व्यवहारिक ज्ञान आवश्यकच !
काही वर्षापूर्वी गुजरातची स्मार्ट सिटी, सुरत शहरात घडलेल्या आगीच्या घटनेमुळे अख्खा देश दुःख सागरात बुडाला होता. देशात आगीची हि पहिलीच घटना होती अशातला भाग नाही पण ज्या प्रकारे या आगीत गुदमरून तरुण कोवळ्या मुला-मुलींनी मृत्यूला कवटाळले, काहींनी धडपड करत जोखीम घेऊन चौथ्या माळेवरून उड्या मारल्या, त्यातही काही जखमी झाले, एकंदरीत मन हेलावणारा तो प्रकार होता.
आपत्ती व्यवस्थापनाची गरज आपण सर्वांनाच आहे. जीवनात संकट समयी सक्षमपणे खंबिर तोंड देण्याची कला उद्याच्या नागरिकांना नको का यायला? ९० ते ९९% टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० फुटाच्या उंचीवरून काही कल्पकता वापरून सुखरूप खाली कसं उतरावं याचा साधा विचारसुद्धा ते करू शकले नाही. खरं तर पाच जीन्सला किचैन-चावीच्या रिंगणी एकमेकाला जोडून त्यांनी सहज खाली येण्याचा किमान प्रयत्न केला असता तर अनेक जीव वाचू शकले असते. असो.
या घटने नंतर समाजमाध्यमामध्ये सर्व जनता चालू शिक्षण व त्यातील उणिवा, त्रुटीबद्दल बोलत होती आणि त्यांच्याशी मी अगदी सहमत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण हा मुद्दा आपल्याकडे घासून घासून गुळगुळीत झाला आहे पण अजूनही आपलं शिक्षण जागतिक दर्जाची उंची गाठू शकलं नाही, हि मोठी शोकांतिका आहे. देशातील शिक्षणात नोकरीसाठी आवश्यक मृद कौशल्याप्रमाणे जीवनासाठी आवश्यक जीवनकौशल्य गरजेच आहेच. हाच सूर सगळीकडे उमटत आहे. सुरत आगीत मरण पावलेली बिचारी कोवळी मुलं कदाचित दहावीत ९०% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेली असतील पण आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याचं शिक्षण त्यांना दिलं गेलं नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. या समस्येच्या मुळाशी गेल्यास दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे शिक्षणात जीवनोपयोगी कौशल्याचा अभाव असणे. आणि दुसरी बाब म्हणजे संगोपन होतानाच मुलांना प्रतिकूल परिस्थितीशी झटण्याची सवय नसणे.
' जीवनात जास्तीत जास्त पैसा म्हणजेच सक्सेस' हे एक सर्वमान्य समीकरण बनलं आहे. त्यामुळे चांगले मार्क/रँक, उच्चपदवी, लवकर नोकरी, मोठं पॅकेज लाईफ सेट! साधारण सर्वच पालकांना हा मार्ग सोयीचा वाटतो. पण त्या कमवलेल्या पैशाचा जीवनात उपभोग घेण्यासाठी जीवनात इतर कौशलेही तितकीच महत्वाची आहेत हे नंतर कळतं.
पूर्वी गाव-खेड्यात जन्मलेल्या, प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कायम प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जीवनमूल्य आत्मसात व्हायची. जसेकी एसटी बसची सुविधा नसल्यामुळे ८-१० किमी पायी चालणे. झाडावर चढुन उतरताच येत नसल्याने उंच फांदीवरून उडी मारणे. नदी ओलांडण्यासाठी पोहून जाणे, वेळप्रसंगी बुडणाऱ्याना वाचवणे, स्वतःचे कपडे धुणे, स्वतः स्वयंपाक करणे किंवा आईला मदत करणे किंवा पैसाच कमी असल्यामुळे दुकानातून सामान खरेदी करताना भावटाव करणे इत्यादी. थोडक्यात दैनंदिन जीवनात विपरीत परिस्थितीच मुलांना समोर उभ्या समस्येशी दोन हात करणे शिकवते. पण आज वाढत्या शहरीकरनात सर्वच पालकाची मानसिकता बदलली आहे. सर्वच कमवते झाल्याने 'आम्ही जे कष्ट सोसले ते मुलांच्या नशिबी येऊ नयेत' म्हणून पाल्याला एकंदरीत सर्वच सुखसोयी पुरवल्या जातात. प्रतिकूल परिस्थितीशी त्यांचा संबंध येतच नाही मग त्याशी झगडने ते कधी शिकतील?
शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असल्याने आणि स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतल्याने क्वचीत विद्यार्थ्याचे व्यवहारिक ज्ञान तपासता खरोखरच त्यांची कीव येते -
- बारावी शिकलेल्या विद्यार्थाना १ फूट म्हणजे किती इंच, १ मीटर म्हणजे साधारण लांबी किती हे माहित नाही. मग चार माळे म्हणजे किती फिट कसं कळणार?

- बारावी मेरिटच्या विद्यार्थ्यांना १ तोळा, १ छटाक, पावशेर माहित नाही
- क्वचितच एखाद्या मुलाला साधी गाठ, बैल पक्का फासा, चाड्याची गाठ मारता येत असेल.
- रँकरला स्वतःचा स्वयंपाक, कपडे धुणे, प्रेस करणे जमत नाही. घरात आले कि कपडे फेकून देतात.
- खरेदीसाठी पाठवले तर भावटाव करता येत नाही, आर्थिक नुकसान करून घेतात. काहींना कमीपणा वाटतो.
- जास्तीत जास्त मुलांना आपले जवळचे नातेवाईक जसेकी मामा, काका, आत्या आणि चुलत नातेवाईक याबद्दल माहिती नाही. फेबु, व्हाट्सप्प हेच मित्रविश्व.
- मोदी, राहुल गांधी माहित असले तरी विधानसभा, विधान परिषद लोकसभा, राज्यसभा, सरपंच ग्रामसेवक आणि त्यांच्या जबाबदाऱ्या नाहीत नाही. नागरिकशास्त्र परीक्षेतील मार्कापुरत वाचून मोकळे.
- विविध शासकीय अधिकारी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. मग तक्रार करता येत नाही.
या आणि अशा गोष्टीला आमच्या-तुमच्या सारखे पालकच जबाबदार आहेत. भूक लागण्याआधी ताट समोर ठेवणारे, साधं उन्हहि अंगावर न घेऊ देणारे, १ किमी पायी चालू न देणारे आपणच. फक्त रँकवर लक्ष केंद्रित करून इतर ऍक्टिव्हिटी पासून त्यांना दूर नेणारे आपणच. आज विभक्त कुटुंब पद्दतीत पालकाकडे भरपूर पैसा आहे पण जीवन कौशल्य तर दूर पण साधे जीवनमूल्य आणि संस्कार देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही, हि मोठी शोकांतिका आहे. त्यातच सर्व मुलांच्या हाती गुगल असल्याने ते गुगललाच गुरु मानतात.
काही वर्षापूर्वीची गोष्ट. संगणक प्रशिक्षक म्हणून आम्ही एका उच्चशिक्षित तरुणांची नेमणूक केली. एम.एस्सी शिक्षित हा तरुण पालकांना एकुलता होता. त्यामुळे त्याच संगोपन कसं झालं असेल, आपण समजू शकता. तर झालं असं की, एका उत्सवासाठी आम्ही आमचं कार्यालय सुशोभित करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मी त्याला हाताशी घेतलं. एक तोरण बांधण्यासाठी मी त्याला वर चढवलं तर त्याला ते तोरनाची साधी गाठ बांधता आली नाही. मग मी त्याला गाठ कशी बांधतात ते शिकवलं. आता उरलेला दोरा कापण्यासाठी मी त्याला कैची दिली तर तो अक्षरशः ती कैची तो दोऱ्यावर चाकू प्रमाणे घासत होता. अतीच झाल्यामुळं म्हणून मला हसू आलं. आता काही महाशय अशा मुलांची हे सांगून पाठराखण करतील कि त्या संगणक पदवीधराला अशा गोष्टीची गरजच काय? त्याच काम तर संगणकाशी! तर मी सांगेन पैसे कमविण्यासाठी जरी ज्ञान पदवी पुरी असली तरी समृद्ध जीवन जगण्यासाठी जीवन कौशल्य आवश्यकच.
- प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com
(नावा सह शेअर करावयास माझी हरकत नाही)

No comments:
Post a Comment