डिजिटल उपकरणे आणि अर्थिंगच महत्व
दैनंदिन जीवनात आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही, ऑडिओ सिस्टीम, रेफ्रिजरटर, वॉशिंग मशीन, एसी, तसेच ऑफिसमध्ये कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, युपीएस, वॉटर फिल्टरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळत असतो. हल्ली सर्वच इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये थोडंफार इलेक्ट्रॉनिक्स भाग असतोच. मग यापैकी डिजिटल उपकरणे आपण कशी ओळखायची ?
तर वरील सर्व उपकरण चालूबंद करण्यासाठी एक पॉवरबटन असतं. वरील सर्व उपकरणाच्या पॉवर ऑन-ऑफ बटनाकडे बघितलं तर लक्षात येईल की काही ठराविक उपकरणाच्या बटनावरचं एक गोल मोठी रिंग ' ० 'असते आणि त्यावर ' I ' असा मार्क असतो. अशी खुन असलेली उपकरण म्हणजेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असलेली उपकरण.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन प्रकार असतात, एक ऍनॉलॉग आणि दुसरा डिजिटल. ऍनॉलॉग हे जुन्या पद्धतीचे उपकरण ज्याचे सर्व पार्ट ऍनॉलॉग असतात. वाहणार करंट किंवा माहिती हि ऍनॉलॉग असते. डिजिटल उपकरणात वाहणारी माहिती हि हाय आणि लो स्वरूपात असते. हाय म्हणजेच वन (1) आणि लो म्हणजे झिरो (०) अशा स्वरूपात असते. मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, स्कॅनर, टॅब, एलसीडी टीव्ही हे सर्व डिजिटल उपकरण आहेत. या डिजिटल उपकरणात डिजिटल आयसी, मायक्रोप्रोसेसरसारखे नाजूक पार्ट जोडलेले असतात. हे सर्व उपकरण डिजिटल आहेत हे लक्षात यावं म्हणून 'पॉवर ऑन-ऑफ' हे एकसारखं म्हणजे फोटोतं दाखविल्याप्रमाणं असतं. या सिम्बॉलमध्ये एक मोठा 'झिरो' आणि '1' दडलेला आहे. डिजिटल उपकरण वापरायला नाजूक असतात त्यामुळं त्या उपकरणाला योग्य अर्थिंग देऊनच वापर करावा.
अर्थिंग म्हणजे काय ?
घरगुती वा कार्यालयात आपण वापरत असलेल्या विजेच्या उपकरणाच्या थ्री पिन पॉवरप्लगची एक पिन जाड आणि लांबीला थोडी पुढं आलेली असते. कोणतेही विद्युत उपकरण चालण्यासाठी मुख्यतः फेज (+ तांबडी) आणि न्यूट्रल (- काळी) ह्या दोन तारचं आवश्यक असतात. त्या दोन तारेमधूनच कोणत्याही उपकरनाला विद्युतपुरवठा मिळत असतो. देशातील सर्व विद्युत महामंडळ आपल्याला दोनच तारेतूनच वीजपुरवठा करत असतो. थोडक्यात त्या 'लहान दोन पिन' जरी पॉवर सॉकेटमध्ये टाकल्या तरी उपकरण काम करतं. मग प्रश्न पडतो ती तिसरी पिन कशासाठी ? आपल्या वास्तूत बाहेरून दोन तारेचा वीजपुरवठा आल्यानंतर ' इलेक्ट्रिशियन' त्यात तिसरी तार जोडतात. हि तिसरी तार त्या 'जाडजूड लांब पिन' मधून आपण वापरत असलेल्या उपकरणाच्या बॉडीशी जोडलेली असते. ह्या तारेच दुसरं टोक त्या त्या वास्तूच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून जमिनीत गाडल्या जाते. त्यालाच 'बिल्डिंगची अर्थिंग' असे म्हणतात. त्या तारेचा रंग सहसा हिरवा असतो. सुरक्षितता आणि अपघात टाळण्यासाठी हि तिसरी तार खूपचं महत्त्वाची असते. ती शास्त्रीय पद्धतीनं केलेली असेल तर विद्युतप्रवाह उपकरणात उतरून लागणारा 'शॉक' तुम्ही टाळू शकता. विद्युत पुरवठा जरी महामंडळाची जबाबदारी असली तरी अर्थिंगची जबाबदारी हि त्या त्या घर-इमारत मालकाची असते. सुरक्षितता म्हणून अत्यंत योग्य अर्थिंग करणे अत्यावशक आहे.
उदाहरणार्थ, जर आपनं लोखंडी पत्रा असलेला कुलर वापरत असाल तर कुलरचा पंखा, पंप चालण्यासाठी दोन तारा (सहसा: तांबडी, काळी) पुरे. पण त्यामुळं कुलरमध्ये बिघाड होऊन विद्युतप्रवाह कुलरच्या बॉडीच्या पत्र्यात उतरला तर आपल्याला शॉक लागून अपघात घडू शकतो. म्हणून आपल्या सुरक्षेसाठी ती तिसरी (हिरवी तार) त्या बॉडीशी जोडल्या जाते. हि जाडजूड पिन म्हणजेच 'अर्थिंग पिन.' मग ही अर्थिंगची पिन मोठी आणि लांब ठेवण्याचा उद्देश काय? तर, तुमचं उपकरण सुरु होवो वा न होवो प्लग सॉकेटमध्ये टाकताच उपकरणाला अर्थिंग मिळणे आवश्यक. तुमची सुरक्षितता ही प्राथमिकता. त्यामुळे पिन लांब असल्यानं पॉवरसॉकेटमध्ये प्लग टाकताच आधी उपकरणाला संपर्क अर्थिंगला होतो, नंतरच उपकरणाला वीज! शिवाय ती अर्थिंग पिन सॉकेटमध्ये घट्ट चिपकून रहावी म्हणून किंचितशी जाड व लांब असते.
मग प्रश्न पडतो कि बाजारात मिळणाऱ्या बरीच उपकरन जसेकी ट्रीमर, हेअर ड्रायर, स्टीमर, शोभेच्या माळा, लायटिंग प्लगला दोनच पिन का असतात ? कारण त्या उपकरनाची बॉडी प्लास्टिक, लाकूड किंवा काचेची असते . त्यामुळं बॉडीमध्ये करंट उतरून शॉक लागण्याचा धोका नसतो. पण आपल्या घरातील पाण्याची मोटर, कुलर, हिटर, गिझर, वॉटर फिल्टर, अव्हन आणि इतर उपकरणाला अर्थिंग आवश्यक असते. विजेचे वाढते अपघात लक्षात घेता आपण राहत असलेल्या इमारतीची, कार्यालयाची अर्थिंग आपल्या इलेक्ट्रिशयनद्वारे उत्तम प्रकारे करून घेणे 'अत्यन्त महत्वाचे' आहे. तसेच विजेची उपकरण वीज बंद करून काळजीपूर्वक हाताळणेच योग्य आहे. एव्हडच नाही तर, अर्थिंग व्यवस्थित असेल तरच आपण वापरत असलेले संगणक, लॅपटॉपसारखे नाजूक उपकरण चांगले काम करतील. थोडक्यात कोणतेही उपकरण चांगले चालण्यासाठी आणि सुरक्षेसाठी त्या त्या वास्तूची 'अर्थिंग' उत्तम असणे आवश्यक आहे. अर्थिंगमुळे डिजिटल उपकरणाची कार्यक्षमता वाढून त्याचं आयुष्य वाढत.
© प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com
{हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही}



No comments:
Post a Comment