ad1

Sunday, 29 December 2024

कल चाचणी का करावी?

                     कल चाचणी का करावी? 

प्रत्येक विध्यार्थी हा युनिक व परिपूर्ण असतो.  कोणत्याच बाबतीत तो कमी नसतो. सर्व विध्यार्थ्यामध्ये उपजतच काही विशेष कला गुण असतात. एक विध्यार्थी गणितामध्ये तर दुसरा विज्ञानामध्ये तर तिसरा कलेमध्ये पुढे असतो. काहींना वाणिज्य शिकून  उद्योग-व्यापाराचं क्षेत्र पादाक्रांत करायचं असतं तर काहींना आकाशातील विमान 'पायलट हो' असं खुणावत असतं.  पालक व शिक्षकांनी  मुलांचे हे सुप्त गुण ओळखून त्याला पूरक अशी मदत केल्यास निश्चितच ते त्या क्षेत्रात नाव, पद, प्रतिष्ठा आणि पैसा कमावू शकतात. हेच कारण सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे जगप्रसिद्ध क्रिकेटर तर गानकोकिळा लतादिदी विश्वप्रसिद्ध गायिका झाल्यात.  थोडक्यात संगीत,खेळ, कला, लेखन, सामाजिक कार्य असे किती तरी क्षेत्र आहेत ज्यामध्ये देशातील युवक यशाचं शिखर सर करू शकतात. गरज आहे त्यांच्या जिद्दीची, योग्य गुरू आणि मार्गदर्शनाची.

आपल्या घरामध्ये छोटसं झाडं असतं. वाढीसाठी आपण नित्यनियमाने त्यास खत-पाणी देत असतो. सोबतच त्याच्या सभोवती वाढणारं तण आपण वाढू देत नाही. तसं नाही केल्यास खत-पाण्याची शक्ती, ऊर्जा तणामध्ये विभागली जाते व  झाडाची वाढ खुंटते. मुलांचं तसंच असतं. अंगी पेंटिंगची कला ठासून भरलेला विध्यार्थी सकाळी बॅडमिन्टन, दुपारी गिटार आणि संध्याकाळी अबॅकस क्लासला उपस्थित राहत असेल तर त्याच्या आवडत्या पेंटिंग कलेचं काय होणार? गरज आहे पालकांनी ही गोष्ट समजून घेण्याची. 

हल्ली दहावीत शिकणाऱ्या विध्यार्थी व पालकांना दोनच पारंपारिक क्षेत्राची माहिती असते. किंबहुना सभोवतालच्या मंडळीकडून त्यांच्या मनात ती ठासवली जाते. ते क्षेत्र म्हणजे - इंजिनियरिंग आणि मेडिकल! दोन पिढ्यापूर्वी पालकांची हिच मानसिकता होती आणि शोकांतिका अशी की अजूनही त्या मानसिकतेत बदल झाला नाही.  मागील तीस वर्षात विज्ञान-तंत्रज्ञानात प्रचंड बदल घडलेत. त्यानुसार व्यापार, उद्योग बदलले. सेवा क्षेत्रातील उद्योग प्रचंड प्रमाणात वाढले. आपण आज डिजीटल क्षेत्रात वावरत आहोत ज्यामुळे पारंपारिक उद्योग-नोकऱ्या मागे पडून देश-परदेशात करियर व व्यवसायाचे हजारो नवीन क्षेत्र खुले झाले आहेत. आता डॉक्टर व इंजिनियरपेक्षा किती तरी उत्तम नोकरी व व्यवसायाच्या नवनवीन संधी सध्या उपलब्ध आहेत. वीस-पंचेविशीतील युवक लाखो पॅकेजची नोकरी,  बिजनेस स्टार्ट-अपमध्ये नाव व पैसा कमवत असल्याचे आपण बघतच आहोत. आणि हे सर्व डॉक्टर- इंजिनियर आहेत का? मुळीच नाही! 

ज्यांचा इंजिनियरिंग-मेडिकलकडे कल आहे, बौद्धीक आर्थिक क्षमता आहे अशांनी ती क्षेत्र निवडायला मुळीच हरकत नाही. पण विज्ञान, गणिताची आवड नसतांना 'मित्र जात आहेत म्हणून मी' हा प्रकार चुकीचा होईल. त्यांच प्रमाणे गणित जमत नाही म्हणून मेडिकल आणि बायोलॉजी आवडत नाही म्हणून इंजिनियरिंग कडे वळने किती योग्य?  कारण जगात करियर करण्यासारखे फक्त दोनच क्षेत्र नाहीत.  सेवावृत्ती नसलेले विध्यार्थी मेडिकलला आणि तंत्रज्ञानाची आवड नसलेले विध्यार्थी इंजिनियरिंगकडे वळून फसतात.   बरेच असे विध्यार्थी आवड व क्षमता नसतांना भलत्या क्षेत्राकडे वळून स्वतःच नुकसान करतात.  त्या चुकीच्या करियर मार्गात त्यांच्या पैशासह अमूल्य वेळही वाया जातो. 

गरज आहे पालक व गुरूजनांनी आपल्या विध्यार्थ्यांशी मनमोकळी चर्चा करण्याची.  त्यांचा एकूण कल जाणून घेण्याची. गरज पडल्यास एखाद्या निष्णात मानसोपचारतज्ञाकडून त्याची विज्ञाननिष्ठ कल चाचणी करुन घेण्याची. इंग्रजीत एक म्हण आहे, 
A stitch on time saves the nine! 

दहावीत शिकणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

©प्रेम जैस्वाल, पेडगावकर, 9822108775.
(लेखक एस्पी इन्फोटेक या छ. संभाजीनगर येथील 
शैक्षणिक संस्थेचे संचालक व करियर मार्गदर्शक आहे.)

Sunday, 1 December 2024

अहो, शिष्यवृती परीक्षा कि विद्यार्थ्यांची थट्टा?





प्रेम जैस्वाल 
premshjaiswal@gmail.com



अहो, शिष्यवृती परीक्षा कि विद्यार्थ्यांची थट्टा?
१८ फेब्रुवारी, २०१८ ला इयत्ता ५वी आणि ८वीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृती परीक्षेचा निकाल ६ ऑगस्ट, २०१८ लागला. शिष्यवृत्तीपात्र निकालाची शेवटची यादी जाहीर करण्यासाठी या मंडळाला १-२ नाहीतर तब्बल ६ महिने लागले !
'स्कॉलरशिप' च्या नावाने परीचित या परिक्षेस राज्यातील ६१७७ केंद्राद्वारे ५वी आणि ८वीचे ऐकुन ८ लाख ५८ हजार ४६५ विद्यार्थ्या बसले होते. कंप्युटर आणि इंटरनेटच्या जमान्यात निकालासाठी जर या मंडळाला ६ महिने लागत असतील तर या वरूनच ह्या शिक्षण मंडळाच शिष्यवृत्तीबद्दलच गांभीर्य लक्षात येईल.
दुसरी बाब अशी कि शासनाकडून १९५४ पासून घेणाऱ्या ह्या परिक्षेचा हेतु राज्यातील गरीब होतकरु गुणवंत विद्यार्थी निवडने आणि तो पुढील शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यास थोड़ा आर्थिक हातभार लावणे असा होता. म्हणून काही गुणवंत विद्यार्थीची या परीक्षेद्वारे निवड करून त्यांना 'शिष्यवृती' देण्यात येते. पण ह्या शिष्यवृतीसाठी निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तसेच मिळणाऱ्या रक्कमेत पाहिजे तसा बदल झालेला दिसत नाही. किंबहुना हा शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय दुर्लक्षित प्रांत झालाआहे. इयत्ता ५वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला फक्त ₹ ५०० आणि ८वी इयतेत शिकणाऱ्याना फक्त ₹७५० स्कॉलरशिप म्हणून दिले जातात !
काळ बदलला वेळ बदलली सरकार बदलले आणि मंत्रीही बदलले पण प्रज्ञावंत विद्यार्थी दुर्लक्षितच राहिले. मागील काही वर्षात लोकसंख्येप्रमाणे शाळासंख्येमधे झपात्याने वाढ झाली आणि स्कॉलरशिप देणारे विद्यार्थिही वाढले. पण स्कॉलरशिपपात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत पाहिजे तेव्हड़ी वाढ झालेली दिसत नाही. शाळेला मान्यता, तुकड्या, पगारवाढ यातच सर्व शिक्षणखाते एव्हड़े व्यस्त आहे कि त्यांना ह्या परिक्षा दुय्यम वाटतात. खर्च वाढला म्हणून मंत्रिपासून खासदार, आमदार आणि सेक्रेटरी सह सर्व कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ झाली. भत्ते आणि सुविधा वाढल्या. शिक्षकच आपल्या संसारात सुखी नसतील तर ते विद्यार्थ्याना काय शिकवतील म्हणून त्यांच्या पगारात भरमसाठ वाढ झाली. एव्हड़च काय जेंव्हा पगार वाढत नव्हते तेंव्हा शिक्षकांणी संघटित होवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. पण उद्याच देशाच भविष्य ज्यांच्या हातात त्या मुलांच्या संख्येत व शिष्यवृती रक्कमेत बदल झाले नाही. आज जिल्हा परिषद शाळा सोडल्या तर इतर शाळेची फि भरमसाठ आहे. जि प्र ची स्थिति एव्हड़ी वाईट आहे की तेथील शिक्षकच आपल्या पाल्यांचा प्रवेश इतर खाजगी शाळेत घेतात. थोडक्यात ८व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शालेय वार्षिक खर्च कमीत कमी ₹ १२०००/- आणि हाच खर्च उच्चभ्रू शाळेत १ लाखाच्या घरात जातो. या सोबत जर शिष्यवृतीची शिकवनी, ने-आण खर्च, वह्या-पुस्तके आणि इतर खर्च जोड़ला तर त्या रकमेसमोर मिळणाऱ्या बक्षिसरूपी शिष्यवृतीची रक्कम फारच कमी असते. आज शैक्षणिक खर्चासह प्रत्येक वस्तु आणि सेवेचे भाव कितीतरी पटिने वाढले आहेत. किमान शासनाने एव्हड़ा तरी विचार करावा कि विद्यार्थी एव्हड़ी छोटी रक्कम कमावून पालकांना कोणता हातभार लावतील, किंवा पुढील शिक्षणात कोणता खर्च कमी होईल. ही प्रज्ञावन्त विद्यार्थ्याची थट्टा नव्हे का?
आपल्याकडे विद्यार्थ्याची गळती थांबावी म्हणून कालपर्यंत पहिली ते आठवी इयतेपर्यन्त परीक्षाच नव्हती त्यामुळे अभ्यासात पुढे कोण आणि मागे कोण हे पालकाना कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे ही एकच अशी स्पर्धापरीक्षा आहे की ज्यामुळे विद्यार्थ्याची इयत्ता ५वी किंवा ८वी पर्यन्तची खरी शैक्षणिक प्रगति पालकाना माहित पड़ते. कदाचित त्यामुळे पालकवर्गातही या परिक्षेला खुप महत्व आहे त्यामुळे ते या परीक्षेसाठी मुलाना प्रोत्साहित करतात. परीक्षा उतीर्ण केल्यानंतर आपले समाजात कौतुक होईल, 'आपली पहिली खरी कमाई' या आशेने बिचारे विद्यार्थिही जीव तोडून मेहनत करतात. शिष्यवृतीसह शाळेय अभ्यास असे दोहेरी ओझे वाहत असतात. त्यात शिकवणी लावली तर खुप ताण पडतो. हल्ली पालकही या परिक्षेसाठी स्वतःला झोकुन देतात. तयारीसाठी शिकवणी लावणे, वेगवेगळे वह्या-पुस्तक पूरवणे, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, इंटरनेटवरुन माहिती शोधने, तसेच शिकवणीच्या ठिकाणी ने-आण करणे या उद्योगात गुंतले जातात. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीत आईवडील दोन्ही नोकरी करत असतील तर ही समस्या तारेवरच्या कसरतीपेक्षा कमी नसते. पण आपला पाल्य या स्पर्धेमधे मागे राहता कामा नये म्हणून ते मुकाट सहन करतात. वेळप्रसंगी पालक महत्वाचे कामे, विवाह,समारंभ टाळतात. हा एव्हड़ा सर्व उपदव्याप, जीवतोड़ मेहनत करून निवडलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्याला शासनाकडून जी शिष्यवृतीची रक्कम मिळते ती ऐकुन कुणालाही आश्चर्यच होईल. कारण आज घडिला ५००-७०० रुपयामधे विद्यार्थी पाठयपुस्तकही विकत घेवू शकत नाही.
जेंव्हा महागाई आणि लोकसंख्या प्रत्येक वर्षी वाढते, तुकड्या वाढतात, शाळेय फीसमधेही दरवर्षी वाढ होत असते मग स्कॉलरशिपपात्र संख्येत आणि रकमेत दरवर्षी वाढ का नको? त्यामुळे आज गरज आहे कि माननीय शिक्षणमंत्र्यानी शिक्षणाचा वाढता खर्च लक्षात घेवून शिष्यवृतिच्या रकमेत भरघोस वाढ करावी. जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्याला या स्कॉलरशिपचा फायदा होईल आणि त्यांच्या शिक्षणाला थोडा हातभार लागेल.





ड्रोन तंत्रज्ञान

'जीवनातील कला ह्या निसर्गाच्या नकला असतात.' तंत्रज्ञानाच्या बाबतीतसुद्धा हे वाक्य लागू पडतं. असं म्हणतात की विमानाचं शोध लावण्यापूर्वी राईट बंधूनी आकाशात उडणाऱ्या पक्षांचा अभ्यास केला होता. पक्षी कशा प्रकारे हवेत झेपावतात, ते परत जमिनीवर कसे उतरतात आणि या क्रियेत ते कोणकोणत्या बळाचा उपयोग करतात याच सूक्ष्म निरीक्षण करूनच त्यांनी विमानाचा शोध लावला होता.  पण शोकांतिका अशी कि आज विमानाजवळ आकाशात उडणारे पक्षी जवळही फिरकू नये यासाठी विमानाला एक खास प्रणाली जोडलेली असते!  असो.  युद्धजन्य परिस्थितीमुळे आज सगळीकडे मानवरहीत ड्रोनची चर्चा आहे.  अगदी पक्षाप्रमाणे दिसणारे ड्रोन आकाशात उडताना आपण बघत असतो.  डिजिटल युगातील या अविष्काराबद्दल हा लेख.

२०१६ मध्ये उरी येथे लष्करतळावर झालेल्या हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ज्याने मौलाची कामगिरी निभावली ते हवाई उपकरण म्हणजे 'ड्रोन'.  त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ड्रोनचा उपयोग अतिरेक्याची नेमकी ठिकाण शोधून काढण्यासाठी  झाला. मानवरहीत एखाद्या पक्षी किंवा भुंग्यासारखं उडणार तंत्रज्ञान हल्ली सर्वत्र पाहावयास मिळतं. खास करून लग्न समारंभात, गर्दीच्या ठिकाणी जिथे छायाचित्र काढणे अवघड असते अशा ठिकाणी हमखास ड्रोन वापरल्या जातं. ड्रोनचं प्रथम दर्शन आपल्याला आमिर खानच्या खूपच गाजलेल्या 'थ्री-इडियट' या चित्रपटात झालं होतं. पण ड्रोनचा शोध लावून कितीतरी वर्ष होत आहेत.

ड्रोन म्हणजे पायलट नसलेलं छोटं पण अगदी हलकं विमानचं.  त्याला 'अनमॅनड एअरक्राफ्ट' असेही संबोधतात.  हवेत उडणार ड्रोन एखाद्या रोबोट सारखं काम करतो. यामध्ये विविध सेन्सर आणि जीपीएस असल्यामुळे त्याकडून आपण अनेक कामं करून घेऊ शकतो. ड्रोनमध्ये असलेल्या इलेक्टरोनिक सर्किट व सॉफ्टवेअरमुले अतिदूर अंतरावरून त्याला नियंत्रित करता येत.   पूर्वी  शत्रू राष्ट्राच्या भागात टेहळणी करण्यासाठी, त्यांच्या हालचाली टीपण्यासाठी अनुभवी पायलट असलेली विमानं वापरल्या जायची. हे काम खुप जोखमीच होतं. कारण शत्रूराष्ट्राच्या रडारवर ही विमान दिसली की ती पाडली जायची. त्यामुळे महागड्या विमानासह पायलटचा जीव जात असे. आवश्यकता हि अविष्काराची जननी आहे असे म्हणतात ड्रोनमुळे हि समस्या दूर झाली.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या वायुदलाने शत्रू राष्ट्रावर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच एक ड्रोन आपल्या सीमेवर फिरत होतं.  अर्थात पाकिस्तानच्या सैन्यानी भारताची युद्ध तयारीचा अंदाज घेण्यासाठी ते पाठविलं होतं. वायुदलाच्या रडारवर येताच ते पाडण्यात आलं.

ड्रोन तंत्रज्ञानची सुरुवात
डिजिटल तंत्रज्ञान जसेकी इंटरनेट, जीपीएसचा शोध आणि वापर सर्वात आधी अमेरिकासारख्या पाश्चिमात्य देशाच्या संरक्षण विभागात झाला आहे.  त्याचप्रमाणे ड्रोनचा वापर सुद्धा सुरुवातीला सरंक्षण क्षेत्रातच झाला आहे. पहिलं मानवरहित ड्रोन तयार करण्याचं श्रेय पहिल्या विश्वयुद्धात ब्रिटिश रॉयल फ्लायइंगच्या रेजिनॉल्ड डेनीला जातं. त्यानंतर इज्राईलचा ज्यू वैज्ञानिक अब्राहम करीमने पहिला मानवरहित ड्रोन तयार केला. त्यामुळे त्याला फादर ऑफ ड्रोन असे म्हणतात. अमेरिकेच्या वर्ल्ड टॉवरवर झालेल्या ९/११ च्या हल्ल्यातील कुविख्यात मास्टरमाइन्ड ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तसेच अफगाणिस्तानातून नेमक्या तालिबान दहशदवाद्याचे तळ नष्ट करण्यासाठी अमेरिकेने अनेक बॉम्बहल्ले केले.  पण त्या बॉम्बहल्यात काही निष्पाप सामान्य नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर मात्र दहशदवाद्याची अचूक ठिकानं शोधण्यासाठी अमेरिकन गुप्त अजेंसी सीआयएने अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग केला.  आज भारतासह सर्व देशाच्या सैन्याकडे  अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध आहेत त्यामुळे शत्रूच्या नेमक्या ठिकाणावर ते अचूक हल्ला करू शकतात.

ड्रोन कसं काम करतं?
ड्रोन म्हंटल तर लोकांना फक्त कॅमेरा असलेला ड्रोन आठवतो, पण असं नाही.  खेळण्यातील हलके ड्रोन, फोटोग्राफी आणि देखरेखीसाठी उपयोगात येणारे वेगळे ड्रोन,  तर संरक्षण क्षेत्रात उपयोगी पडणारे आणि वेळप्रसंगी मिसाईल वाहू शकणारे अत्याधुनिक ड्रोन. हे रिमोटवर नियंत्रित करणारे उपकरण आहे. या मध्ये विविध प्रकारचे मोटर आणि रोटर असतात जे त्याला वर उडण्यासाठी मदत करतात. वजन कमीत कमी ठेवण्यासाठी त्यामध्ये हार्ड-प्लास्टिक किंवा कार्बन फायबरचा उपयोग केला जातो. ड्रोनला विविध ऍक्सिसला फिरवून दृश्य टिपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बोर्डामध्ये गिम्बल, गायरोस्कोप, अकॅसेलोमीटर आणि बॅटरी जोडलेली असते. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ड्रोनची दिशा, गती, उंची नियंत्रित केल्या जाते.

विविध क्षेत्रात ड्रोनचा उपयोग ?
संरक्षण क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रातही उपयोग खूप वाढला आहे. दुर्गम ठिकानी घडलेली घटना, आगीची घटना, पूरस्थिती किंवा इतर जोखमीच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी, साहित्य पोहचवण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.  एखादया उंच ठिकाणचे तापमान माहीत करण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. एखाद्या जमिनीचे सर्च रिपोर्ट काढण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो. मोठ्या बांधकाम क्षेत्रात कामाची पाहणी करण्यासाठी तसेच टोलेजगं इमारतीचे कामाचे निरीक्षण, धोक्याच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी, ग्राहकांना कामाची गती दाखविण्यासाठी, इमारतीचे 3-डी फोटो काढण्यासाठी ड्रोनचा चांगला उपयोग होतो. कृषी क्षेत्रासाठी ड्रोन एक वरदान ठरलं आहे.  पिकाची देखरेख करण्यासाठी पिकावर खत, फवारणी करण्यासाठी, उंच ठिकाणावर बीज फेकण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.

ड्रोनबदल सरकारचे काही नियम
आज बाजारात काही हजार रुपयात ड्रोन उपलब्ध आहेत. असे असले तरी भारतीय हवाई हद्दीत ते उडवताना काही नियमावली आहे. आपल्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या उंचीपर्यंतच आपण ते उडवू शकतो.  हवाई वाहतुकीच्या दृष्टीने तो नियम योग्यच आहे.  सुरक्षिततेच्या कारणामूळे काही ठराविक ४०० फूट उंचीपर्यन्तच आपण ड्रोन उडवू शकतो. तर हवाईतळाच्या जवळ, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ, राष्ट्रपती भवन, मंत्रालय, सचिवालय, संरक्षण विभागाची ठिकाण आणि इतर महत्वाच्या परिसरात ड्रोन उडवू शकत नाही. त्याला 'नो ड्रोन एरिया' म्हणतात. वजनानुसार ड्रोनचे वेगळे प्रकार आहेत. नॅनो (२५० ग्रॅम), मायक्रो (२किलोपर्यन्त), स्मॉल (२५ किलोपर्यंत), मेडीयम (१५० किलो), लार्ज (१५० कि.पेक्षा जास्त वजनी)    नॅनो आणि मायक्रो ड्रोनला २०० फूट उंचीपर्यन्त उडवण्यासाठी परवानगीची गरज नाही.
ड्रोन क्षेत्रात करियर ?

येत्या काही वर्षात ड्रोनला प्रचंड मागणी वाढणार आहे आणि त्यासोबत नोकरीच्या अनेक संधी चालून येतील. कृषी, इ-कॉमर्स, वाहतूक नियमन, अग्निशमन, वन्यजीव निगराणी, पोस्टल डिलिव्हरी आणि हवेचे नमुने आदी क्षेत्रात नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. त्यासाठी युएव्ही प्रमाणपत्र आणि ड्रोन नियमांची संपूर्ण माहिती असलेल्या युवकांना नोकऱ्या मिळू शकतील. तसेच ड्रोनच्या संशोधनात, उत्पादन क्षेत्रात, ड्रोनच्या मार्केटिंग आणि सेवा क्षेत्रात तसेच ड्रोनच प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित लोकांची गरज भासणार आहे. त्यामुळे नोकरीच एक नवीन दालन उघडलं आहे. तसेच स्वतःकडे ड्रोन असेल तर आपण कंत्राट पद्धतीने कामे घेऊ शकाल. हे लक्षात घेऊन भारतातील अनेक विद्यापीठात एव्हीएशन इंजिनियरिंग, ड्रोन टेक्नॉलॉजिचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. तेंव्हा पारंपरिक पदवीच्या मागे न लागता ज्या क्षेत्रात संधी आहेत असे क्षेत्र निवडलेले कधीही उत्तमच.

स्वतःच्या स्वार्थ आणि सुरक्षिततेसाठी  मानवजातीने वृक्षतोड करून जंगल नष्ट केली. त्याची जागा आता उंचच उंच सिमेंटच्या जंगलानी घेतली.  मग या सिमेंटच्या जंगलात कुठे पक्षी बघायला मिळत नाही. पक्षाच्या किलबिलाटास आपण मुकलो. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात वाढता ड्रोनचा उपयोग बघता कदाचित पक्षाची जागा आता कृत्रिम पक्षीच म्हणजे 'ड्रोन' घेतील, असं म्हणन वावगं ठरणार नाही.

-© प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com

Monday, 18 November 2024

रिफर्बीशेड उपकरण व पर्यावरण

           रिफर्बीशेड उपकरण व पर्यावरण 



डिजिटल क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानात सतत बदल होत आहेत. आज खरेदी केलेला मोबाईल, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉडेम, सर्वर इत्यादी उपकरनं पुढील दोन वर्ष आपल्या उपयोगात राहतीलचं याची शास्वती नसते.  सॉफ्टवेअर सतत अपडेट होत असतात. जुनं हार्डवेअर नवीन सॉफ्टवेअरला अपूरं पडतं. नवीन सॉफ्टवेअरला जास्त मेमरी स्टोरेज लागतं. मग नाईलाजाने लगेच हार्डवेअर अपडेट करावं लागतं. मेमरी वाढवावी लागते. उद्योजकाला प्रवाहानुसार 'अपडेट' व्हावं लागतं कारण स्पर्धेतून मागे पडून 'आउटडेट' होण्याची भिती असते. प्रसंगी जुनं हार्डवेअर बदलून नवीन खरेदी करावं लागतं. 

असं वारंवार उपकरण बदलाव लागत असेल तर येत्या काळात किती डिजिटल कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट (इ-वेस्ट) निर्माण होईल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वाढत्या डिजिटल तंत्रज्ञान आणि 5G इंटरनेटमुळे येणाऱ्या काळात सर्व उद्योगात आर्टिफिशियल इंटलीजन्स, आयओटी, रोबोटीक्स शिरकाव करणार आहेत. त्यामुळे नवनवीन उपकरणे वापरात येतील. याच कारणाने इ-वेस्ट वाढून पृथ्वीवरील पर्यावरण दूषित होऊन वनस्पती आणि प्राणिमात्रांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.  याच कारणामुळे सर्व आशियाई राष्ट्र आता ई-वेस्ट कमी करण्यासाठी 'सरकुलर इकॉनॉमि' वर भर देत आहेत. ज्यामध्ये कमीत कमी पर्यावरणाची हानी करणारे उपकरण तयार करने, उपकरण लिजवर देणे, उपकरणाची दुरुस्ती देखभाल करुन त्याला पुनर्वापर (रि्युज) करने याचा समावे्श आहे. 

पूर्वी गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगार खरेदीदारच्या हातगाडीवार वृतमाणपत्राची, वह्या मासिकाची रद्दी नजरेस पडायची. हल्ली जुना टिव्ही, मॉनिटर, सीपीयू, माउस, मोडेम, फ्रिज, बॅटरी, मिक्सर नजरेस पडतात. शहरात घरोघरी ई-वेस्ट निघत असल्यामुळे शहरातील घनकचऱ्यात सुद्धा ई-वेस्ट वाढत आहे.  हा खरेदी केलेला इ-वेस्टचं योग्यप्रकारे रिसायकल करणे किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावने  आवश्यक असते.  घरगुती कचऱ्यात गेलेल्या ई-वेस्ट वस्तूचं योग्यप्रकारे विल्हेवाट होतंच असते असं नाही. बराच इ-वेस्ट मातीत किंवा पाण्यात मिसळत असतं. इ-वेस्ट जेंव्हा माती किंवा पाण्याच्या संपर्कात येतं तेंव्हा त्यातील विषारी घटक पाण्यात मिसळून ते पर्यावरणातील वनस्पती आणि प्राण्यासाठी खूप धोकादायक ठरतात. अशा पाण्यामुळे पचनसंस्थेचे, फुफुसाचे, मेंदूविकाराचे आजार होण्याचा धोका वाढतो. वाढत्या तंत्रज्ञानाचा मानवजात आणि पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. पर्यावरण आणि इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट (ई-वेस्ट) संबंधी शासनाच्या काही पॉलिसी आहेत त्यानुसार पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वेस्टच प्रमाण नियंत्रित करण्याचा तरतुदी आहेत. नादुरुस्त उपकरनं लगेच कालबाह्य न करता दुरुस्त करुन जेंव्हा आपण वापरतो तेंव्हा अप्रत्यक्षपने आपण इ-वेस्ट कमी करत असतो. 

हेच कारण कि येणाऱ्या काळात 'दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रा' ला चांगले दिवस येणार आहेत. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकाकडे यंत्र आणि कॉम्पुटर लॅब उपकरणाच्या दुरुस्ती आणि देखरेखीसाठी खास 'मेंटेन्स विभाग' असतो. उपकरणाची नियमित देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर असते.  मध्यम किंवा छोटया उद्योजकाकडे असा विभाग नसतो.  अशी दुरुस्ती आणि देखरखीची कामे ते फ्रि लांसरना 'आऊट सोर्स' करत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात डिजिटल उपकरण दुरुस्ती आणि ग्राहक सेवा क्षेत्राला प्रचंड मागणी असणार आहे.  दुसरी बाब अशी कि  ग्राहक कोणतंही तांत्रिक उपकरण खरेदी करण्यापूर्वी  ब्रँडचं विक्री नंतरच्या सेवेची खात्री करुन घेत असतो. कारण विक्रीनंतर ऐनवेळी लागणारी सेवा त्वरित मिळाली नाही तर प्रोसेस खोळंबून मोठं नुकसान होणार असतं. त्यामुळे मागील काही वर्षात कस्टमर केअर सेंटर मध्ये प्रचंड वाढ झाली आहे.  हल्ली खरेदीदार गुगलवरील रिविव्ह बघूनच खरेदी करत असतात. त्यामुळे एखादा असंतुष्ट ग्राहक कंपन्याचं नुकसान करू शकतं. काळात ग्राहक त्यासाठी गुगलवर रिव्हीयू बघत असतात. ग्राहक तुमच्या सेवेमूळे संतुष्ट नसेल तर तो गुगल किंवा शॉपिंग साईटवर त्याची प्रतिक्रिया नोंदवेल.  वाईट किंवा नकारात्मक रेव्हिवमूळे उपकरणाच्या विक्रीत मोठी घट होते. त्यामुळे त्वरित सेवा देण्यासाठी कंपन्याना स्वतःच विक्री पश्चात सेवा (आफ्टर-सेल-सर्विस) विभाग असने आवश्यक आहे.

रिफर्बीशड उपकरणाची वाढती मागणी :

पूर्वी कोणतंही उपकरण ग्राहक नवीनच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असायचा. ती एक दीर्घाकालीन गुंतवणूक असल्यामुळे आणि तांत्रिक बिघाडीचा मनस्ताप टाळण्यासाठी ग्राहकांची शक्यतो ते उपकरण किंवा यंत्र 'नवीनच घ्यायचं' अशी मानसिकता असायची.  त्या नवीन उपकरनाशी भावना जुळलेल्या असायच्या. जुनं किंवा वापरलेलं यंत्र(यूजड, सेकण्ड हॅन्ड ) उपकरण सहसा कुणी खरेदी करत नसे. आता ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. रिफरबीशडं उपकरन उपयुक्त असून सर्व गरजा भागवत असेल तर वाजवी किमतीत का खरेदी करायचं नाही? असा विचार नवीन पिढी करत असते.  तेंव्हा वारंवार नवीन उपकरण खरेदी करने टाळून ते रिफरबीशडं खरेदी करतात.  कोरोनाच्या महामारीत वेतन कपात, आर्थिक तंगी आणि सर्व व्यवसाय ऑनलाईन झाल्यामूळे कॉम्पुटर व मोबाईलची मागणी खुपचं वाढली होती. त्या तंगीत नवीन खरेदी शक्य नव्हती.  याचं कारनामुळे  रिफर्बीशड उपकरनाच्या मागणीत खुप वाढ झाली. आज फक्त कॉम्पुटर, प्रिंटर मोबाईल नाही तर इंडस्ट्रियल गॅझेट्स, प्रिंटिंग, बांधकाम, वैद्यकीय, शेतीसंबंधीत अशा सर्वच क्षेत्रातील यंत्र-उपकरनाच्या रिफर्बीशडचं मार्केट वाढलं आहे. रीयुज व रीसायकलिंग वस्तूच्या खरेदीविक्रीत मोठी उलाढाल होऊन 'सरकुलर इकॉनॉमि' ला चालना मिळाली आहे. अशियाई राष्ट्रात 'सरकुलर इकॉनॉमी'चा उद्योगाचा आलेख चढताचं आहे. पृथ्वीच्या पर्यावरणाला इ-वेस्टचा मोठा धोका आहे. हा धोका लक्षात घेवून भारताने रिफर्बीशडवर आधारित सरकुलर इकॉनॉमिला एक प्रकारची चालणाचं दिली आहे. कॉम्पुटर व मोबाईलसारख्या डिजिटल उपकरणाचा रिफर्बीशडमध्ये मोठा वाटा आहे. या उद्योगात जुने उपकरण खरेदी करुन त्यातील तांत्रिक दोष दूर करुन नेमलेल्या डीलर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नवीन वस्तूच्या किमतीच्या ५०-७०% स्वस्त किमतीत ते सर्रास विकले जातात.  पुढील वर्षापर्यंत भारतीय मार्केट 2X म्हणजे दुपटीने वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. इंटरनेटचा वाढता वापर 4G, 5G स्पीड मूळे येणाऱ्या काळात डिजिटल उपकरणाची खरेदी निश्चित वाढणार आहे.  वाऱ्याची दिशा बघून आता आंतर्देशीय कंपन्यानी या क्षेत्रात उतरल्या आहेत. वॉरंटी, उत्तम ग्राहक सेवा व विक्री किमतीमध्ये स्पर्धा करुन त्या रिफर्बीशडमध्ये मोठी उलाढाल करत आहेत. त्यामुळे उपकरणाच्या दुरुस्ती आणि देखभाल व्यवसायातसुद्धा खूप वाढ होणार आहे.

गरज आहे पर्यावरण रक्षणाची, इ-वेस्ट कमी करण्याची, इ-वेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून पृथ्वीच्या पर्यावरणाला दूषित होण्यापासून वाचविण्याची. 

©प्रेम जैस्वाल, छ. संभाजीनगर 
९८२२१०८७७५






Saturday, 16 November 2024

कृत्रिम बुद्धिमत्ता: हर मुश्किल में आप के साथ!


          

सभी व्यवहार ऑनलाइन होने के कारण मोबाइल जीवन का अभिन्न अंग बन गया है। मोबाइल के बिना जीवन बिताना अब मुश्किल है। लेकिन आजकल ऐसा होता है कि महत्वपूर्ण काम करने के लिए आप मोबाइल चालू करते हैं लेकिन बीच में आपकी पसंद की पोस्ट या रील स्क्रीन पर शुरू हो जाती है। आप उस पोस्ट से 'हुक' हो जाते हैं और उसमें उलझ जाते हैं। फिर रील के बाद रील आती जाती हैं। उसका आनंद लेते हुए, कमेंट्स में चल रहे वाद-विवाद पढ़ते हुए कब आपका एक घंटा बर्बाद हो गया, यह आपको पता भी नहीं चलता। अरे! मैंने तो किसी को कॉल करने के लिए मोबाइल हाथ में लिया था, मेरा एक घंटा बर्बाद हो गया! आपके साथ यह निश्चित रूप से हुआ होगा। आर्टिफिशियल इंटेलिजेंस यानी कृत्रिम बुद्धिमत्ता की यही कीमिया है। आगे का लेख पढ़कर ऐसा क्यों होता है यह आपको समझ में आ जाएगा ऐसी मैं आशा करता हूं। इसके आगे आर्टिफिशियल इंटेलिजेंस का केवल 'एआई' ऐसा संक्षिप्त उल्लेख मैं करूंगा।

बुद्धिमत्ता, सृजनशीलता, कल्पनाशक्ति जैसे कुछ विशेष गुणों के कारण मनुष्य इस धरती पर अधिराज्य चलाता आया है। लेकिन अब वह अपनी तीक्ष्ण बुद्धिमत्ता के बल पर अपने जैसी ही बुद्धिमत्ता वाली तकनीक या मशीन बनाने का प्रयास कर रहा है। किसी कंप्यूटर मशीन में मानव जैसी बुद्धिमत्ता विकसित करने की इस तकनीक को कृत्रिम बुद्धिमत्ता या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) कहा जाता है। निश्चित रूप से ऐसी बुद्धिमत्ता विकसित करने के लिए उस सिस्टम या मशीन को पहले सिखाना आवश्यक है। इस सिखाने की प्रक्रिया को मशीन लर्निंग (एमएल) कहा जाता है। इसी कारण से एआई के साथ एमएल का भी उल्लेख होता है, एआई-एमएल (AI-ML) ऐसे।

एआई-एमएल कैसे काम करता है यह समझने के लिए हम एक उदाहरण देखें। घर में एक छोटा बच्चा है। घर में घूमते समय घर की सभी वस्तुओं का ज्ञान हम उसे देते रहते हैं। उन वस्तुओं को देखकर वह लगातार सीखता रहता है। जैसे-जैसे बच्चा बड़ा होता जाता है, वैसे-वैसे उसके ज्ञान में वृद्धि होती जाती है। उसे बिल्ली दिखाई जाए तो बिल्ली का आकार उसके दिमाग में फिट बैठ जाता है। बिल्ली का रंग, चार पैर, मुंह पर लंबी मूंछें, चलने का अंदाज़, उसकी आवाज़ यह सब वह देखकर, निरीक्षण करके सीखता जाता है। इसी तरह वह घर के अन्य सदस्यों की जानकारी लेता है। साथ ही फर्नीचर, फल या अन्य निर्जीव वस्तुओं के बारे में भी वह सीखता जाता है। एक बार जब उसने अपने दिमाग में यह सारा ज्ञान स्टोर कर लिया तो अगली बार उसके सामने कोई प्राणी आएगा तो वह आसानी से बता सकेगा कि वह बिल्ली है। यह निर्जीव वस्तु कुर्सी है। यह कैसे संभव हुआ? उस बच्चे को हमने सिखाया, वह सीखता गया और अब उसके पास इतनी बुद्धिमत्ता विकसित हो गई है कि वह सभी वस्तुओं को पहचान सकता है। जैसे-जैसे उम्र बढ़ेगी वैसे-वैसे उन वस्तुओं के बारे में ज्ञान में वृद्धि होगी।

एआई का विकास करते समय वैज्ञानिकों ने इन सभी बातों का सूक्ष्म विचार करके यह तकनीक विकसित की है। निश्चित रूप से यह करने के लिए गणित शास्त्र का निश्चित उपयोग हुआ है। जब हम कंप्यूटर या मशीन पर काम करते हैं तब हमें क्या पसंद है, कौन से गाने पसंद हैं, कौन सी फिल्में, सीरियल पसंद हैं यह एक बच्चे की तरह मशीन सीखती जाती है। शॉपिंग करते समय हमें कौन से रंग, डिज़ाइन, पैटर्न, कीमत के कपड़े पसंद हैं यह हमारे सर्च डेटा से मशीन सीखती रहती है। इसे मशीन लर्निंग कहा जाता है। एक बार जब मशीन आपका सर्च डेटा छान-बीन कर आपकी पसंद समझ लेती है, तो अगली बार जब आप मोबाइल चालू करते हैं तब आपके सामने आपके पसंद के गाने, सीरियल, मूवी या शॉपिंग वस्तुएं दिखाई देती हैं। यह सब मशीन लर्निंग एल्गोरिदम से होता है। बहुत से नेट उपयोगकर्ताओं को यह प्रश्न पड़ता है कि मोबाइल या कंप्यूटर को हमारी पसंद कैसे पता चलती है? वह इतना बुद्धिमान कैसे है? तो इसका उत्तर यह है कि उसे आपने ही समझदार बनाया है। आपने अपनी सर्च में जो-जो देखा है वह उस मशीन ने अपने पास स्टोर कर लिया है (निश्चित रूप से मशीन लर्निंग की वजह से!)।

दैनिक जीवन में हम परिवार के सदस्यों, दोस्तों के साथ विभिन्न विषयों पर चर्चा करते रहते हैं। कभी प्रत्यक्ष तो कभी मोबाइल पर। कृपया ध्यान रखें, आपका प्रिय मोबाइल आपकी बातचीत सुन रहा होता है। अगले क्षण जब मोबाइल चालू करते हैं तो आपके द्वारा चर्चा किए गए विषय से संबंधित रील्स या पोस्ट आपको स्क्रीन पर चमकती हुई दिखाई देती हैं। कई बार आपके मन में कुछ चल रहा होता है और ठीक वही पोस्ट स्क्रीन पर दिखाई देती है! यह कैसे संभव है? दरअसल जब आप चर्चा कर रहे होते हैं तब आपकी बातचीत का एक-एक शब्द आपका मोबाइल 'डेटा' के रूप में ले रहा होता है। इससे आपकी पसंद और चर्चा का सटीक विषय क्या है यह मोबाइल/मशीन को पता चल जाता है। उस संपूर्ण बातचीत के डेटा (बिग डेटा) से सटीक महत्वपूर्ण जानकारी को वह व्यवस्थित तरीके से अलग करके आपके सामने उस वस्तु या सेवा के विक्रय का विज्ञापन चमकाता है। बिना काम के विशाल डेटा से कामकाजी मूल्यवान जानकारी निकालने की प्रक्रिया को 'डेटा माइनिंग' कहा जाता है। मिट्टी से सोना निकालने जैसी यह प्रक्रिया होती है। ऑनलाइन शॉपिंग, विज्ञापन, फ्रॉड डिटेक्शन में इसका उपयोग होता है। संक्षेप में आपकी पसंद-नापसंद की जानकारी परिवार के सदस्य की तरह आपके मोबाइल को भी मालूम होती है।

गूगल पर या ईमेल में कुछ टेक्स्ट टाइप करते समय अपने आप अगले शब्द प्रकट होते हैं और हमारे टाइपिंग का काम वे आसान करते जाते हैं, ऐसा होता है ना? आपने भी यह जरूर अनुभव किया होगा। होता यूं है कि जब लाखों गूगल उपयोगकर्ता ईमेल पर पत्र लिखते हैं तब मशीन अपने आप यह सीखती जाती है। जैसे कि मशीन को समझ में आता है कि लोगों ने To Whomsoever... ऐसा टाइप किया तो 90% उसके अगले शब्द it may concern ऐसे होते हैं। निश्चित रूप से यहाँ एनएलपी (नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग) काम आता है। मशीन लर्निंग की वजह से मशीन यह सीख लेती है। फिर जब हम To whomsoever टाइप करते हैं तो it may concern शब्द अपने आप स्क्रीन पर प्रकट होते हैं। थैंक्स टू एआई-एमएल!

आज के समय में एआई के तीन प्रकार हैं। नैरो एआई, जनरल एआई और सुपर इंटेलिजेंट एआई। जिस एआई की बुद्धिमत्ता मानवीय बुद्धिमत्ता से कम है उसे नैरो एआई कहा जाता है, जबकि जो एआई मानवीय बुद्धिमत्ता की बराबरी कर सकता है उसे जनरल एआई कहा जाता है। लेकिन जिस एआई की बुद्धिमत्ता मानवीय बुद्धिमत्ता से भी आगे काम करती है उसे सुपर इंटेलिजेंट एआई कहा जाता है। वर्तमान में हमारी मदद नैरो एआई कर रहा है। संक्षेप में हम पूरी तरह से एआई पर विश्वास न रखते हुए मानवीय बुद्धिमत्ता के साथ मिलकर कोई निर्णय लेते हैं। नैरो एआई के कुछ उदाहरण हम देखें।

ऑनलाइन शॉपिंग करते समय पहले की हमारी कपड़ों की खरीदारी का पैटर्न देखकर एआई उसी जैसी कुछ वस्तुएं स्क्रीन पर दिखाता है, लेकिन उनका रंग या डिज़ाइन हमें सूट करेगा ही, ऐसा नहीं होता। इसलिए हम उनका चयन नहीं करते। यहाँ मानवीय बुद्धिमत्ता का उपयोग करके हम निर्णय लेते हैं। गूगल पर कोई वाक्य टाइप करते समय हर बार हम एआई द्वारा सुझाए गए तैयार शब्दों का उपयोग नहीं करते। यूट्यूब पर गाने सुनते समय पसंदीदा प्रकार के गानों की सूची स्क्रीन पर चमकती है, क्या हम सभी गाने सुनते हैं? नहीं। उनमें से कुछ गानों का संगीत, गीत, अभिनेता, अभिनेत्री हमें पसंद नहीं होने के कारण हम कई बार उन्हें टालते भी हैं। कार से यात्रा करते समय हम हमेशा जीपीएस के निर्देशों का पालन नहीं करते। उसके द्वारा सुझाया गया मार्ग होने के बावजूद उस सड़क पर गड्ढे, सुनसान रास्ता होने के कारण हम उस मार्ग से यात्रा करना टालते हैं। बीमारी का निदान करते समय चिकित्सा विशेषज्ञ मशीन रिपोर्ट की रीडिंग पर 100% निर्भर नहीं रहते बल्कि अपने क्लिनिकल परीक्षण का वे आधार लेते हैं। यहाँ उनका लंबा अनुभव काम आता है। इलाज करते समय डॉक्टर प्रत्येक मरीज की लाइफस्टाइल, आनुवंशिक पारिवारिक इतिहास, दवा की एलर्जी, अन्य बीमारियों का अध्ययन करके ही इलाज करते हैं। यह है नैरो एआई जो केवल मानवीय बुद्धिमत्ता की मदद करता है।

दूसरा प्रकार है जनरल एआई। इस एआई प्रकार में यह मानवीय बुद्धिमत्ता के बराबर काम करने में सक्षम होगा। यह नैरो एआई का अगला चरण होगा। इसमें मशीन लर्निंग की जगह डीप लर्निंग लेगा, जिसके लिए विशाल मात्रा में डेटा की जरूरत पड़ेगी। जनरल एआई और भी ज्यादा शक्तिशाली होगा क्योंकि इसके पास मानवीय बुद्धिमत्ता के बराबर डेटा या जानकारी होगी। चालक रहित कार जनरल एआई का एक बेहतरीन उदाहरण है। सही निर्णय लेने के लिए इनमें कई प्रकार के सेंसर, रडार और लिडार जैसे उपकरण जोड़े जाते हैं।

तीसरा प्रकार है सुपरइंटेलिजेंट एआई। इसके नाम के अनुसार, यह मानवीय बुद्धिमत्ता से भी आगे का एआई होगा। फिलहाल यह केवल कल्पनाओं तक सीमित है और वास्तविक दुनिया में इसका कोई अस्तित्व नहीं है। आजकल विज्ञान पर आधारित फिक्शन फिल्मों में इसे देखा जा सकता है। भविष्य में, इसकी बुद्धिमत्ता इतनी विकसित होगी कि यह अगले साल पृथ्वी पर होने वाले परिवर्तनों की सटीक भविष्यवाणी करने में सक्षम हो सकता है!

'जहाँ भी जाता हूँ, वहाँ तू मेरे साथ है...' संत तुकाराम ने ये पंक्तियाँ अपने विठुराय के बारे में लिखी थीं। मैं जहाँ भी जाता हूँ, मेरा विठ्ठल मेरे साथ रहता है। वह मेरा हाथ थामकर मुझे गिरने नहीं देता, गलती या कोई अनहोनी नहीं होने देता - ऐसा है मेरा विठ्ठल!
आज के दैनिक जीवन में एआई (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) भी इसी तरह हर समय हमारे साथ रहता है और यह सुनिश्चित करता है कि हमसे गलती न हो, और हमें कोई धोखा न दे। आजकल ऐसा कोई भी क्षेत्र नहीं बचा है जहाँ एआई ने प्रवेश न किया हो। फिर चाहे वह उद्योग, कृषि, शिक्षा, स्वास्थ्य, वित्त, रक्षा, मनोरंजन क्षेत्र हो या जीवन को सुगम बनाने वाले ऑनलाइन शॉपिंग और फूड प्लेटफॉर्म। सभी क्षेत्रों में एआई के प्रवेश के कारण उस क्षेत्र के काम सरल हो गए हैं और उनमें गति, कार्यक्षमता, और विश्वसनीयता में उल्लेखनीय वृद्धि हुई है।

अगर कोई उपकरण काम नहीं कर रहा है, तो अब कस्टमर केयर नंबर डायल करने की जरूरत नहीं है। एआई आपकी मदद के लिए तत्पर है। चैटबॉट को चालू कर आप अपने सभी सवालों के जवाब तुरंत पा सकते हैं। धोखाधड़ी या फर्जीवाड़ा रोकने के लिए एआई आपके चेहरे की पहचान के बिना लॉक नहीं खोलता। यहाँ वह एक सुरक्षा गार्ड की भूमिका निभाता है।
ऑनलाइन खरीदारी करते समय, वह आपकी मदद एक दोस्त की तरह करता है, यह बताता है कि कितने लोगों ने वह वस्तु खरीदी है, उसके साथ कौन सी चीज सूटेबल है, और कौन सा अन्य रंग मेल खा सकता है। जोखिम भरे लेन-देन के समय, एआई फेस और फिंगर स्कैन करके आपके पैसे सुरक्षित रखता है। कार से यात्रा करते समय, वह सही मार्ग, रास्ते में आने वाली रुकावटें, सड़क की स्थिति, ईटीए (एस्टिमेटेड टाइम ऑफ अराइवल), और मौसम की वास्तविक समय की जानकारी देकर एक गाइड की भूमिका निभाता है। वहीं, कभी-कभी ड्रोन के माध्यम से दुश्मन देश की गतिविधियों को ट्रैक करके सेना की मदद करके देश की रक्षा में अपना योगदान देता है। बीमारियों का सही निदान करने के लिए वह संभावित बीमारी का नाम बताकर डॉक्टरों को इलाज में सहायता करता है। आजकल ग्रामीण इलाकों के किसान भी अगले चौबीस घंटों में मौसम की जानकारी मोबाइल पर देखकर अपने काम की योजना बनाते हैं। एआई फसल की बुवाई और रखरखाव जैसे कृषि कार्यों में मदद करता है और बाज़ार में अनाज के भाव और भविष्य के भावों का अनुमान देकर किसानों को जानकारी देता है।
हवाई यात्रा में, पायलट को मौसम की स्थिति और संभावित खतरों के बारे में पहले से ही सूचित करता है। हवाई टिकट बुक करते समय चैटबॉट और सही मार्ग चुनने में एआई मदद करता है। बिजली की खपत को सही तरीके से प्रबंधित करने और लीकेज को कम करने के लिए ग्रिड का सही प्रबंधन करने में एआई का उपयोग किया जाता है। वहीं, कोरोना जैसी महामारी में वैक्सीन संबंधित रिसर्च और विकास में वैज्ञानिकों की मदद की थी। शेयर मार्केट में, वह एक वित्तीय सलाहकार की भूमिका निभाता है। पिछली घटनाओं का विश्लेषण करके निवेशकों को शेयर के अगले ट्रेंड और जोखिम के बारे में जानकारी देता है। उद्योग जगत के लिए तो एआई एक वरदान साबित हो रहा है। उत्पादन को सुचारू रूप से चलाने के लिए वह कच्चे और तैयार माल की वास्तविक समय में निगरानी करता है और सुझाव देता है। उत्पादन के लिए आवश्यक मशीनों की सही देखभाल और प्रिवेंटिव मेंटेनेंस चार्ट तैयार करके डाउntime को कम करता है।

नई तकनीक हमेशा मानव के कल्याण के लिए ही होती है। इसके कई फायदे होते हैं, लेकिन इसके नुकसान भी होते हैं। जैसे कंप्यूटर के आने से टाइपराइटर बंद हो गए। मोबाइल के कारण लैंडलाइन, एसटीडी-पीसीओ बूथ गायब हो गए। ऑनलाइन बुकिंग की वजह से बस, ट्रेन, विमान यात्रा, सिनेमा, और नाटक के टिकट बेचने वालों की नौकरियाँ खत्म हो गईं। सीसीटीवी के कारण चौकीदार की नौकरी में कटौती हो गई। ईमेल, व्हाट्सऐप, अमेज़न, फ्लिपकार्ट के कारण डाक विभाग अब केवल एफडी योजनाओं तक ही सीमित रह गया है। अब एआई (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) के आने से स्थिति और गंभीर होती दिख रही है, जिससे लोगों को डर लग रहा है कि हालात और बिगड़ सकते हैं।

लेकिन डरने की कोई वजह नहीं है। एआई के कारण कुछ नौकरियाँ भले ही बंद हो रही हों, लेकिन प्रोग्रामिंग, कोडिंग, और एआई से संबंधित आईटी क्षेत्रों में नए अवसर खुलने जा रहे हैं। बस जरूरत है समय के साथ बदलाव को अपनाने की और नई स्किल्स सीखने की।

गूगल के हेड सुंदर पिचाई ने हाल ही में कहा था कि, "गूगल में अब 25% प्रोग्रामिंग का काम एआई कर रहा है!" मानव जाति ने अपनी बुद्धिमत्ता का उपयोग करके एआई तकनीक का विकास किया। अब वही एआई मानव की तरह काम करके, उसी मानव जाति की नौकरियों के अवसर कम कर रहा है। यह कुछ वैसा ही है जैसे भस्मासुर ने भगवान शिव के सिर पर हाथ रखने की कोशिश की थी!

हालाँकि विज्ञान ने चाहे कितनी भी तरक्की कर ली हो, मानवीय बुद्धिमत्ता से आगे जाना इतना आसान नहीं है। कल्पनाशीलता, विचार शक्ति, अंतरात्मा की आवाज, मानवता, भावनाएँ, छठी इंद्रिय, और गट फीलिंग जैसी कुछ क्षमताएँ हैं जिनका समावेश एआई में करना आसान नहीं है। 'अति सर्वत्र वर्जयेत' की तरह एआई का भी अतिरेक नहीं होना चाहिए।

© प्रेम जैस्वाल (छ. संभाजीनगर, महाराष्ट्र)
    मो. 9822108775.
(नाम के साथ आप यह आर्टिकल शेअर कर सकते है l प्रकाशन के लिए लेखक की परवानगी जरुरी l)