टेक अब्युज : डिजिटल दुरुपयोग
अजय देवगन आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला दृश्यम चित्रपट सर्वांनी पाहिलाच असेल. शाळेतील मुलं सहलीला बाहेर कुठे तरी गेलेली असतात. सहलीला गेलेल्या महिला पोलीस अधिकारी तब्बू नायिकेचा मुलगा मोबाईल कॅमेऱ्याचा दुरुपयोग करुन मुलीचं चित्रण करतो. ज्या मुलीच लपून चित्रण करतो ती मुलगी अजय देवगनची असते. तिच्या घरी जाऊन तो व्हिडीओ इतरांना शेअर करेन अशी धमकी देतो. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कसा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. या गुन्ह्यामध्ये मोबाईल या डिजिटल उपकरणाचा उपयोग झाल्यामुळे हा गुन्हा सायबर क्राईम मध्ये मोडतो.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनुसार २०२० पर्यंत तब्बल ५०,०३५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी १६१४ केसेस सायबर स्टॉकिंगच्या, ७६२ केसेस सायबर ब्लॅकमेलिंगच्या, ८४ केसेस डिफेमेशनच्या, २४७ केसेस फेक प्रोफाइलच्या तर ८३८ केसेस फेक न्यूजच्या होत्या.
हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल कॅमेरा असल्यामुळे फोटो, व्हिडीओ शूट करने अगदी सोपे झाले आहे. एव्हडंच नाही तर घरातील लहानात लहान वस्तूत सामावतील असे छोटे कॅमेरे बाजारात सहज उपलब्ध आहेत. आकार अगदी छोटा असल्यामुळे ते सहजासहजी नजरेत पडत नाही. कोणत्याही छोट्या वस्तूत सामावून ते व्हिडीओ शूट करू शकतात. असे शूट केलेले व्हिडीओ जेंव्हा व्हायरल होतात तेंव्हा कुणाचीही करियर, पद, पत किंवा प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी ते पुरेसे असतात. मॉलच्या ड्रेसिंग रूम्स, पर्यटन स्थळातील हॉटेल्स, रिसॉर्ट, फॅशन शॉप्स, सलोनस अशा सार्वजनिक ठिकाणी हिडन कॅमेरेद्वारे व्हिडीओ शूट केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत.
मोबाईलचा उपयोग आता फक्त कॉल इनकमिंग आउटगोइंग पुरता मर्यादित नाही. दैनंदिन जीवनातील अनेक कामे तो करत असतो. बऱ्याचदा आपण फोटो, टेक्स्ट,महत्वाचे कागदपत्र, आधार कार्ड, व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करतो आणि गुगलवरची माहिती डाउनलोड करत असतो. असं करतांना कळत न कळत आपल्या खाजगी जीवनातील महत्वाची माहिती समाज माध्यमातून सार्वजनिक करत असतो. हिच माहिती स्कॅमरच्या हाती लागते आणि सायबर गुन्हे घडतात. समाज माध्यमातून असे फोटो उचलून AI सारख्या ऍप्पच्या सहाय्याने वाटेल तसे एडिट करून स्कॅमर खंडणी मागतात. बऱ्याचदा अश्लीलता वाढवून ती रील आम्ही व्हायरल करू अशी धमकी देतात. महिलांसोबत असे गुन्हे घडतात. कायद्याचे ज्ञान नसल्याने आणि बदनामी होईल या भितीने त्या घाबरतात. असे किती तरी प्रकरनाच्या बातम्या आपण वृतपत्रात वाचत असतो. यालाच इंग्रजीत सेक्सटॊर्शन असे म्हणतात. टेक अब्युजचा हा एक प्रकार आहे.
समाज माध्यमात आपण सतत फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती पोस्ट करत असतो. काही लोकांना आपलं खाजगी माहिती शेअर करायची सवय असते. ते जिथे जातील तेथील लाईव्ह फोटो समाज माध्यमात पोस्ट करतात. अशी माहिती जेंव्हा स्कॅमरच्या हाती लागते तेव्हा त्याचा ते दुरुपयोग करत असतात. इत्यादी संभाजीनगरच्या व्यक्तीने 'मी कुटुंबासह आग्रा येथे फिरत आहे'. असा फोटो सोशल मीडियात पोस्ट केला. या पोस्टवरून 'ते घरी नाहीत, पूर्ण कुटुंब बाहेर आहे, परत येण्यासाठी किमान दोन दिवस लागतील इत्यादी सार्वजनिक होते. या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो.
बऱ्याचदा मॉल, कॅफेमध्ये स्किम किंवा ऑफरचा फायदा घेण्यासाठी फॉर्म भरल्या जातो. त्या फॉर्ममध्ये आपली इतंभूत माहिती आपण त्यांना देतो. दिलेल्या डाटा मध्ये आपलं नाव, गाव, पत्ता, फोन, इमेल, छंद अशी बरीच माहिती शेअर केल्या जातं. अशी माहिती फक्त त्या मॉलपूर्ती मर्यादित रहात नाही. असा डाटा चांगल्या किंमतीमध्ये विकला जातो. जाहिरातीसाठी तो कामी येतो. मॉलमध्ये खरेदी केलेल्या वस्तूवरून तुम्ही कोणत्या इनकम कॅटगरीत मोडता हे सुद्धा माहित पडतं.
फेसबुक, इंस्टाग्रामवर आपण बऱ्याचदा पोस्टला लाईक, डिसलाईक किंवा शेअर करत असतो. आपली आवडनिवड, आपल्या सवयी, छंद, पुरोगामी, डावे-उजवे धार्मिक-अधर्मिक अशी सर्वच माहिती मिळविण्यासाठी आपल्या समाज माध्यमातील ऍक्टिव्हिटी असतात. बऱ्याच कंपन्या एखाद्या नोकराला नोकरी देण्यापूर्वी त्याचा समाजमाध्यमातील प्रोफाइल डिटेल्स व इतर ऍक्टिव्हिटी बघत असतात. प्रोफाइल आणि ऍक्टिव्हिटीवरून त्यांना नोकराच्या व्यक्तिमत्वाविषयीची बरीच माहिती सहज मिळत असते. त्यामुळे समाजमाध्यमात वावरतांना लक्षात ठेवावं कि आपण फक्त इतरांची माहिती बघत नसतो तर आपली माहिती सुद्धा कळत न कळत इतरांना शेअर करत असतो.
इमेल स्कुपिंग : शासकीय किंवा खाजगी व्यवहारात किती तरी ठिकाणी आपण आपला इमेल ऍड्रेस सामायिक करत असतो. ऑनलाईन व्यवहार करतांना सुद्धा इमेल ऍड्रेस द्यावा लागतो. आपण दिलेल्या इमेलवर स्कॅमर इमेल पाठवतात. पाठविणाऱ्याचा इमेल परिचित वाटून आपण त्यामध्ये कोड नंबर टाकून ओपन करतो. कोड टाकल्यामुळे आपल्या बँकेतील पैसे इतरांना पाठविण्यासाठी एक प्रकारची सहमती देत असतो.
बऱ्याचदा व्हाट्सअप किंवा मेसेजिंग सर्व्हिसमध्ये सायबर अटॅकर लिंक पाठवतात. ती लिंक आपल्याला कोड टाकून ओपन करायला सांगतात. कोड टाकला कि स्कॅमर आपल्या बँकेतुन पैसे काढून घेतात. ऑनलाईन ग्राहकांना फसविण्यासाठी स्कॅमर नवनवीन पद्धतीचा अवलंब करत असतात.
ऐन वेळेवर फजिती टाळण्यासाठी एक व्यक्ती दिल्लीला हॉटेलच्या रूमची ऑनलाईन बुकिंग करतो. बुकिंग ऍडव्हान्स म्हणून दोन हजार रुपये हॉटेलच्या खात्यात ट्रान्सफर होतात आणि त्याला रीतसर पोचपावतीसुद्धा मिळते. ठरलेल्या दिवशी जेंव्हा तो व्यक्ती मुक्कामासाठी हॉटेलच्या पत्त्यावर पोहोचतो त्या पत्त्यावर तिथे ती हॉटेल नसते! कारण हॉटेलची ती वेबसाईटचं फेक होती. त्याच्यासोबत फ्रॉड झालेला असतो. वृतपत्रात अशा बातम्या दररोज वाचवयास मिळतात. एका स्कॅमरने वाढते ऑनलाईन व्यवहार लक्षात घेऊन त्याने एक दोन नाही तर तब्बल ३६ मोठमोठ्या ब्रँड कंपन्याचे हुबेहूब डुप्लिकेट वेबसाईट तयार केल्या. ग्राहक अशा फेक वेबसाईटवर ऍडव्हान्स रक्कम देऊन सामान, फ्रिज, दुचाकी कार अशा महागड्या वस्तू बुक करायचे. नंतर त्यांच्या लक्षात यायचं कि आपल्यासोबत धोका झाला आहे.
डिपफेकची पहिली घटना. जसे तंत्रज्ञानात बदल होत आहे तसेच फ्रॉड करण्याच्या पद्धतीमध्येसुद्धा बदल होत आहे. आर्टिफिशियल इंटलीजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आपण कोणत्याही व्यक्तीची हुबेहूब कॉपी तयार करू शकतो. फक्त चेहऱ्याची कॉपी नाही तर तो व्यक्तीच्या आवाजाची सुद्धा कॉपी तयार करता येते. त्यासाठी गरज आहे फक्त त्या व्यक्तीच्या आवाजाच्या सॅम्पलची. डिपफेक स्कॅमर प्रथम समाज माध्यमातून तुमचा फोटो घेतील. तुम्हांला कॉल करुन तो रेकॉर्ड करुन त्याचा सॅम्पल म्हणून उपयोग करतील. एकदा का तुमचा चेहरा आणि आवाज जुळला तर मग तुमच्या तोंडून वाटेल ते वदवून घेतील. हे तंत्रज्ञान खुपचं घातक आहे. या फ्रॉडचा उपयोग राजकारणात होत आहे. हल्ली एआयचा उपयोग विविध पक्षाचे आयटी करत आहेत. फेक व्हिडीओ तयार करुन नेत्याची पत प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.
अशीच एक घटना देशातील केरळ राज्यात घडली होती. एका ७३ वर्षीय आजोबाला एक व्हिडीओ कॉल आला. पलीकडचा व्यक्ती आपला ऑफिसमधील आहे आणि तो अडचणीत पैसे मागतोय असं त्यांना वाटलं. त्यांनी लगेच ४००००/- रुपये त्याला ऑनलाईन पाठविले. नंतर त्यांना कळलं कि तो 'डिप फेक फ्रॉड'चा प्रकार होता.
एथिकल हॅकिंग : साधारण दशकापूर्वी 'एथीकल हॅकिंग' च्या कोर्सेसच पेव फुटलं होतं. खरं तर एथीकल हॅकिंग असं काही नसतंच. कारण जेथे एथीक्स (नैतिकता)असते तिथे हॅकिंग कशी होणार आणि जिथे हॅकिंग होत असेल तिथे नैतिकता कशी असणार? असो. ज्या गतीने डिजिटल युगात एआयचा वापर होत आहे त्यानुसार येत्या काळात 'जेथे जातो तेथे तू माझा.... सारखा एआय आपल्या मदतीला सोबत असणार. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात
No comments:
Post a Comment