व्हरचुव्हल रियालिटी व ऑगमेंटेड रियालिटी
काही वर्षांपूर्वी प्रथमचं प्रदर्शीत झालेला एक ३डी चित्रपट खूप गाजला होता, त्या चित्रपटाच नाव होतं छोटा चेतन! हा बॉलिवूडचा पहिला ३डी चित्रपट होता जो प्रेक्षकांनी डोळ्यावर एक विशिष्ट्यप्रकारचा चष्मा लावून बघितला होता. हा चित्रपट बघताना आपण जणू खऱ्या दुनिये (रियल वर्ल्ड )पासून दूर त्या छोटा चेतनच्या अभासी दुनियेत (व्हरच्युअल) वावरत आहोत असं वाटतं. या प्रकारालाच ' व्हरच्युअल रियालिटी' किंवा व्हीआर (VR) असे म्हणतात.
डिजिटल युगात आपला बराच वेळ आपण आभासी दुनियेत वावरण्यासाठी खर्च करत असतो. व्हरच्युअल रियालिटी मध्ये रियालिटीपासून दूर आपण आभासी जगाचा आंनद घेत असतो जणू काही आपण त्या आभासी जगाचा जणू हिस्सा असल्यासारखं! असे व्हिडीओ बघण्यासाठी एका विशिष्ट उपकरणाचा उपयोग केला जातो त्याला............ असे म्हणतात. आपल्याला पाहिजे तो व्हरच्युअल रियालिटी व्हिडीओ बघण्यासाठी प्रथम हे उपकरण डोळ्यासमोर चढवून त्यामध्ये मोबाईल बसवून तो व्हिडीओ बघितला जातो. व्हिडीओ चालू केल्यानंतर आपण रियल जगाला चक्क विसरून व्हरच्युअल जगाचाच भाग आहोत असा भास होत असतो.
जर तो ताजमहलचा व्हिडीओ असेल तर तुम्ही खऱ्याखुऱ्या ताजसमोरील गर्दीत उभे राहून ताज बघण्याचा आंनद मिळेल. किंवा उंच आईफेल टॉवरवर उभे राहून तुम्ही खाली बघत आहात असा भास होईल. थोडक्यात खऱ्या जगात राहून तुम्हांला हे तंत्रज्ञान १००% आभासी विश्वात घेऊन जातो म्हणूनच त्याला 'व्हरच्युअल रियालिटी' असे म्हणतात.
हल्ली मेट्रो शहरातील मॉलमध्ये एक मनोरंजन म्हणून ग्राहकांसाठी व्हीआर (व्हरच्युअल रियालिटी) सेक्शन असतो जिथे डोळ्यासमोर व्हिआरचं......... उपकरण वापरून तुम्ही आवडत्या व्हिडीओचा आनंद घेऊ शकता. बऱ्याच जणांना जास्त उंचीवरून खाली बघण्याची भिती वाटत असते. अशांनी जर उंच ठिकानाचा व्हरच्युअल रियालिटी व्हिडीओ पाहिला तर ते भितीने घाबरतात, जोरजोरात ओरडनार किंवा रोलर कोस्टर स्वार असाल तर तुम्हाला निश्चितच भिती वाटेल.
व्हरच्यूअल रियालिटी हा प्रकार काही नवा नसून अनेक क्षेत्रात त्याचा उपयोग होत आहे. व्हरच्युअल रियालिटीचा उपयोग बऱ्याच प्रशिक्षणात होत असतो.
जोखीम असलेल्या ठिकाणी, प्रत्यक्ष न जाता व्हरच्युअल रियालिटी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपण ते बघू शकतो.
मनोरंजन :
व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग मनोरंजन विश्वात जसेकी चित्रपट, सिरीज आणि गेमिंगच्या दुनियेत मोठ्या प्रमाणात होत आलेलं आहे. खरं तर व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग प्रथमता मनोरंजनासाठीच झाला होता. देशातील बऱ्याचचा मनोरंजन शो, पार्कमध्ये व्हीआर वापरल्या जात आहे.
वाहन उद्योगात :
वाहनाची डिजाईन तयार करतांना रस्त्याची वळणे, रुंदी आणि एकंदरीत स्थिती लक्षात ठेवने आवश्यक असते. उत्पादन सुरु करण्यापूर्वी वाहनांची चाचणी घेण्यासाठी व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाने विकसित चालकरहित कारच्या चाचणी करतांना सुद्धा व्हीआर तंत्रज्ञान कामी येतं.
वैद्यकीय क्षेत्र : रुग्णालयातील तनावग्रस्त वातावरणात नवीन सर्जनला एखादी जोखमीची शस्त्रक्रिया करणे सोपे नसते. त्यांना अशा वातावरणाचा सराव व्हावा यासाठी व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. तसेच मानसिक रुग्णाला एक 'थेरपी' म्हणून व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.
शैक्षणिक क्षेत्रात
शालेय मुलांना व्हीआर तंत्रज्ञान नवीन व मनोरंजक वाटतं. त्याचा उपयोग करुन हसतखेळत कोणताही विषय शिकविणे सोपे जाते. तणावरहित वातावरणात व्हीआरमूळे त्यांना कोणताही विषय शिकण्यात मजा वाटते. त्यामुळे किती तरी प्रशिक्षण शाळेत व्हीआर सध्या वापरलं जात आहे.
डिजिटल मार्केटिंग :
डिजिटल युगात जाहिरातीचं तंत्रसुद्धा बदललेलं आहे. समाजमाध्यमातून जाहिरात करतांना निवडलेली वस्तू आपल्या घरामध्ये कशी शोभून दिसेल हे बघने व्हीआरमूळे आता शक्य आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये व्हीआरचा उपयोग होत असतो.
संरक्षण क्षेत्रात
सैन्याना प्रशिक्षणासाठी प्रत्येक्ष जोखमीच्या ठिकाणी प्रशिक्षण देने शक्य नसतं. प्रथम युद्धभूमीत जातांना एक प्रकारची भिती (नर्व्हसनेस) असते. त्यांना प्रशिक्षण देऊन युद्धभूमीत लढण्यासाठी सज्ज करण्यासाठी व्हीआर हे आभासी तंत्रज्ञान उपयोगी पडतं.
पर्यटन
पर्यटन क्षेत्रात व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. फिरण्यासाठी योग्य स्थळाची निवड करण्यासाठी, राहण्यासाठी उत्तम हॉटेल्स, पर्यटन स्थळ निवडण्यासाठी एजेंट प्रथम पर्यटकांना तेथील स्वीस्तर माहिती व्हीआरद्वारे देतात
गुगल:
व्हीआर तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तुम्ही अख्या विश्व फिरण्याचा आनंद घेऊ शकता. गुगल तुम्हांला सर्व शहर आणि त्यातील रस्ते दाखवू शकतं.
गेमिंग :
गेमिंगमध्ये व्हीआरचा सर्रास उपयोग होत असतो.
प्रशिक्षण :
नवीनचं निवडलेल्या नोकरांना प्रशिक्षण देण्यासाठी व्हिआरचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्याना प्रत्येक्ष ठिकाणी घेऊन जाण्याचा व इतर खर्च वाचतो.
उद्योग क्षेत्र :
उद्योग क्षेत्रात दूर वरील ठिकाणी प्रत्येक्ष न जाता एखाद्या उत्पादक मशीन किंवा यंत्राच निरीक्षक किंवा देखभाल करण्यासाठी व्हि आरचा उपयोग होतो.
पब्लिक स्पिकिंग:
अनेकांना प्रचंड समुदायापुढे बोलण्याची भिती वाटते. अशी मंडळी ती भिती घालविण्यासाठी व्हीआरचा उपयोग करू शकतात. तुम्ही प्रचंड मोठ्या जमावाला संबोधून बोलत आहात असा तुम्हांला भास होईल. भिती घालविण्यासाठी व्हिआरची मदत होईल.
युट्युब व्हिडीओ :
व्हीआर ऍप्प डाउनलोड करुन तुम्हाला युट्युब व्हिडीओ ३६०°डिग्री फॉरमॅटमध्ये बघण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
ऑगमंटेड रियालिटी
ऑगमंटेड रियालिटी हा व्हीआरच्या पुढंचं तंत्रज्ञान आहे जे आपण खूपदा वापरलं असणार. यामध्ये रियल वर्ल्डवर (खऱ्या) आपण कॉम्पुटर जनरेटेड व्हरचुअल(आभासी) इमेजेस चढवत असतो. हल्ली मोबाईलवर ऍप्पचा उपयोग करुन एखाद्याच्या छायाचित्रावर दाढीमिशा लावने, चष्मा चढवणे, टोप लावून सुशोभीत किंवा विकृत करणे हा प्रकार म्हणजे 'ऑगमंटेड रियालिटी' (एआर) आहे. येथे छायाचित्र हे खरोखरचं असतं पण त्यावर चढवलेला सिंगार हा व्हर्चूअल (आभासी) असतो, खरा नसतो.
हल्ली जाहिरातीमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असतो. उदा. लेन्सकार्डची जाहिरात. चष्मा निवडतांना फ्रेमच्या भरपूर पर्याय उपलब्ध असतात. हे काम सोपं करण्यासाठी लेंस्कार्ट एआयचा उपयोग करत असते. एआयद्वारे ग्राहक आपल्या चेहऱ्याचं छायाचित्र काढून त्याला साजेसी नेमकी फ्रेम ते निवडून ती ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. एआयमूळे ग्राहकाचा शोरूम व्हिजिटचा खर्च आणि वेळसुद्धा वाचतो. दुकानदाराचासुद्धा वेळ वाचून व्यवहार करणे सोपरियालिटीऐशीयन पेंट या कलरपेंट विकणाऱ्या कंपनीने आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी अशीच व्यवस्था केलेली आहे. घराचा फोटो काढून आवडेल ते रंगसंगती आपण स्क्रीनवर बघू शकतो. रंग निवडण्यासाठी त्याची मदत होते. येथे भिंती वास्तविक दुनियेतील असून त्यावर चढवण्यात येणारे रंग हे व्हरच्युअल म्हणजे आभासी असतात. यालाच ऑगमेंटेड रियालिटी असे म्हणतात.
ऑगमेंटेड रियालिटीचं अजुन एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो गेमिंग. हा गेम खेळतांना मोबाईलचा कॅमेरा चालू करुन आपल्या जवळपास पोकेमॉन शोधायचा असतो. हा पॉकेमान व्हरच्युअल असway
डिजिटल युगात काळात ऑगमेंटेड रियालिटी (AR) आणि व्हरच्युअल रियालिटी (VR) मूळे बराच फायदा होत आहे. विविध उद्योगात दिवसदिवस त्याचा वापर वाढत असते. जगभरात AR VR मध्ये बरेच बदल घडत असून या तंत्रज्ञानामूळे जगातील उद्योगात प्रचंड उलाढाल होत आहे. ARVR च्या जोडीला आता AI तंत्रज्ञान आल्यामुळे तंत्रज्ञान अजूनही जास्त विकसित होत आहे. एखादी वस्तू प्रत्येक्ष बाजारात लाँच करण्याआधी ARVR द्वारे त्याचं सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास केला जातो.
©प्रेम जैस्वाल, पेडगावकर
च. मु. औरंगाबाद
No comments:
Post a Comment