी डोक्यावर जड पाण्याचे भांडे वाहने अधिकच धोकादायक असतं. राजस्थानसारख्या राज्यात तर दूर ठिकाणाहुन पाणी आणण्याची सोय व्हावी म्हणून नाईलाजाने काही व्यक्ती दोन लग्न करतात.

पण म्हणतात ना, गरज अविष्काराची जननी असते. एमबीए'च शिक्षण घेत असलेल्या अमेरिकेच्या सिंथिया कोयिंग यांनी भारतासह बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशात पाणी टंचाई समस्येचा सखोल अभ्यास केला. अर्थातच 'जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे.....'.   प्रमाणे त्यांनी बरेच दिवस ज्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे अशा ठिकाणाचे निरीक्षण केलं. विविध देशात पाण्यासाठी डोक्यावर जड ओझं घेऊन वाहणारा कळप बघून त्यासाठी काही तरी करावं म्हणून वेल्लो 'वॉटर व्हिल' चा जन्म झाला.   मग या वॉटर व्हिलचा जगभरात लवकर  प्रसार व्हावा म्हणून त्यांनी भारतातील जगविख्यात प्लास्टिक मोल्डिंग उद्योजक 'नीलकमल'शी संपर्क साधून भारतासाठी या वॉटर व्हीलच्या उत्पादन आणि वितरणाचे हक्क त्यांना दिले. 

आज नीलकमल आणि अमेरिकन वेल्लो संस्थांच्या मदतीने पाणी वाहण्यासाठी सुलभ अशा प्लास्टिक 'वॉटर व्हील' सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कॉर्पोरेट जगातल्या उद्योजक कंपन्या सामाजिक जबाबदारी म्हणून या वॉटर व्हील खेडोपाडी वाटप करत आहेत. वेल्लो या पाणीवाहक वॉटर व्हीलच्या संशोधनामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक खेड्यातील लोकांचे जीवन सुकर झाले आहे. वेल्लो या गोलाकार प्लास्टिक भांड्यामध्ये साधारण ४५ लिटर पाणी असते. यासाठी वापरण्यात आलेलं प्लास्टिक फूडग्रेडचं आहे.  या भांड्याला लोखंडी हॅन्डल लावून आपण त्यास सहज ढकलू शकतो. त्यामुळे कडेवर, खांद्यावर किंवा डोक्यावर पाणी वाहायची गरज पडत नाही. वर्ष २०१५ मध्ये हॅबीटट फॉर हुमानीटी या संस्थेच्या मदतीने सर्वप्रथम हा प्रयोग औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात करण्यात आला. साधारण ३००० गावकऱ्यांना या वॉटर व्हीलचं वाटप करण्यात आलं.  आता ही योजना महाराष्ट्राच्या औरंगाबादसह उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नांदेड आणि रायगड जिल्ह्यामध्येही सूरु झाली आहे. देशातील बँकिंग क्षेत्रात नावाजलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या सीएसआर निधीतून १२००० पेक्षा जास्त कुटुंबाला या वॉटर व्हीलच वाटप केलं. या वॉटरव्हील मुळे खेड्यातील जनतेच्या वेळेची बचत होऊन, अनेक आजार कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावले आहे.  पाण्याची ने आन अगदी सोपं झाल्यामुळं बांधकाम किंवा इतर ठिकाणी या व्हीलचा खूप वापर होत आहे. हा एक खरा सामाजिक विकासच म्हणायला हवा.

उद्योगातील सीएसआर निधीचा योग्य उपयोग व्हावा :

सामाजिक जबाबदारी आपल्या हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिली आहे. आपल्या मिळकतीचा थोडा भाग का होईना तो समाजातील गरजू साठी दान करने ही आपली संस्कृतिच. प्राचीनकाळी मौर्यांच्या इतिहासात प्रसिद्ध तत्वज्ञानी कौटिल्यांनी व्यवसायात सामाजिक जबाबदारीचे महत्व पटवून दिले होते.  उद्योग व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आपल्या वस्तू-सेवेची विक्री करून प्रचंड नफा कमवत असतात.  तो कमवत असलेला नफा त्यांना समाजातूनच मिळत असतो. त्यामुळे त्यांनाही एक सामाजिक जबाबदारी असतेच, त्यास कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी [सीएसआर] असे म्हणतात.   प्रसिद्ध उद्योजक घराणे टाटा, बिर्ला, सिंघानिया आणि बजाज यांनी आपला उद्योग वाढवत असताना सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक धर्मदाय संस्था सुरु केल्या आहेत. ज्यात शैक्षणिक तसेच आरोग्य संस्था सामील आहेत.

वर्ष २०१२ च्या कंपनी कायद्याप्रमाणे साधारण एक उद्योग आपल्या सरासरी त्रेवार्षिक उत्पनाचा २% पैसा सीएसआर वर खर्च करत असतात.  प्रत्येक उद्योगाकडे दर वर्षी काही सीएसार बजेट असतं. यातील बराच निधी शहरी काम जसेकी शहरातील चौकांची रंगरंगोटी, बागेतील खेळणी, रस्ते दुभाजक अशा कामासाठी खर्च होतो. काही उद्योजक नको ती कटकट म्हणून चक्क तो निधी एखाद्या समाजिक संस्थेला दान करून मोकळे होतात. तेंव्हा आज गरज आहे कि उद्योजक तसेच सामाजिक संस्थेनी गाव-खेड्यातील समस्येकडे जातीने लक्ष देऊन ग्रामीण जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करावा. तसेच कॉर्पोरेट उद्योजकांनी आपला सीएसआर निधी इतरत्र खर्च न करता गाव-खेड्यातील जनतेसाठीच खर्च करावा. असे झाले तर खरोखरच गरीब जनतेचं कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही. 


© प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com
(आपण माझा हा लेख नावासह शेअर करू शकता )



Monday, 4 February 2019



डिजिटल मार्केटिंग

                                          - प्रेम जैस्वाल

समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख आणि शहाण्या माणसाची लक्षणं सांगताना 'आपली आपण करी स्तुती......तो येक मूर्ख ||' असं सांगितलं आहे. समर्थ सांगतात कि लोकांनी स्वतःची स्तुती करू नये कारण असे करणे म्हणजे स्वतःची एक प्रकारची जाहिरातच केल्यासारखं होईल. आणि ते मूर्खपणाचे लक्षण आहे. पण आज जर समर्थ रामदास पृथ्वीवर अवतरले तर त्यांना खूपच वेगळं चित्र बघायला मिळेल.  इतरांपेक्षा आपणच कसे चांगले हे पटवून देण्याऱ्या लाखो जाहिराती त्यांना  ठिकठिकाणी बघायला मिळतील. या जाहिराती म्हणजे मार्केटिंगचाच एक भाग आहे. 

स्पर्धेच्या युगात व्यवसायात प्रगती करण्यासाठी मार्केटिंगशिवाय पर्याय नाही. आपण विकत असलेली वस्तू किंवा सेवा अतिउत्तम असली तरी तेव्हढ्याने भागत नाही.  त्या वस्तूची सविस्तर माहिती सतत लोकापर्यंत पोहचवून विक्री वाढवण्याचं महत्वाचं काम मार्केटिंग करत असते. विक्री वाढवायची असेल तर मार्केटिंग आवश्यकच. मार्केटिंग विक्रीसाठी पायघड्या (पायदान)टाकत असते.  त्या पायघड्यावरच विक्री पुढं पुढं जात असते. मार्केटिंगचे इतर अनेक फायदे आहेत. व्यवसायाचं उद्योगविश्वात नाव वाढवण्यासाठी, मार्केटमध्ये काय स्थिती आहे हे माहित करून घेण्यासाठी, ग्राहकांमध्ये वस्तू-सेवाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी, व्यवसाय वृद्धीसाठी, स्पर्धकाची माहिती मिळविण्यासाठी  आणि  ग्राहकाना समजून घेण्यासाठी मार्केटिंग आवश्यक आहे.

बदलत्या युगात मार्केटिंगच्या तंत्र आणि मंत्रात आमूलाग्र बदल घडले आहे. काही दशकांपूर्वी मार्केटिंग 'प्रोडक्ट ओरियन्टेड' होती.  म्हणजे आहे त्या तयार वस्तू बाजारामध्ये विकल्या जायच्या.  ग्राहकाच्या आवडी-निवडी महत्वाच्या नव्हत्या. कालांतराने त्यामध्ये बदल होऊन आज 'कस्टमर ओरिएंटेड' मार्केटिंग म्हणजे ग्राहकाच्या आवश्यकतेप्रमाणेच माल तयार करून तो बाजारामध्ये विक्री होतं आहे. ग्राहकराजा आता उद्योगाच्या केंद्रस्थानी आहे.  कोणत्याही व्यवसायामध्ये मार्केटिंग ह्रदयाप्रमाणे सर्व विभागांना रक्तामार्फत प्राणवायूचा पुरवठा करून त्यांना सतत कार्यान्वित ठेवण्याच महत्वाचं काम करत असते. अमेरिकन लेखक फिलिप कोटलर ज्यांनी मार्केटिंगवर अनेक पुस्तक लिहिली त्यांना 'फादर ऑफ मार्केटिंग' असे म्हणतात.  पंतप्रधान मोदीजींना नुकताच 'फिलीप कोटलर' अवॉर्ड  देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

डिजिटल क्रांतीमुळे मार्केटिंगमध्ये बदल होणे साहजिक होते.  इंटरनेटमुळे जगाला खेड्याच रूप आलं.  वाढत्या स्मार्टफोन व समाजमाध्यमामुळे आपसातील संवादाला अफाट गती प्राप्त झाली. मोबाईल व इंटरनेटचे वाढते प्रस्थ बघून सर्वच वस्तू इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. आज जन्मापासून अंतिम संस्कारासाठी सर्व जीवणोपयोगी  वस्तू इंटरनेटवर ऑन-लाईन उपलब्ध आहे. भारतात स्मार्टफोन धारकाची संख्या ४० कोटी आहे. प्रत्येक ग्राहक सतत स्क्रीनशी जुळल्यामुळे विक्रेत्याला इंटरनेट व मोबाईलवर जाहिरात करणे क्रमप्राप्त झाले आहे.  कंप्युटर, इंटरनेट व मोबाईलसारख्या डिजिटल उपकरनाद्वारे केल्या जाणाऱ्या जाहिरातीलाच ' डिजिटल मार्केटिंग' असे म्हणतात.

आज सगळीकडे डिजिटल मार्केटिंगची चर्चा होत असली तरी याची सुरुवात कित्येक वर्षांपूर्वी झाली आहे.  डिजिटल मार्केटिंगची सुरुवात कुणी केली या बद्दल भिन्न मतं आहेत. गुग्लियीमो मार्कोनीने रेडिओचा शोध लावला मग त्यावर येणाऱ्या जाहिराती ह्या डिजिटल मार्केटिंगची सुरुवात असा माननारा एक वर्ग आहे. तर १९७१ मध्ये स्वतःलाच पहिला ई-मेल  पाठवणारा रे टोमलिंसनलासुद्धा डिजिटल मार्केटिंगचा जनक माननारा एक वर्ग आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हि संज्ञा जरी खूप नंतर आली पण त्याची सुरुवात खूप पूर्वी झाली असं समजायला हरकत नाही. अस असलं तरी खरी डिजिटल मार्केटिंगची सुरुवात १९९० मध्ये इंटरनेटवर पहिला सर्च इंजिन आलं तेंव्हा पासून झाली. त्यानंतर काही वर्षांनी वेबची सुरुवात झाली. १९९३ मध्ये पहिली जाहिरात इंटरनेटवर झळकली. वेबसाईटवर जाहिरात करणारी 'हॉटवायर्ड' पहिली कंपनी ठरली. १९९४ मध्ये याहू त्यानंतर हॉटबॉट, लुकस्मार्ट आणि अलेक्सा अवतरल्या.  या विविध टूलमुळे आपली वेबसाईट सर्वात वर दिसावी म्हणून 'सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन'  हा प्रकार सुरू झाला. जगविख्यात गुगलने १९९४ मध्ये या क्षेत्रात प्रवेश केला आणि डिजिटल मार्केटिंगला उसंत मिळाली. वर्ष २००० नंतर गुगलच्या एडवर्ड तसेच वर्डप्रेसचा इंटरनेटवर प्रवेश झाला. अमेरिकेतील विविध उद्योगाची सविस्तर लिखित माहिती तयार करून ती वेबसाईटवर टाकण्याचे काम वर्डप्रेस करत असे.

डिजिटल मार्केटिंग का?

इतर माध्यमाच्या तुलनेने डिजिटल मार्केटिंग करणे खूप स्वस्त आहे. त्यासाठी खूप पैसे खर्च करावा लागतो असे नाही.  मोठया उद्योगापासून अगदी गल्लीतील लहान दुकानदार डिजिटल मार्केटिंग करून आपला व्यवसाय वाढवू शकतो. आपली सुंदर वेबसाईट तयार करून ती माहिती ग्राहकापर्यंत सहज पोहचवू शकतो.  आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणचे ग्राहकांचा प्रतिसाद व प्रतिक्रिया काय याचा अंदाज बांधता येतो.  ठराविक क्षेत्रातील, ठराविक वयोगटातील, विशिष्ट क्षेत्रातील ग्राहक, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडीच्या वेबसाईट्स आणि त्यांच्या सोयीच्या वेळाच पक्का अंदाज बांधून कमी खर्चात डिजिटल मार्केटिंग आपण करू शकतो. असं करणं म्हणजे मशीनगन न वापरता रायफलने निशाणा साधल्या सारखा प्रकार आहे.  डिजिटल मार्केटिंगचे ५० पेक्षा जास्त टूल आज उपलब्ध आहेत पैकी काही महत्वाचे टूल्स खालील प्रकारे -

१. फेसबुक : डिजिटल मार्केटिंगमध्ये फेसबुक सर्वांच्या आवडीचं टूल आहे. फेसबुक पेज तयार करून, आपल्या वस्तू-सेवेचा नेमका ग्राहक, ठिकाण, खर्चाचा बजेट याच गणित करून फेसबुकवर कमी किमतीत जास्त जाहिरात होऊ शकते.
२. गुगल अडवर्ड : हे टूल पूर्णतः कि-वर्डवर अवलंबुन आहे. तुमच्या व्यवसाय किंवा ब्रँडच नाव स्पर्धकांच्या आधी समोर यावं यासाठी यावर बोली लावली जाते. त्यानुसार गुगलला पैसे मिळतात.
३.गुगल अनालीटिक्स: गुगलचं हि फ्री सर्विस आहे. याद्वारे गुगलला कोणत्या पेजला कोणते ग्राहक, किती वेळ व्हिजिट, तिथे किती वेळ थांबतात हे माहित पडतं. त्यामुळे आपला संभाव्य ग्राहक कोण याची माहिती मिळते.
४ इंटरनेट मार्केटिंग : हा सर्वांच्या परिचयाचा ऑन-लाईन मार्केटिंग प्रकार आहे. विविध वस्तूच्या जाहिराती इंटरनेटवर दर्शवून त्या विकणे.
५.व्हिडीओ मार्केटिंग : विविध वस्तू किंवा सेवा उपभोगत असलेल्या ग्राहकांचा व्हिडीओ, टेस्टीमोनी युट्युबवर दाखऊन त्याची जाहिरात करणे.
६ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेन्ट : आपल्या ग्राहकांचा डाटा तयार करून सतत त्यांच्याशी भावनिक संवाद साधणे, डाटा नियमित अपडेट करणे, नवीन वस्तू त्यांना ऑफर करणे इ.
७.डाटाबेस काँटॅक्टस :ग्राहकाला टेली-कॉलिंग करणे तसेच एसएमएस पाठवणे.
८.पीपीसी: म्हणजे पे पर क्लिक. आपल्या वेबसाईटवर जेव्हडे क्लिक होतील त्यानुसार आपल्याला पैसे लागतील, असा हा प्रकार.
९. डाटा मायनिंग : आपल्याकडे असलेल्या डाटा योग्य प्रकारे तपासून उत्कृष्ट मार्केटिंग आखणे. कोणत्या ग्राहकाला विक्री होत आहे तो डाटा तयार करणे.
१०सोशलमेडिया : फेसबुक, ट्विटर, गूगल+,पीइंट्रेस्ट, इंस्टाग्राम, लिंकडिन आणि युट्युबच्या जाहिराती या सोशलमेडिया जाहिराती असतात.
१०. लिंक बिल्डिंग : आपल्या ग्राहकाला ओळखून त्याच्या संबंधित लिंक शेअर करून त्यामध्ये आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करणे.
११. अफिलीयेटेड मार्केटिंग : आपला ब्लॉग तयार करून त्यामध्ये 'कि-वर्ड' चा उपयोग करून आपण पैसे कमवू शकता.

आजघडीला एव्हडे टूल उपलब्ध असले तरी ग्राहकाच्या बदलत्या आवडीनुसार त्यामध्ये सतत बदल होत आहेत. 

मार्केटिंग आणि युद्धात जास्त फरक नाही.   ग्राहकाचा चार इंचाच मेंदू जिंकण्यासाठी सर्व कंपन्या युद्धाप्रमाणे मार्केटिंग करत असतात. युद्धात ज्याप्रमाणे भूदल, जलदल व वायुदल  आणि युद्ध जिंकण्यासाठी शेकडो शस्त्र असतात, त्याचप्रमाणे मार्केटिंगमध्ये लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत असतात.  जसेकी वृत्तमानपत्र, टेलेकॉलिंग, टीव्ही, होर्डिंग, पांप्लेट, बूथ कॅम्पेन व डिजिटल जाहिरातीचा उपयोग होतो. शेवटी कोणत्या ग्राहकांसाठी कोणता पर्याय चांगला हे विक्रेत्याने ठरवायचे असते.

आज देशातील उद्योग व्यवसायात मराठी टक्का पाहिजे तेव्हढा नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मराठी उद्योजकांची संख्या खूप कमी आहे. कदाचित मराठी माणसाला जाहिरात हा प्रकार आवडत नसावा. हा संस्काराचा भाग असू शकतो. माझ्या मते, एखाद्या वस्तूच्या विक्रीमुळे खरोखरच ग्राहकांचा फायदा होऊन समाज आणि देशाचं हित साधत असेल तर त्या वस्तूची जाहिरात करण्यात काहीच गैर नाही.  संभाव्य ग्राहकच स्मार्टफोनवर उपलब्ध असताना सोपा मार्ग टाळून पारंपरिक खर्चिक मार्गाचा अवलंब करणे अत्यन्त चुकीचे होईल.  स्वतः जाहिरात करता येत असेल तर अति उत्तमच.  आज सर्व मुख्य शहरात डिजिटल मार्केटींची सेवा देणारे सल्लागार उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांची मदत  घेणे कधीही फायद्याचेच. आज  'महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र' पुणे सारख्या शासकीय संस्था कमी शुल्कात 'डिजिटल मार्केटिंग' चे प्रशिक्षण देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. व्यवसाय कोणताही असो, आज गरज आहे सर्वांनी इतर मार्केटिंग माध्यमासह डिजिटल मार्केटिंगच कौशल्य आत्मसात करण्याची, बदल स्वीकारण्याची व स्वतःला अपडेट करण्याची. सर्वात महत्वाच म्हणजे उद्योग-व्यवसायात करोडोची उलढाल करून देशाच्या प्रगतीस आपलाही हातभार लावण्याची.





Wednesday, 30 January 2019









डिजिटल उपकरणे आणि अर्थिंगच महत्व


दैनंदिन जीवनात आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही, ऑडिओ सिस्टीम, रेफ्रिजरटर, वॉशिंग मशीन, एसी, तसेच ऑफिसमध्ये कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर,  युपीएस, वॉटर फिल्टरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळत असतो. हल्ली सर्वच इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये थोडंफार इलेक्ट्रॉनिक्स भाग असतोच. मग यापैकी डिजिटल उपकरणे आपण कशी ओळखायची ?

तर वरील सर्व उपकरण चालूबंद करण्यासाठी एक पॉवरबटन असतं.  वरील सर्व उपकरणाच्या पॉवर ऑन-ऑफ बटनाकडे बघितलं तर लक्षात येईल की काही ठराविक उपकरणाच्या बटनावरचं एक गोल मोठी रिंग ' ० 'असते आणि त्यावर ' I ' असा मार्क असतो.  अशी खुन असलेली उपकरण म्हणजेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असलेली उपकरण.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन प्रकार असतात, एक ऍनॉलॉग आणि दुसरा डिजिटल. ऍनॉलॉग हे जुन्या पद्धतीचे उपकरण ज्याचे सर्व पार्ट ऍनॉलॉग असतात. वाहणार करंट किंवा माहिती हि ऍनॉलॉग असते. डिजिटल उपकरणात वाहणारी माहिती हि हाय आणि लो स्वरूपात असते.  हाय म्हणजेच वन (1) आणि  लो म्हणजे झिरो (०)   अशा स्वरूपात असते.  मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, स्कॅनर, टॅब, एलसीडी टीव्ही हे सर्व डिजिटल उपकरण आहेत. या डिजिटल उपकरणात डिजिटल आयसी, मायक्रोप्रोसेसरसारखे नाजूक पार्ट जोडलेले असतात. हे सर्व उपकरण डिजिटल आहेत हे लक्षात यावं म्हणून 'पॉवर ऑन-ऑफ' हे एकसारखं म्हणजे फोटोतं दाखविल्याप्रमाणं असतं. या सिम्बॉलमध्ये एक मोठा 'झिरो' आणि '1' दडलेला आहे. डिजिटल उपकरण वापरायला नाजूक असतात त्यामुळं त्या उपकरणाला योग्य अर्थिंग देऊनच वापर करावा.

अर्थिंग म्हणजे काय ?

घरगुती वा कार्यालयात आपण वापरत असलेल्या विजेच्या उपकरणाच्या थ्री पिन पॉवरप्लगची एक पिन जाड आणि लांबीला थोडी पुढं आलेली असते. कोणतेही विद्युत उपकरण चालण्यासाठी मुख्यतः फेज (+ तांबडी)  आणि न्यूट्रल (- काळी) ह्या दोन तारचं आवश्यक असतात.  त्या दोन तारेमधूनच कोणत्याही उपकरनाला विद्युतपुरवठा मिळत असतो. देशातील सर्व विद्युत महामंडळ आपल्याला दोनच तारेतूनच वीजपुरवठा करत असतो.  थोडक्यात त्या  'लहान दोन पिन' जरी पॉवर सॉकेटमध्ये टाकल्या तरी उपकरण काम करतं. मग प्रश्न पडतो ती तिसरी पिन कशासाठी  ?  आपल्या वास्तूत बाहेरून दोन तारेचा वीजपुरवठा आल्यानंतर ' इलेक्ट्रिशियन'  त्यात तिसरी तार जोडतात. हि तिसरी तार त्या 'जाडजूड लांब पिन' मधून आपण वापरत असलेल्या उपकरणाच्या बॉडीशी जोडलेली असते. ह्या तारेच दुसरं टोक त्या त्या वास्तूच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून जमिनीत गाडल्या जाते. त्यालाच 'बिल्डिंगची अर्थिंग' असे म्हणतात. त्या तारेचा रंग सहसा हिरवा असतो.  सुरक्षितता आणि अपघात टाळण्यासाठी हि तिसरी तार खूपचं महत्त्वाची असते. ती शास्त्रीय पद्धतीनं केलेली असेल तर विद्युतप्रवाह उपकरणात उतरून लागणारा 'शॉक' तुम्ही टाळू शकता. विद्युत पुरवठा जरी महामंडळाची जबाबदारी असली तरी अर्थिंगची जबाबदारी हि त्या त्या घर-इमारत मालकाची असते. सुरक्षितता म्हणून अत्यंत योग्य अर्थिंग करणे अत्यावशक आहे.

उदाहरणार्थ, जर आपनं लोखंडी पत्रा असलेला कुलर वापरत असाल तर कुलरचा पंखा, पंप चालण्यासाठी दोन तारा (सहसा: तांबडी, काळी) पुरे. पण त्यामुळं कुलरमध्ये बिघाड होऊन विद्युतप्रवाह कुलरच्या बॉडीच्या पत्र्यात उतरला तर आपल्याला शॉक लागून अपघात घडू शकतो. म्हणून आपल्या सुरक्षेसाठी ती तिसरी (हिरवी तार) त्या बॉडीशी जोडल्या जाते. हि जाडजूड पिन म्हणजेच 'अर्थिंग पिन.' मग  ही अर्थिंगची पिन मोठी आणि लांब ठेवण्याचा उद्देश काय?  तर, तुमचं उपकरण सुरु होवो वा न होवो प्लग सॉकेटमध्ये टाकताच उपकरणाला अर्थिंग मिळणे आवश्यक. तुमची सुरक्षितता ही प्राथमिकता.  त्यामुळे पिन लांब असल्यानं पॉवरसॉकेटमध्ये प्लग टाकताच आधी उपकरणाला संपर्क अर्थिंगला होतो, नंतरच उपकरणाला वीज! शिवाय ती अर्थिंग पिन सॉकेटमध्ये घट्ट चिपकून रहावी म्हणून किंचितशी जाड व लांब असते.

मग प्रश्न पडतो कि बाजारात मिळणाऱ्या बरीच उपकरन जसेकी ट्रीमर, हेअर ड्रायर, स्टीमर,  शोभेच्या माळा, लायटिंग प्लगला दोनच पिन का असतात ? कारण त्या उपकरनाची बॉडी प्लास्टिक, लाकूड किंवा काचेची असते . त्यामुळं बॉडीमध्ये करंट उतरून शॉक लागण्याचा धोका नसतो.  पण आपल्या घरातील पाण्याची मोटर, कुलर, हिटर, गिझर, वॉटर फिल्टर, अव्हन आणि इतर उपकरणाला अर्थिंग आवश्यक असते. विजेचे वाढते अपघात लक्षात घेता आपण राहत असलेल्या इमारतीची, कार्यालयाची अर्थिंग आपल्या इलेक्ट्रिशयनद्वारे उत्तम प्रकारे करून घेणे 'अत्यन्त महत्वाचे' आहे. तसेच विजेची उपकरण वीज बंद करून काळजीपूर्वक हाताळणेच योग्य आहे. एव्हडच नाही तर, अर्थिंग व्यवस्थित असेल तरच आपण वापरत असलेले संगणक, लॅपटॉपसारखे नाजूक उपकरण चांगले काम करतील. थोडक्यात कोणतेही उपकरण चांगले चालण्यासाठी आणि सुरक्षेसाठी त्या त्या वास्तूची 'अर्थिंग' उत्तम असणे आवश्यक आहे. अर्थिंगमुळे डिजिटल उपकरणाची कार्यक्षमता वाढून त्याचं आयुष्य वाढत.

© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com

{हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही}

Tuesday, 1 January 2019












डिजिटल युगातील संभाषणकौशल्य


दि.५ जुलै, २०१८ ची हि घटना. आदर्श श्रीवास्तव नावाचा युवक अवध एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करत होता. त्याच्या लक्षात येतं की त्यांच्या बोगीमध्ये लहान वयाच्या २६ मुली (ज्या १० ते १४ वयाच्या) प्रवास करत आहे. मुली खूप घाबरलेल्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती दिसत होती. आदर्शला तो मानव तस्करीसारखा प्रकार वाटला. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या मोबाईलवरून रेल्वे प्रशासन, रेल्वेमंत्री आणि पंतप्रधाना ट्विट करून ती माहिती दिली. त्यांना काही मिनिटात रेल्वेकडून कारवाईबद्दल आश्वासन मिळालं. रेल्वे प्रशासनाची सूत्र विद्युतगतीने हालली. पुढच्याच स्टेशनला साध्या वेशातील रेल्वे पोलिस गाडीत चढले. गुंडांना ताब्यात घेऊन त्यानी त्या मुलींना मुक्त केलं. गुंडावर कठोर कायदेशीर कार्यवाही करून मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं.  हे कसं घडलं असेन? ट्विटरद्वारे एका क्षणात घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. घटनेच गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. काही मिनिटात माहितीच देवाण-घेवाण झालं आणि गुन्हेगार पकडल्या गेले. कशामुळं हे शक्य झालं असेन ? अर्थात एकविसाव्या शतकातील डिजिटल क्रांतीमुळे.

संभाषण म्हणजे कम्युनिकेशन या शब्दाचा उगम कॉमन या शब्दापासून झाला. दैनंदिन जीवनात आपण सतत संवाद करत असतो. हा संवाद कधी बोलका असतो तर कधी 'शब्दाविण संवादु'  म्हणजे फक्त देहबोली. दुसरा संवाद हा लिखित स्वरूपात असतो.  लिखित संवाद हे दोन प्रकारचे, अनौपचारिक आणि औपचारिक.  मित्रमंडळी, आप्त नातेसंबंधाशी होणारा अनौपचारिक पत्रव्यवहार हा प्रकार आता इतिहास जमा झाला आहे. आता फक्त शालेय अभ्यासक्रमातच तो बघावयास मिळतो.  अत्यल्प कॉलदरामुळे संवाद वाढून पत्रलेखन बंद पडलं. अनौपचारिक संभाषणाची जागा समाजमाध्यमांनी घेतली आहे.  व्हाटसप, फेसबुकमुळे नातेसंबंधातील व्यक्तीचे ग्रुप तयार होऊन क्षणाक्षणाच्या माहितीची देवाण-घेवाण होत असते.  त्यामुळे अनौपचारिक पत्रलेखनाची आता गरज उरली नाही.

दुसरा प्रकार म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार. कोणत्याही शासकीय वा खासगी संस्थेसंबंधित पत्रव्यवहार या प्रकारात मोडतात.  या संस्था किंवा उद्योगाच्या कार्यालयामध्ये दोन प्रकारचे संवाद होत असतात. संस्थेच्या आत होणारे रिपोर्टींग, नोटीस, मेमो, सरकुलर हा लिखित तर  उच्चधिकारी, सहकारी आणि इतर कर्मचारीसोबतच्या बैठका, चर्चा, प्रेझेंटेशन संवाद हा अंतर्गत संवाद तर व्यवहारनिम्मित इतर जगाशी साधला लिखित-अलिखित  संवाद म्हणजे बाह्यसंवाद. त्यामध्ये एक प्रकारची औपचारिकता असते. संस्थेतील सर्व पत्रव्यवहार हे लिखित स्वरूपाचे असणे आवश्यक असते परंतु डिजिटल क्रांती आणि 'पेपरलेस ऑफिस'  संकल्पनेमुळे सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात झाले आहे. पूर्वी पेपरला असलेले महत्व आज 'डाटा' ला आहे.  एखाद्या संस्था किंवा उद्योगाची सर्व माहिती हि डिजिटल डाटा स्वरूपात वाहत असते. त्याची गती आणि क्षमता वाढावी म्हणून वारंवार त्याशी संलग्न हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर 'अपडेट' केले जाते. त्यामुळे एखाद्या कार्यालयाचा डाटा हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे त्याची सुरक्षितता अत्यन्त महत्वाची असते.  संस्थेचे कार्यालय विविध शहरात  असतील तर त्यासाठी वेगवेगळे नेटवर्क वापरले जातात.  त्याला लोकल एरिया नेटवर्क (लँन) किंवा वाईड एरिया नेटवर्क (वॅन) असे म्हणतात. एका इमारतीतील सर्व विभागातील संगणक एकमेकांशी जोडण्यासाठी लँन चा उपयोग होतो तर विविध शहरातील कार्यालय वॅनने जोडलेली असतात. नेटवर्कमुळे कार्यालयातील माहितीची देवाण-घेवाण गतीने होऊन कार्यक्षमता वाढते. हल्ली कंप्युटरची जागा मोबाईलने घेतल्यामुळे कंप्युटरवरची सर्व कामे मोबाईलवर शक्य झालं आहे. थोडक्यात एका मोबाईलमध्ये अख्ख् कार्यालय सामावलेलं असतं. खूपच मोठी  उद्योगसंस्था असेल तर त्यांच्याकडे SAP प्रणाली असते ज्यामध्ये एखाद्या उद्योगाचे सर्व कार्यालयातील संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे माहितीच देवान-घेवाण जास्त गतीने घडून कार्यक्षमता वाढते.

ऑफलाईनपेक्षा जास्त महत्व ऑनलाईनला आल्यामुळे मनुष्यबळा एव्हडच महत्व संगणक आणि सॉफ्टवेअरचा आलं आहे. कंपन्याच्या व्यवस्थापनात त्यामुळे प्रचंड बदल झाले आहे. सर्वच ग्राहक ऑनलाईन झाल्यामुळे पारंपरिक वृत्तमानपत्रातील जाहिराती कमी होऊन त्याची जागा आता डिजिटल मार्केटिंगने घेतली आहे. त्यामुळे फेसबुक, गुगल ऍड, ट्विटर, लिंकडिन इत्यादी टूलचा जाहिरातीसाठी जास्त उपयोग होत आहे.  त्यामुळे वृत्तमानपत्रापेक्षा जास्त जाहिराती आज स्क्रीनवर चालू असतात.  खरेदी करणे इतके सोपे कि २-३ क्लिक आणि ती वस्तू दारात हजर. साहजिकच पूर्वीप्रमाणे वस्तू खरेदी साठी पर्चेस ऑर्डर, कोटेशन, बिल, रिसिप्ट अशा पेपरची गरज राहिली नाही.  हे ऑफलाईन पत्रव्यवहार आता कमी होऊन काही दिवसांनी इतिहासजमा होतील. 

कमी कॉलरेटमुळे लँडलाईन, इंटरकॉमचा मागे पडून मोबाईलचा वापर वाढला आहे. आज एखादा पेपर सकॅनिंग करून फॅक्स करण्यासाठी मोबाईल पुरे. ऑडिओ-व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमुळे आज खाजगी कंपन्याच्या मुलाखती ऑनलाईन झाल्या आहेत.  त्यामुळे खर्चात कपात होऊन कामास गती मिळते.   व्यवहारसंबंधित बैठकाची जागा  विडिओ कॉन्फरन्सिंगने घेतली आहे. हल्ली संस्थेत सुद्धा  मॅनेजर आपापल्या सहकाऱ्यांचा व्हाट्सआप ग्रुप तयार करतात. त्यामुळे  क्षणात एक संदेश सर्व सहकार्यांना पोहचतो. पेपरलेस ऑफिस आणि कॅशलेस व्यवहारामुळे पूर्वीप्रमाणे पेपर-फाईल कपाट, स्टोअररूमची आता गरज नाही. त्याची जागा आता  डाटा स्टोअर करणाऱ्या सर्व्हरने घेतली आहे तर मानवी सेक्युरिटीची जागा सायबर सेक्यूरिटीने घेतली आहे. माहितीचं महत्व वाढल्यामुळे सायबर अटॅकचा धोका वाढला आहे. तसं होऊ नये म्हणुन योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते.  डिजिटल क्रांतीमुळे कॉर्पोरेट विश्वामधील संभाषणात आमूलाग्र बदल होऊन संभाषणासाठी आता नवनवीन टूलचा उपयोग होत असतो. त्यापैकी काही खालीलप्रमाणे :

1.  कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट : आपल्या ग्राहकांचा डाटा तयार करून सतत त्यांच्या संपर्कात रहाणे, ग्राहकाकडून प्रतिक्रया घेणे, कंपनीच्या ऑफर त्यांना माहित करणे. त्यामुळे ग्राहकांशी मजबूत संबंध निर्माण होतात. त्याचा फायदा विक्री वाढवण्यासाठी होतो. मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स 365 हे सर्व
परिचित सीआरएम टूल आहे.

2. सोशल इंट्रानेट सॉफ्टवेअर : हे नेटवर्क त्या संस्थेपुरते मर्यादित असते. लहान मोठ्या उद्योगातील अंतर्गत किंवा बाह्य पत्रव्यवहार आता पेपरलेस झाले आहे.  त्यामुळे कंपनीच्या नोकरवर्गातील होणारा पत्रव्यवहार संग्रहित करण्यासाठी किंवा पाहिजे तेंव्हा सामूहिक करण्यासाठी व तो सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

3 स्काईप : विश्वभरातील उद्योगधंद्यात वापरला जाणारा स्काईप हा महत्वाचा टूल आहे. आपल्या विविध विभागातील सहकार्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधण्यासाठी स्काईपचा उपयोग होतो. हल्ली सर्व उद्योगामध्ये स्काईपचा जास्त वापर होतो.

4. संयुक्तिक संभाषण : उद्योगविश्वात पारंपरिक पद्धधतीने मिटिंग घेणे खूप वेळखाऊ तसेच खर्चिक असतं. तसेच त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो.  हल्ली सर्व नोकरवर्गाकडे मोबाईल असल्यानं व्हिडीओ कॉन्फरन्स, कॉल कॉन्फरन्स, डेस्क-टॉप शेअरिंग, इन्स्टंट चॅटिंग हे नवीन टूल वापरले जातात.त्यामुळे क्षणा क्षणाची माहिती प्राप्त होऊन त्यावर लगेच योग्य निर्णय घेतला जातो. त्यामुळे खर्च तसेच वेळेची बचत होते.

5.फाईल शेअरिंग सर्विसेस : इ-मेलद्वारे फाईल शेअर करताना जास्त मोठा डेटा असलेली फाईल आपण शेअर करू शकत नाही अशा वेळेस फाईल शेअरिंग सर्विस हा चांगला पर्याय आहे. मायक्रोसॉफ्टचा वन ड्राईव्हचा वापर करून आपण फाईल शेअरिंग करू शकतो.

6. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम : एखाद्या नविन प्रोजेक्ट संबंधित कामात सुसूत्रता आणण्यासाठी, नोकर-कर्मचाऱ्यांना प्रोजेक्टच्या विविध टप्प्याची माहिती देण्यासाठी,  कामाच्या प्रगती बद्दल अवगत करण्यासाठी या सिस्टीमचा उपयोग होतो.

नवीन तंत्र अंगिकारण्यात खाजगी संस्था खूप पुढे असतात. पण आज उशिरा का होईना शासकीय कार्यालयसुद्धा आता कात टाकत आहेत. आज जवळजवळ सर्व शासकीय कार्यालय संगणकीकृत झाल्यामुळे  सरकारी कामाला गती मिळाली आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी पूर्वीप्रमाणे कचेरीचे उंबरठे झिजवायची गरज पडत नाही. अगदी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन एफआयआर आज स्वीकारला जातो. पूर्वी कचेरीतून साधं रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी कितीतरी अडचणी यायच्या. आठवडा-पंधरा दिवसाचं काम काही शुल्क भरून एक-दोन दिवसात होणे शक्य झालं आहे. पारपत्र काढण्यासाठी एका दिव्यातून जावं लागतं असे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करता नाकीनऊ यायचा. पारपत्राची कटकट म्हणून 'नको ती परदेशवारी' म्हणत अनेकांची परदेशवारी हुकली. आज ऑन-लाईन अर्ज करून काही दिवसात पारपत्र घरी येतो. याच बरोबर मतदानकार्ड, आधारकार्ड काढणे किंवा त्यामध्ये दुरुस्त्या करणे अत्यन्त सोपं झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये ₹५० दिले तर घरपोच प्रमाणपत्र मिळण्याची सोय झाली आहे.  सर्वच कार्यालय ऑन-लाईन अर्ज स्वीकारत असल्यामुळे सामान्य जनतेला 'सरकारी काम काही महिने थांब' पासून मुक्ती मिळाली आहे. संगणकीकरनामुळे शासकीय कार्यालयातील अंतर्गत पत्रव्यवहाराला गती मिळाली आहे. त्यामुळे जनतेची कामे 'लाल फितीत' अडकत नाहीत.

डिजिटल युगात लिखित संभाषणासाठी आपण ई-मेल, टेक्स्ट, व्हाटसप, फेसबुक, ईनस्टाग्रामसह अनेक ऍप वापरत असतो.  प्रत्यक ऍपच आपलं आपलं महत्व आहे. पण ते वापरत असताना त्याची क्षमता व त्रुटी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.  इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ट मुळे येणाऱ्या दशकात संभाषण फक्त मनुष्यजातीपुरते मर्यादित न रहाता आपल्या सभोवतालच अख्ख विश्व एकदुसऱ्याशी संवाद साधेल.  या ' इंटरनेट ऑफ थिंग्स' मुळे जगभरातील करोडो उपकरणे इंटरनेटला जोडल्या जातील. त्यामुळे उपकरनाचा आपापसातील संवाद वाढेल त्यामुळे संभाषणाची व्याख्याच बदलून जाईल. पाश्चिमात्य देशामध्ये याची सूरवात झाली आहे.

ज्या गतीने तंत्रज्ञानात बदल घडत आहेत त्यावरून एक नक्की कि आजच तंत्रज्ञान किती दिवस टिकेल याची खात्री नाही. नवनविन संशोधनामूळे त्यात अनेक बदल घडत जातील. त्यामुळे त्यापासून दूर न जाता त्याशी जुळवून घेण्यातच सर्वांचं भलं आहे. 'जून ते सोनं' ह्या म्हणीत बदल करून डिजिटल युगात वावरताना 'नवं ते घेणं' हेच बरोबर आहे. आजही वयाची चाळीशी पार केलेल्या लोकांना या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना खूप दमछाक होते.  शासनाचे सर्व कार्यालय संगणकीकृत झाल्यामुले नोकरीसाठी संगणक प्रशिक्षनाची अट असते.  त्यामुळे सर्वांनी वेळीच संगणक व इंटरनेटच्या सर्व कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतःला अपडेट' करत रहावे, नसता आपली गणती 'आऊटडेट' मध्ये होईल.


©प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com
(हा लेख नावासह शेअर करण्यास माझी हरकत नाही)