बाजारातून खरेदी केलेल्या बऱ्याच वस्तूच्या पॅकिंगमध्ये आपल्याला एक छोटासा राखाडी रंगाचं 'पाऊच' दिसतो. त्यावर स्पष्ट लिहिलेलं असतं ' थ्रो अवे, डू नॉट इट' [फेकून द्या, खाऊ नका] . पॅकिंग उघडल्यानंतर आपण तो लगेच फेकून देतो. पण ते काय असतं? ते कशासाठी ठेवल्या जातं?
कारखान्यात पॅकिंग झालेल्या वस्तू विक्रेत्याकडून विक्री होऊन ग्राहकाच्या हातात पोहचण्यासाठी बरेच दिवस लागतात. हा काळ निश्चित नसतो. खूपदा तो माल कितीतरी महिने वा वर्ष स्टोकिस्ट, डीलरकडे पडून राहतो. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू आहेत त्यामुळे तापमानात सतत बदल होत असतात. कोरडं हवामान ठीक पण ओल्या हवामानात आद्रतेमुळं वस्तू खराब होतात, बुरशी लागते. हे टाळण्यासाठीच ओलावा शोषून घेणारी 'सिलिका जेल' त्यात ठेवलेली असते. सिलिका जेल म्हजेचं सिलिका डायऑक्साईड. तिच्या गुणधर्म असतो की ती हवेतील ४०% आद्रता शोषून घेते. सिलिका जेल जास्तीत जास्त 4 ते 12 महिने वस्तू टिकवून ठेवू शकते.
लेदर फूटवेअर, मोबाईल, वॉचेस, इलेक्ट्रिनिक्स गॅझेट्स, थर्मास, गॉगल इ. वस्तूच्या पॅकिंगमध्ये ती आढळते.

No comments:
Post a Comment