काही उपकरणाच्या बटनावर अशीच खूण का असते ?
दैनंदिन जीवनात आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टीव्ही, ऑडिओ सिस्टीम, रेफ्रिजरटर, वॉशिंग मशीन, एसी, तसेच ऑफिसमध्ये कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, युपीएस, वॉटर फिल्टरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळत असतो. हल्ली सर्वच इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये थोडंफार इलेक्ट्रॉनिक्स भाग असतोच.
वरील सर्व उपकरण चालूबंद करण्यासाठी एक बटन असतं. वरील सर्व उपकरणाच्या पॉवर ऑन-ऑफ बटनाकडे बघितलं तर लक्षात येईल की काही ठराविक उपकरणाच्या बटनावरचं एक गोल मोठी रिंग ' ० 'असते आणि त्यावर ' I ' असा मार्क असतो. याचं कारण काय ?
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दोन प्रकार असतात, एक ऍनॉलॉग आणि दुसरा डिजिटल. ऍनॉलॉग हे जुन्या पद्धतीचे उपकरण ज्याचे सर्व पार्ट ऍनॉलॉग असतात. वाहणार करंट किंवा माहिती हि ऍनॉलॉग असते.
डिजिटल उपकरणात वाहणारी माहिती हि हाय आणि लो स्वरूपात असते. हाय म्हणजेच वन (1) आणि लो म्हणजे झिरो (०) अशा स्वरूपात असते. मोबाईल, लॅपटॉप, कंप्युटर, स्कॅनर, टॅब, एलसीडी टीव्ही हे सर्व डिजिटल उपकरण आहेत. या डिजिटल उपकरणात डिजिटल आयसी, मायक्रोप्रोसेसरसारखे नाजूक पार्ट जोडलेले असतात. हे सर्व उपकरण डिजिटल आहेत हे लक्षात यावं म्हणून 'पॉवर ऑन-ऑफ' हे एकसारखं म्हणजे फोटोतं दाखविल्याप्रमाणं असतं. या सिम्बॉलमध्ये एक मोठा 'झिरो' आणि '1' दडलेला आहे.
डिजिटल उपकरण वापरायला नाजूक असतात त्यामुळं त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
अशाच इतर मनोरंजक प्रश्नाच्या उत्तरासाठी या ब्लॉगचे इतर लेखही वाचा. हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.
© काॅपीराईट
- प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com

No comments:
Post a Comment