एमसीबी कसा ट्रिप होतो ?
विजेचं शॉर्ट-सर्किट होऊन आग लागल्याच्या बातम्या आपण वाचतो. असे प्रकार घडू नयेत म्हणून हल्ली प्रत्येक घर-कार्यालयामधील विजेच्या मुख्य-बोर्डावर मिनिएचर सर्किट ब्रेकर [एमसीबी] लावलेले असतात. हा एमसीबी सर्किट ब्रेक करण्याचं काम करतं, कसे ?
हे माहित करून घेण्यापूर्वी आपण लाईटमीटर जवळचा 'फ्यूज' कीटकॅट कसा काम करतो, हे आधी बघूया. कारण कालच्या फ्युजची जागाच आज एमसीबीनं घेतली आहे. घरातील वायरिंग किंवा उपकरणात बिघाड झाल्यास पूर्वी फ्यूज 'उडत' असे. त्यामुळं हा फ्यूज कसा उडतो, ते आधी बघू.
मुळात विद्युत महामंडल आपल्याला २३० व्हॉल्टचा अखंड विद्युत पुरवठा करत असते. त्या विजेला आपण उपकरण जसेकी लाईट, फॅन, मोटार इ. जोडले तरंच त्यातून करंट [विद्युत प्रवाह] वाहत, नसता करंट वाहत नाही. जेंव्हा एखाद उपकरण चालू असतं तेंव्हा त्यातून ठराविक प्रमाणात करंट वाहत असतं. पण जेंव्हा एखादया उपकरणात बिघाड होतो तेंव्हा त्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेतून खूपच जास्त करंट वाहत. या जास्त करंटमूळ त्या तारेत प्रचंडउष्णता निर्माण होते आणि ती तार तापते. हा प्रकार वेळीच थांबवला नाही तर घरातील तारा काही क्षणातच वितळतात. मग 'शॉर्ट सर्किट' होऊन घराला आगही लागू शकते.
असं घडू नये म्हणून मीटरच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचा फ्यूज (किटक्याट) लावलेला असतो. या किटक्याट मध्ये एक विशिष्ट धातूची बारीक तार जीला 'फ्युजतार' असेही म्हणतात. तीचा 'मेलटिंग पॉईंट' खूप कमी असतो. हि तार उष्णतेने थोडीशी जरी तापली तरी वितळून तुटून जाते. त्यामुळं वीज पुरवठा खंडीत होतो. विद्युत मोटारीत बिघाड, बोअरमध्ये बिघाड झाल्यास किंवा अपेक्षेपेक्षा जास्त लोड वाढल्यास सुद्धा हि फ्यूजतार वितळते. फ्यूज तार वितळून, वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळं वायरिंग जळून अख्या घराला आग लागण्याचे प्रकार टाळले जातात. पण त्यामध्ये पुन्हा पुन्हा फ्यूजतार बदलण्याची कटकट असायची. शिवाय फ्यूजतार बदलताना शॉक लागण्याची भीती असायची. त्यामुळं हल्ली फ्युजला पर्याय म्हनून सर्वत्र 'एमसीबी' च वापरतात. करंट प्रमाणाबाहेर वाढल्यास हा एमसीबी ट्रिप होतो. उपकरणातील दोष काढून आपण पुन्हा तो सहज चालू करू शकतो. या एमसीबीच काम खूप मजेदार असतं.
शालेय विज्ञानात आपण सर्वच हे शिकलो आहो कि-
' 'जेंव्हा दोन धातूच्या पट्या सोबत तापविल्या तर त्या प्रसरण पावतात.'
एमसीबीमध्ये याच सिद्धांताचा खुबीनं उपयोग केलेला असतो. एमसीबी मध्ये फ्यूज तारची जागा ह्या दोन भिन्न धातूच्या पट्या घेतात. जेंव्हा जास्त करंट वाहतं तेंव्हा उष्णतेमुळं ह्या पट्या तापतात आणि प्रसरण पावतात. त्यामुळं एमसीबीचा खटका खाली पडुन वीज पुरवठा खंडीत होतो, अपघात टळतो.
ज्यामुळे तो खटका खाली पडला तो उपकरणातील दोष निस्तारून आपण सहजपणे पुन्हा तो एमसीबी चालू करू शकतो. थोडक्यात सुरक्षेच्या दृष्टीनं एमसीबी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. हल्ली इलेक्ट्रिशियन प्रत्येक खोली किंवा मोठ्या उपकरणासाठी वेगळा एमसीबी लावतात जेणेकरून घरातील इतर भागाचा विद्युत पुरवठा खण्डित होत नाही. थोडक्यात, घरासाठी एमसीबी म्हणजे एक प्रकारचा 'सेक्युरिटी गार्ड'चं !
अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी 'चतुर्थ स्थंब' ब्लॉगचे इतर लेखही वाचा.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट
- प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

No comments:
Post a Comment