ad1

Wednesday, 25 September 2024

गरज राईट टू डिस्कनेक्टची!

गरज 'राईट टू डिस्कनेक्ट' ची !

   
अविरत कामाच्या ताणतणावाने पुण्यातील EY या आंतर्देशीय कन्सल्टन्सी कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट पदावर काम करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे कार्यालयीन ताणतणावाचा प्रश्न ऐरणीवर येऊन अख्ख उद्योगजगत ढवळून निघनं साहजिक होतं. जनसामान्यात या घटनेचा उद्रेक, समाज माध्यमातून उमटनारी प्रतिक्रिया बघून केंद्र आणि राज्यशासनाने या घटनेची दखल घेतली. भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर 'राईट टू डिस्कनेक्ट' सारख्या कायद्याची गरज पडणार आहे. त्या कायदयाबद्दल हा लेख.

निरोगी मनुष्यबळ ही देशाची संपत्ती असते. त्यामुळे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्याचे आरोग्य हा महत्वाचा विषय आहे. पण हल्ली खासगी कंपन्या उत्पादकता वाढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवतात. ऑन-लाईन संस्कृती रुजू झाल्यामुळे ऑफिसची कामे घरी नेली जातात. स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या अतिवापरामुळे डिप्रेशन, निद्रानाश डीव्हीटी, पाठी- मनक्याचे सारखे आजार उदभवून कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडत आहेत. 'कनेक्टिंग पिपल'. जगविख्यात मोबाईल कंपनी 'नोकिया' ची ती टॅगलाईन. बदलत तंत्रज्ञान, घटत्या किमती, विविध ऐप्स आणि मोफत मिळणाऱ्या डाटामुळे आज जग किती कनेक्ट झालं ते सांगायची गरज नाही. भारत देशातच मोबाईल ग्राहकांची संख्या आज देशाच्या लोकसंख्येइतकी म्हणजे 140 करोडच्या घरात गेली आहे. अर्थात 'अति सर्वत्र व्रजयेत' प्रमाणे त्याचे भयंकर दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. स्मार्टफोनमुळे कितीतरी नवीन आजारांनी जन्म घेतला आहे. हा आजाराचा स्फोट घडवून जनतेचे मानसिक व सामाजिक आरोग्य बिघडू नये म्हणून काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी कांग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत 'राईट टू डिस्कनेक्ट' हे खाजगी विधेयक मांडल होतं. गदारोळात त्यावर पाहिजे तशी चर्चा घडताना दिसली नव्हती. कदाचित इतर खासदारांना या विधेयकाच गांभीर्य त्या वेळेस समजलं नसावं. एरव्ही तरी एकदा खासदार निवडून गेल्यानंतर 'राईट टू डिस्कनेक्ट' चा अधिकार त्यांना आपसूकच मिळतचं असतो. प्रश्न असतो तो सामान्य जनतेचा, त्यांच्या मानसिक व सामाजिक आरोग्याचा.

देशातील करोडो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे विधेयक खुप महत्वाचं आहे. हे विधेयक सर्वसंमतीने मंजूर झाल्यास देशातील सर्व आस्थापणाला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक 'कर्मचारी कल्याण समिती' स्थापन करावी लागेल. हि समिती कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा ठरवून त्यांना करावयाच्या कामाचे प्रमाण व स्वरूप ठरवेल. ठरलेल्या वेळेनंतर कार्यालयातुन आलेला फोन न घेण्याचा किंवा इ-मेलला उत्तर न देण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना असेल. अर्थात अवेळी आलेल्या फोन वा इ-मेल स्विकारला तरी त्यानुसार काम करण्यास कर्मचारी नकार देऊ शकतील. त्यावर व्यवस्थापन शिस्तभंगाची कारवाई करू शकणार नाही. तसेच कामाच्या वेळेच्या अतिरिक्त काम करणे आवश्यक झाल्यास व्यवस्थापन त्या अधिक वेळे [ओव्हर टाईम] चे पैसे देईल.

तशी 'राईट टू डिस्कनेक्ट' ची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. फ्रांसच्या लक्षात आलं की मोबाईलमुळे त्यांच्या देशाची कार्यशीलता, उत्पादकता वाढली हे निश्चित पण ती कोणत्या किमतीवर? वाढत्या स्मार्टफोनच्या वापराचे फ्रांसमध्ये ऑन-लाईन संस्कृतीचा अतिरेक झाला होता.  ह्या घातक संस्कृतीचा कामगार वर्गांना आपलं कार्यालयीन काम आणि   वैयक्तिक जीवनाचं संतुलन करनं कठीण झालं होत. चोवीस तास बारा महिने सेवा देण्याच्या नादात अशा किती तरी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेनंतरसुद्धा मोबाईलवर व्यस्त ठेवत असत. त्यामुळे उद्योगाची उत्पादकतेमध्ये जरी वाढ होत असली तरी कर्मचाऱ्यांच मानसिक ताणतणाव वाढून आरोग्य बिघडत चालले होते. संसदेत मांडलेल्या आकड्याप्रमाणे 12 % काम करणाऱ्या लोकांना बर्न आऊट सिंड्रोमचा त्रास झाला होता, तर 37% लोकांनी कामाव्यतिरिक्त स्मार्टफोन वापरण्याची कबुली दिली. त्यामुळे स्मार्टफोनमुळे होणारे दुष्परिणाम वाढून फ्रान्सच्या सर्वच स्तरातून अतिवापरला विरोध होत होता. त्यामुळं फ्रांस सरकारच्या लक्षात आलं कि ज्या प्रमाणे ऑफिसमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला टार्गेट दिल्या जातं तसं त्यांच्या खाजगी जीवनातही काही टार्गेट ठरलेले असतात. ऑफिसच्या कामामुळे खाजगी टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ व ऊर्जा शिल्लक राहत नाही. पूर्वी ऑफिसमधून घरी गेल्यानंतर फ्रेंच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना इ-मेलद्वारे सूचना किंवा संदेश देत असत. त्यामुळे विविध स्तरातून एकच सूर निघत होता- राईट टू डिसकनेक्ट ! फ्रांस सरकारने १ जानेवारी २०१७ पासून कामगारांना 'राईट ऑफ डिस्कनेक्ट' चा अधिकार बहाल केला. या नियमानुसार कामगारांना आपल्या कामाच्या वेळे व्यतिरिक्त स्मार्टफोन न बाळगण्याची मुभा दिली. या नविन कायद्यामुळे त्यांची डोकेदुखी बंद झाली आहे. कामाव्यतितिक्त वेळेत त्यांना इ-मेल घेणे-न घेण्याची मुभा आहे. अप्रत्यक्षपणे, या कायद्यामुळे फ्रांस सरकारने कर्मचाऱ्यांना जीवनाचा आनंद घेण्याचं प्रशिक्षण दिल्यासारखं आहे. आज जास्तीत जास्त फ्रान्सच्या कंपन्यांनी वेळेनंतर कर्मचाऱ्यांना त्रास देणे बंद केले आहे. त्याच्या पाठोपाठ जर्मनी आणि इतर विकसित देशांनी 'राईट टु डिसकनेक्ट' च पालन करणे सुरू केलं आहे.

आज आपल्या देशात परिस्थिती फारसी वेगळी नाही. आपल्याकडेही ऑनलाईन संस्कृतीत प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याच्या भानगडीत कर्मचाऱ्याकडून कार्यालयीत वेळेनंतरसुद्धा काम करून घेतलं जातं. मग अगदी सणासुदीला, लग्नसमारंभात स्मार्टफोनवर कार्यालयीन संभाषनं ऐकू येतात. अगदी जेवताना स्मार्टफोनवर झापाझापी सुरु असते. थोडक्यात खाजगी कंपन्यांचे कर्मचारी शरीराने जरी घरी असले तरी त्यांचा स्मार्टफोन वैयक्तिक जीवन जगू देत नाही. ते आपलं कार्यालयीन आणि खाजगी जीवनाचं संतुलन करू शकत नाही. त्यामुळे गाडी चालवताना स्मार्टफोन वापर करून अपघात घडणे, ऑफिसच्या कामाचा राग पत्नी-मुलावर काढणे असे प्रकार घडतात. टार्गेट पूर्ण करण्यासाठी ऑफिसची काम घरी आणून घरचं वातावरण दूषित होतं. ताणतणाव, निद्रानाश वाढून आधी मानसिक आणि नंतर रक्तदाब, मधूमेहसारखे आजार जन्म घेतात. खाजगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची फारशी काळजी घेत नाही. किंबहुना त्याशी त्यांचं काही घेणं-देणं नसतं. एकट्या देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा विचार केला तर लक्षात येईल मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांची संख्या अफाट आहे. या रोगाची पुढची पायरी असते हृदयविकार, अपस्मार, मूत्रपिंडाचे आजार, इत्यादी. या समस्येचं एकमेव कारण म्हणजे  
सततचा कार्यालयीन ताणतनाव.

सरकारी कर्मचाऱ्यांची समस्या यापेक्षा भिन्न नाही. कार्यालयीन वेळा जरी ठरलेल्या असल्या तरी ऑन-लाईन संस्कृतीच्या चक्रात तेही अडकले आहेत. पूर्वी संसदेत घेतलेल्या निर्णयाचा जीआर तालुका स्तरावर पोहचण्यासाठी बराच काळ जायचा. आज ऑन-लाईनमुले सरकारी कामालाही गती मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांनाही खाजगी कंपन्याप्रमाणे गतिमान राहणे कर्मप्राप्त झालं आहे. वरिष्ठ खफा होऊ नये म्हणून मर्जी राखण्यासाठी कार्यालयीन कामे घरी नेली जातात. त्यामुळं वैयक्तीक जीवनातं विरजण पडतं. कार्यालयीन काम आणि मुलांचं शिक्षण, अभ्यास, सामाजिक जबाबदाऱ्या याच संतुलन न करता आल्यामुळे कित्येकदा घरगुती वाद होतात. जीवनातला आनंद नाहीसा होऊन बऱ्याचदा संसार मोडतात. आजही दिवसभर कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांना घरी असताना त्यांना स्मार्टफोन चालू ठेवण्याच्या सूचना असतात. फोन बंद ठेवला तर वरिष्ठ नाराज होतील, अशी भिती असते. वैद्यकीय क्षेत्रात परिस्थिती यापेक्षा भीषण आहे. स्मार्टफोनमुळे डॉक्टराना स्वतःच खाजगी जीवन राहील नाही. इलाजकर्त्या डॉक्टरांनी विचारपूस करण्यासाठी मोबाईल कायम चालूच ठेवावा अशी रुग्णाची इच्छा असते. मग फोन करतांना रुग्णाचे नातेवाईक वेळेच भान ठेवत नाही. प्रसंगी वादविवाद होतात. थोडक्यात डॉक्टरानाही खाजगी जीवन असतं, याच रुग्णांना भान नसतं. रुग्णवाहिका, अग्निशामक दल सारख्या अत्यावश्यक व अपवादात्मक सेवा सोडल्या तर इतर सरकारी विभागात कार्यालयीन वेळेनंतर स्मार्टफोन वापरण्याची गरजच काय ? 

नवीन तंत्रज्ञानाचा निश्चित उपयोग करावा पण ते करत असताना आरोग्यसुद्धा तेव्हढेच किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचे याच भान ठेवणे आवश्यक आहे. या स्क्रीनऐजमध्ये कार्यालयामध्ये काम करताना काही नियमावली आखणे आवश्यक आहे. २४ तास ऑन-लाईन न रहाता दिवसातून काही मिनिटे इ-मेल मेसेजेस बघण्यासाठी दिले पाहिजे. यासाठी 20:20:20 हा फॉर्म्युला चांगला आहे. म्हणजे 20 मिनिट काम केल्यानंतर 20 सेकंद 20 फूट अंतरावर बघणे. त्यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होण्यास मदत होते. संगणक हाताळताना बसण्याची योग्य शास्त्रोक पद्दतीचा अवलंब करावा जेणेकरून मानेचे तसेच पाठीच्या मणक्याचे आजार उद्धभवणार नाहीत.

राईट टू डिस्कनेक्ट हा कायदा आमलात आल्यास विविध क्षेत्रात अविरत काम करणाऱ्या नोकर वर्गाना बरेच फायदे होणार आहेत. वेळेच्या मर्यादा आखून त्या वेळेतच कार्यालयीन काम कराव लागेल. कार्यालयीन वेळेनंतर वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना फोन, मेसेज किंवा ईमेल द्वारे आदेश देऊन त्रास देणार नाहीत. कार्यालयीन वेळेला मर्यादा येतील. कर्मचाऱ्यांच कार्यालयीन आणि खासगी जीवनात संतुलन येऊन ते आनंदी जीवन जगतील. सततचा ताणतणाव कमी होऊन कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य उत्तम राहील. उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य असलेल्या कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढून ते कंपन्यांची उत्पादकता वाढवतील. उत्तम वर्क कल्चर मूळे कंपनीच्या एकूण गुणवत्तेत वाढ होऊन त्याच्या मानाकंनातसुद्धा वाढ होईल. चांगल वर्क कल्चर असलेल्या कंपन्या उद्योग क्षेत्रातील चांगल्यात चांगला नोकरवर्ग आकर्षित करतात. 

नोकरवर्गाच्या आयोग्याचा विचार करता 'राईट टू डिस्कनेक्ट' कायदा अत्यावश्यक असला तरी देशातील उद्योगविश्वातून मात्र त्याविरुद्ध सूर निघत आहेत. काही उद्योजकांना विकसनशिल भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला युरोपसारख्या विकसित राष्ट्राचे नियम लागू करने संयुक्तिक होणार नाही असे वाटते.  तर दुसरीकडे उद्योजकांना हा कायदा लागू झाल्यास कामगारांची क्रयशक्ती कमी होईल, उत्पादकता घटून अर्थव्यवस्थेच्या रथाची गती मंदावेल अशी भिती वाटते.  भिन्न कार्यालयीन संस्कृती, विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशाला असे नियम नकोत असाही सूर निघत आहे. ठराविक कार्यालयीन वेळाचा नियम लागू झाल्यास डॉक्टर, अग्निशमनदल, अंब्युलन्स,  सुरक्षारक्षका सारख्या आपत्कालीन सेवा क्षेत्रावर याचा वाईट परिणाम होईल अशीही भिती व्यक्त होत आहे.

देशातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक व सामाजिक आरोग्याचा विचार करून हे विधेयक २८ ऑक्टोबर  २०१९ रोजी संसदेत मांडल्याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं आभार मानायलाच हवे. योग्य वेळ येता सर्वसंमतीने या विधेयकाला मंजुरी मिळून त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे.  हा कायदा अमलात आल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या नंतर स्वतःला डिस्कनेक्ट करता येणार आहे जेणेकरून त्यांना आपलं खाजगी जीवन आनंदात जगता येईल. कार्यालयीन काम व वरिष्ठा करून होणारी पिळवणूक कमी होऊन ते आपले वैयक्तिक उद्दिष्ट साधू शकतील. कारण निरोगी कामगारच देशाची संपत्ती आहे. आणि देशाची जीडीपी म्हणजे आर्थिक प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे.

    - प्रेम जैस्वाल 9822108775
(लेखक एस्पी इन्फोटेक या छ. संभाजीनगर येथील शैक्षणिक संस्थेचे संचालक व करियर सल्लागार आहेत)
    






Tuesday, 10 September 2024

हिंदी-उर्दू: दो बहनोकी बात








अब तो यह रिवाज सा बन गया है के हिन्दुस्तान के पार्लमेन्ट में जब भी कोई अर्थ मंत्री, फिर वह किसी भी पार्टी के क्यों न हो आने वाले साल का बजेट पेश करते समय एक शेर तो जरूर सुनाते है। इतना ही नही लोगों का दिल जीतने के कई सभा-सम्मेलन में अपने भाषण में नेता या वक्ता एक शेर जरूर सुनाते है और लोगों का दिल जीत लेते है। और ये दिल जितने वाले शेर अक्सर उर्दू भाषा में  हि लिखे होते है। एक सर्वे के मुताबिक हिन्दुस्तान के पार्लमेंट में आज तक जितने भी शेर सुनाए गये वो तकरीबन ९०% उर्दू में थे।


जी हां, हम बात हिंदी-उर्दू भाषा की कर रहे है। जो दो सग्गी बहने है। हम सब हिन्दू-मुस्लीममें एक बडी गलत फ़हमी ये है के उर्दू सिर्फ मुस्लीम या पाकिस्तान की भाषा है। हालांकि यह सरासर गलत है, झूठ है। इस में लोंगों की कोई गलती नही क्यों कि हिन्दू लोग उर्दू को मुश्किल और मुस्लिम की भाषा समझकर बोलने से परहेज रखते आये है, और मुस्लिम उस को पहले से अपनाते आये है, बस इतना फर्क। 'रिलिजियस पॉलिटिक्स' ने इस भाषाका बटवारा कर दिया हैं ।


हालांकि कोई भी भाषा रिजनल होती है रिलिजनल नही । जैसे पंजाब की पंजाबी, तमिलनाडु की तमिल, गुजरातकी गुजराथी, कर्नाटक की कन्नडी। कहने का मतलब जो मुस्लिम पंजाब में रहते है वो पंजाबी बोलते है। जो गुजरात में रहते है वो गुजराती बोलते है। जो तमिलनाडु में रहते है वो तमिल बोलते है। इस हिसाब से उर्दू को मुस्लिम की भाषा कहना बहोत गलत होगा। वैसे शुरु से उर्दू नॉन-रिलीजस भाषा रही है।


आज लोग भले ही उर्दू भाषा बोलने मे परहेज करते होंगे लेकिन यही उर्दू के शेर, नज्म या शायरी आप जब गुलजार के गीतों में, अमिताभ के डायलोग मे या फिर लता मंगेशकर के गीतों में सुनते तो बड़ा मजा आता है। आप यह समझ ले कि हिंदी-उर्दू सग्गी बहने-बहने है। हिंदी मां है तो उर्दू मौसी। हिंदी नग्मे तभी अच्छे लगते है जब उन्हें उर्दू की झालर लगाई जाती है। जो भी बॉलीवुड की फिल्में हिट हुयी उसका बड़ा श्रेय उर्दू को जाता है। हिंदी फिल्में नयी हो या पुरानी उसके संवाद और गीत उर्दू शब्द के बगैर आप सोच भी नही सकते। इश्क, मोहब्बत, सनम,मेहबूब, जुल्फे, गेसू, दास्ताँ, जमीन, हुजूर,झील,कयामत,मजबूर,सर्द, आरजू, फिझा, जिस्म और ऐसे कई हजार शब्द होंगे जो अक्सर उर्दू से लिये गये। हिंदी फिल्मों के कलाकार फिर वो दिलीप कुमार, प्राण, राजेश खन्ना, राजकपूर, बलराज साहनी, परीक्षित साहनी, देवानन्द,अमिताभ हो या मीना कुमारी, वहीदा रहमान, हेमा मालिनी, नूतन जैसी अभिनेत्रीयाँ इन सभी को कामयाब और मशहूर बनाने में उर्दू का बड़ा हाथ है। इतना ही नही फिल्में हिट होने में गीतों का बड़ा योगदान होता है इसलिये उर्दू के सही उच्चारन के लिए महान गायिका लता दीदी ने भी उर्दू सिखी थी। आज हम सिर्फ हिंदी नही बल्कि मराठी में भी उर्दू के कई शब्दों का इस्तेमाल करते है। 


वैसे उर्दू की पैदास हिन्दुस्तान मे ही हुयी है। कहा जाता है के जब मुगलो का आक्रमण हुवा उस वक्त फ़ारसी का ज्यादा चलन था। जब मुगल शासक आये तब उनके साथ साथ फ़ारसी, अरेबिक और तुर्की यह सब भाषा भारत मे आयी। इन भाषाओं का जब दिल्ली के ब्रज या खड़ी बोली के साथ मिश्रण हुवा तो नयी भाषा का जन्म हुवा। दिल्ली मे जब फारशी शासक के सेनाने शेकडो वर्ष तक डेरा लगाया था तब कुछ सैनिको की भाषा पारसी,कुछ अरेबिक और कुछ तुर्की थी। फिर उनकी भाषा को संबंध दिल्ली के खड़ी बोलि बोलने वाले लोगों से हुवा। आपस के इस बोलि भाषा को 'ओरडु'(सैनिक की भाषा) ऎसा नाम दिया गया l १७८० से पहले उर्दू को रेक्ता, रेक्ती, हिंदवी कहा जाता था और बाद में 'उर्दू' ऐसा नामकरण हुवा। १८ वे सदी तक उर्दू और हिंदीमे बिल्कुल भी फर्क नही था। हालाँकि उर्दू यह शब्द तुर्की से लिया गया। कई किताबें पारसी,तुर्की और अरेबिक मे लिखी गयी। चूँकि उर्दू बादमें बोलि भाषा बन गयी वह तेजी से आगे बढि, बहते गयी और आगे बढी और बाकी भाषाएँ पीछे रह गयी। जब आप कोई भाषामें सिर्फ लिखते हो तो वह 'स्टैटिक' बनती है या थमसी जाती है। लेकिन वही भाषा जब बोली भाषा बनती है तो वह बहाव के साथ 'डायनामिक' बन जाती है। उर्दू के साथ यही हुवा, वह जोरसे बहती चली गयी। बाद में महान कवि आमिर खुसरों ने उसे नये मुकामपर पहुंचाया। उर्दू मे कई शब्द दिल्ली के हिंदी खड़ी बोलीसे लिए गये। दोनों भाषा का व्याकरन एक जैसा है। हिंदी और उर्दू एक दुसरे के इतने करीब है के जब आप हिंदी बोलते हो हो उसमें कई शब्द उर्दू के होते है और आप जब उर्दू बात करते हो तो पच्चास प्रतिशत सेभी ज्यादा शब्द हिंदी होते है। इसलिये हिंदी फिल्में नयी हो या पुराणी उसके संवाद और गीत उर्दूके बगैर अधूरे है। आज भारत के ५ स्टेट में उर्दू को राजभाषा का दर्जा है जैसे हैदराबाद, यूपी, बिहार, झारखंड और जम्मू-कश्मीर। आज भारतके कुछ दक्षिण इलाखों में बहोत ही शुद्ध उर्दू बोली जाती है। चूँकि दक्षिणमे तेलगु, कनडा, मलयालम और तमिल जैसे भाषा का ज्यादा प्रभाव है, उर्दू मे कई लोकल शब्द शामिल हुए है।


यह कहना भी सरासर गलत होगा के उर्दू पाकिस्तानी भाषा है। क्योंकि वहाँ उर्दू कम और बाकि भाषाऐ जैसे के बलूची, कश्मीरी, पाशतु, अरबी इ ज्यादा बोली जाती है।उर्दू जबान को १० करोड़ पूर्व पाकिस्तानी याने आज के बांग्लादेश ने भी नही अपनाया फिर वो पाकिस्तानी भाषा कैसे हो सकती है? पाकिस्तान से जादा हिन्दुस्तान मे उर्दू बोली जाती है। हिन्दुस्तानमे ५ करोड़ तो पाकिस्तान में सिर्फ 1.25 करोड़ जनता उर्दू बोलती है। 'मोहाजिर' याने बटवारे के वक्त जीन मुस्लिमों को यूपी, पंजाब,हरियाणा, कश्मीर और दिल्ली जैसे ईलाखो से पाकिस्तान जाना पड़ा सिर्फ वही मुस्लिम उर्दू भाषा का इस्तेमाल करते है।। 'हम अलग तो हमारी भाषा भी कुछ अलग होना चाहिये' इसलिये पाकिस्तान ने भले ही उर्दू को राष्ट्रीय भाषा का दर्जा दिया हो लेकिन वो सरासर गलत है क्योंकि वहाँ बोलि भाषा मे उर्दू दूसरे स्थान पर है।


दिलचस्व बात यह है कि १८वे सदि तक सिर्फ और सिर्फ अच्छे जानकार हि इन भाषाको पढ़ और समझ सकते थे। १९वे सदि मे ये दोनों भाषाएँ बहोत विकसित हुई। हिंदी को आगे बढाने मे मुंशी प्रेमचंद, संत कालिदास्, संत तुलसीदास, संत सूरदास और सन्त कबीर जैसे महान संत और साहित्य लेखक का बहोत बड़ा योगदान रहा। आज संपूर्णसिंग कालरा (गुलजार), रघुपति सहाय (फ़िराक़ गोरखबादी), रामप्रसाद बिस्मिल और महाराजा चंदूलाल जैसे गैर-मुस्लीम लेखक या कवि भी है जिन का उर्दूको आगे बढानेमे बढ़ा सहयोग रहा है।


भारत के पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग का जन्म अब के पाकिस्तान में हुवा था। बहोत कम लोग यह जानते है के उनकी शिक्षा उर्दू में हुई। जब वो प्रधान मंत्री बने तब ६० बरस के  रिवाज के मुताबिक उन्हें हिंदी मे भाषण देना जरूरी था। उन्होंने कुल ४८ मिनट भाषण दिया लेकिन बहोत कम लोग यह जानते है के उस भाषण की स्क्रिप्ट उर्दू भाषा में लिखी गयी थी ! क्योंकि डॉ. मनमोहन सिंग को उर्दू पढ़ना ज्यादा आसान लगता है।उर्दू का बहोत सा साहित्य पंजाब से आया है। उर्दू के कई शायर-लेखक पंजाब से आये है। 


सिर्फ सियासत के लिए भाषा को बाटा जाता है l इसलिये जब कोई अगली बार आप से उर्दू में कुछ कहे या कुछ लिखे तो गलतफहमी में ना रहे, क्यों कि वह भी हमारी याने हिन्दुस्तानि हि भाषा हैं, सिर्फ मुस्लिम या पाकिस्तान की बिलकुल भी नही।

तभी तो 
उर्दू के मशहूर शायर मुनावर राणा ने एक शेर में सही कहा, 

लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है,
मैं उर्दूमें गझल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है।




© प्रेम जैस्वाल
premshjaiswal@gmail.com
( आप मेरा आर्टिकल नाम के साथ शेअर कर सकते है।  )

Wednesday, 4 September 2024

शिक्षक दिना निमित्त..

कापलेला रस्ता जर ओबड-खाबड असेल तर त्या रस्त्यावरील चढ उतार, दगडधोंडी आणि खाच खळगे सर्वच  कायम स्मरणात राहतात. माझ्या बाबतीत थोडं तसंच होतं. विद्यार्थी दशेतील बऱ्या-वाईट आठवणी माझ्या स्मरणात आहेत. भूतकाळात रमायचं कशाला, भविष्याची चिंता कशाला, फक्त वर्तमानात जगा, आनंदी रहा. असं प्रवचन देणारे पुष्कळ मिळतील. पण मी म्हणतो, भूतकाळाच्या पोटातूनचं तर वर्तमान जन्म घेतो ना, मग त्यास विसरून कसं चालेल? आज ५ सप्टेंबर, 'शिक्षक दिन', मला घडवणाऱ्या सर्व आदरणीय शिक्षकांना वंदन करून काही शिक्षकांविषयींच्या आठवणी मी येथे मांडतो.

आदरणीय श्री पडोले सर म्हणजे गणित! असं एक समीकरणचं होतं. इयत्ता आठवी नववी धकून जायचं पण दहावी मॅट्रिक उत्तीर्ण होण्याच्या मार्गावर गणित आणि इंग्रजी हे दोन खलनायक आडवे यायचे. ज्यांचे पस्तीस मिळविण्याचे वांधे होते असे विद्यार्थी हमखास गणित आणि इंग्रजीची ट्युशन लावायचे.  पण जे 'हुशार', त्यांचं वेगळं दुखणं, असे महाभाग जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी ट्युशन लावायचेच.

मला आठवतं. भल्या सकाळी डोळे चोळत आमची सायकल 'फटलक फटलक' करत पडोले सरांच्याट्युशन दिशेने निघायची. कधी रामलीला मैदान मार्गे तर क्वचित भारतीय विद्यामंदिर मार्गे सायकलच्या घंन्टीचा घनघानात करत आम्ही सुसाट निघायचो. बऱ्याचदा माझ्या सोबत दिलीप गावडे आणि त्याच्या पाठीमागे बसलेला पण पायाला जरा त्रास असलेला 'दत्तू' देवदत्त देशपांडे असायचा. (आज देशपांडे मोठा गायक व त्याचा सारथी गावडे असिस्टंट कमिशनर!)  प्रभात काळी स्नान करून हातात पंचीपात्र घेऊन पूजा अभिषेकसाठी निघालेली जैन मंडळी दिसायची. त्याचं वेळेस मंदिराच्या भोंग्यातून कवी प्रदीप, श्रीओम शरण किंवा अनुप जलोटाची भक्तीगीत कानी पडायची. कधी 'दुसरो का दुखडा दूर करनेवाले तेरे दुःख दूर करेंगे राम....' तर कधी 'बंदे किस पर करे गुमान तू है दो दिन का मेहमान...' तर कधी 'मैया मोरी मैं नही माखन खायो... अशी भक्तीगीत कानी पडायची. मधूनच गायक अनुप जलोटा 'हिरे-मोती S S SS..... असा लांबलचक मोठा आलाप घ्यायचे. मग त्या लांब आलापात आपन किती मीटर सायकल चालवली याचं मी गणितं लावायचो! आता अशा गोष्टीच हसू येतं, असो.

आमची दुसरी बॅच असायची. प्रश्न-उतराचा ताप नको म्हणून शक्यतो मी मध्यभागी किंवा मागे बसायचो. एक बरं होतं, चालू ट्युशनमध्ये पडोले सर क्वचितचं प्रश्न विचारायचे त्यामुळे ट्युशनबद्दल भिती नसायची आणि सर्वांची उपस्थिती १००% असायची. आमच्या चेहऱ्यावर सहामायी किंवा सराव परीक्षेची भिती त्यांना स्पष्ट जाणवायची. मग ते मधूनच हसत, 'काय जैस्वाल परीक्षा जवळ आली ना? पोटात कसकूनं होतं, नाही का?' आता कळतं कि ते 'कोर्टिसॉल हार्मोन्स' होतं ज्याच्यामूळे आमच्या भितीत वाढ व्हायची. ग्रे बॅगी ट्राऊझर, हाफ असतीनचा पांढरा शर्ट आणि हातात नायलॉनची पिशवी घेतलेले धीपाड देहयष्टी असलेले पडोळे सर जेंव्हा शाळेत यायचे तेंव्हा त्यांची चाल एखादा शांत गजराज झूलत यावा अशी असायची. 

काल हिंगोली येथे संपन्न झालेल्या स्नेहमिलनात कविता हि आदरणीय खिल्लारे सरांची कन्या आहे हे मला माहित पडलं. एका क्षणात मला सर आठवले. मला राहून राहून खिल्लारे सरांची आठवण येत होती. खुपचं दयाळू आणि शांत स्वभावाचे सर आमच्या 'ड' तुकडीचे वर्गशिक्षक होते. ऐन परीक्षेच्या काळात सायकलवरून पडून माझ्या उजव्या हाताचं हाड मोडलं तेंव्हा हाडापेक्षा मला परीक्षेच काय होईल याची चिंता होती. कंदीच्या दवाखान्यातुन पायन्डल रिक्षेत बसून मी सरळ सरांच्या घरी गेलो. अगदी शांत शब्दात सरांनी 'परीक्षेची चिंता करू नकोस, लवकर बरा हो' असा धीर दिला. सहामायीच्या मार्कांच्या आधारे मला उत्तीर्ण करण्याचं आश्वासन दिलं. परीक्षा न देता मला त्यांनी फर्स्ट क्लास मध्ये पास केलं!

मला विशेष आठवण येते ती कुरील सरांची! ते आम्हाला हिंदी भाषा विषय शिकवायचे. स्नेहमिलनात माहित पडलं कि ज्यांची मी कुरेशी म्हणून आठवण काढत होतो ते आदरणीय कुरील सर होते. बऱ्याच जणांना हे माहित नसेल कि सर एक हि रुपया न घेता कृष्णा टॉकीजच्या तलाब कट्ट्याजवळ त्यांच्या घरी हिंदी विषयाची ट्युशन घायचे. त्या काळी शिक्षकाने भाषा विषयात मोकळ्या हाताने गुण देणे निषीध्द होतं, थोडक्यात पापचं म्हणा ना! संपूर्ण मार्कांसाठी हवे असणारे लांब लचक उत्तर लिहिणे विद्यार्थ्यांना जमायचं नाही. कुरील सरांनी आम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण कसं लिहावं हे शिकवलं. माझ्यात ते जरा जास्तच भिनलं. आज जेंव्हा कुणी माझ्या हिंदी लिखाणाची तारीफ करतात, मला आदरणीय कुरील सर आठवतात.

कधी एखादं चित्र किंवा मूर्ती तयार करतांना चित्रकलेच्या जाधव सरांचा गुरुमंत्र मला आठवतो. 'चित्र रेखाटतांना प्रथम डाव्याबाजूने सुरुवात करावी मग उजवी बाजू काढावी.' दोन डोंगर, त्यामधून उगवता कि मावळता सूर्य, समोर एक झोपडी, त्या समोर वाहणारी नदी, आणि त्या नदीत विहार करणारा पण आमच्या सोईनुसार आकार असलेला बदक! हिच काय ती आमची चित्रकला होती. याच्या पुढे सुद्धा काही चित्रकला असते हे आम्हाला माहित नव्हतं. अधून मधून आमचा चित्रकलेचा तास असायचा. थोडी का होईना जाधव सरांनी आमच्या जीवनात चित्रकला उतरवली. त्याचा आजही फायदा होता. 

हातात कनेरीच बेत घेऊन आम्हाला शिस्त लावणारे आदरणीय मोरे सर, अगदी  शांत आणि संयमी स्वभावाचे  तळमळीने शिकविणारे आदरणीय कुलकर्णी सर, एक तासा आधी पूर्ण झोप घेऊन आल्यासारखा, शांत पण गंभीर चेहरा असलेले आदरणीय धांडे सर मला अजूनही आठवता. एनसीसीचे कडक शिस्तीतले पण किंचित अस्पष्ट बोलणारे आदरणीय जाधव सरांना कोण विसरू शकेल? पांढरा शुभ्र ढगळ-वगळ नेहरू शर्ट-पायजमा घातलेले कडक आदरणीय कालिदासरावजी देशपांडे सरांचं गणित कुणीही नं विसरण्यासारखं आहे.

सात समंद की मसि करौं, लेखनि सब बनराइ।
धरती सब कागद करौं, तऊ गुरु गुण लिख्या न जाइ॥

किती किती लिहावं. कबीर म्हणतात तसं,'सात समुद्राची शाई, सर्व वनातील लाकडाची लेखणी करून गुरु गुन लिहिताना अख्खी धरती कमी पडेल असा गुरूंचा महिमा काही वाक्यात लिहिणे शक्य नाही.

मित्रांनो, जीवनात वावरतांना फक्त गुरूच आपल्याला शिकवतात असं मुळीच नाही.

जो जो जयाचा घेतला गुण ।
तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण ।
जग संपूर्ण गुरु दिसेll

ऐकून सर्वच गोष्टीचे आपल्यावर कळत नं कळत संस्कार होत असतात. त्यात कुटुंबं, मित्र परिवार, वर्गमित्र, नातेसंबंधित लोकं, न शिकवणारा कर्मचारी वर्ग, शालेय- महाविद्यालयीन मित्र, पुस्तकं,वास्तू, तेथील झाडं इ सर्वच गोष्टी आपल्याला काही नं काही शिकवत असतात. थोडक्यात ते सुद्धा आपले गुरूच कि! आज मी त्या सर्व महान गुरूंचे सुद्धा आभार मानतो ज्यांचे आमच्यावर संस्कार झालेत. जे थोडे वाईट होते त्यांनीसुद्धा आम्हाला 'वाईट काय असते' याची शिकवण दिली, तेंव्हा ते सुद्धा गुरूच!

पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

©प्रेम जैस्वाल पेडगावकर
9822108775 ह मु औरंगाबाद.




शिक्षक दिना निमित्त..

            
               शिक्षक दिनानिमित्त छोटासा लेख 
                

जीवनमूल्यांची अदभूत शिकवण ❤🌻🦋

बागेच्या बाकडावर निवांत बसलेल्या वृद्धास अचानक एक तरुण विचारतो, 
“आपण मला ओळखल का?”
वृद्ध व्यक्ती, "नाही"
मग तो तरुण आदराने सांगतो कि तो त्यांचा विद्यार्थी आहे. त्यावर  वृद्ध शिक्षक विचारतात,
"काय करत आहात सध्या?”
विध्यार्थी म्हणतो, “सर, मी सुद्धा आता शिक्षक झालो ”.
“अरे व्वा, तुम्ही सुद्धा शेवटी शिक्षकचं, माझ्या सारखे!” 
त्यावर विध्यार्थी म्हणतो, “खरं तर सर शिक्षक व्हायची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळाली ”.
"कसं काय?" सरांची उत्सुकता आता शिगेला पोहचते.
त्यावर तो तरुण त्यांना शाळेय जीवनात घडलेल्या एका प्रसंगाची आठवण करुन देतो.

“सर, तुम्हाला आठवत असेल,  शाळेत असतांना माझ्या एका मित्राची घड्याळ चोरीला गेली होती. त्याची तक्रार त्याने तुमच्याकडे केली.  मग तुम्ही वर्गात येऊन सर्वांना ताकीद दिली कि ज्यांनीही त्याची घड्याळ चोरली असेल त्यांनी ती लवकरात लवकर परत करावी.  कुणीच ती घड्याळ परत केली नाही.  तुम्ही लगेच खोलीचा दरवाजा बंद करुन सर्वांना गोल रिंगणात उभं केलं. सर्वांनी डोळे मिटा असं सांगितलं. जो पर्यंत घड्याळ सापडत नाही तोपर्यंत कुणीही डोळे उघडायचे नाहीत असं सांगितलं. एक एक करुन तुम्ही सर्वांचे खिसे तपासले. शेवटी 'घड्याळ सापडली आहे' असं सांगून सर्वांना डोळे उघडण्यासाठी सांगितलं. 

अहो सर, ती घड्याळ माझ्याच तर खिशात सापडली होती !  ती घड्याळ कुणाच्या खिशात सापडली याची वाच्यता तुम्ही वर्गात केलीच नाही. त्या दिवशी माझी मान शरमेने झुकली होती. माझी मलाच खूप लाज वाटत होती. पण सर, भर वर्गात तुम्ही माझा अपमान करण्याचं टाळलं, माझी इज्जत राखली.  या घटनेबद्दल तुम्ही मला एकांतात बोलवून रागावला असता.  पण खरं सांगू, त्या घटनेनी मला खूप काही शिकविलं.  त्याच दिवशी मी ठरवलं आयुष्यात कधीही मी चोरी करणार नाही. त्या घटनेबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे सर.
तुम्हांला ती घटना आठवत असेल ना सर?" 

त्यावर शिक्षक म्हणतात, "होय, हरवलेल्या घड्याळीची ती घटना मला आता नक्की आठवते. सर्वांचे खिसे मी तपासले होते हे सुद्धा मला आठवतं. पण ती घड्याळ कुणाच्या खिशात सापडली ते मला नाही आठवत. कारण विद्यार्थ्यांचे खिसे तपासतांना माझे डोळेसुद्धा बंदच होते!".

जीवनमूल्यांच शिक्षण हे आरडा ओरड, दाब दपट मारझोड किंवा भर वर्गात विद्यार्थ्यांना अपमानीत करूनच द्यायचं असतं असं मुळीच नाही.  शिक्षकांनी त्यासाठी योग्य मार्गाची निवड करायची असते. आणि हे जर शिक्षकांना जमतं नसेल तर त्यांना शिक्षक तरी कसं म्हणायचं?

                  HAPPY TEACHERS DAY 

(लेखकांच नाव माहित नाही. मूळ लेख इंग्रजी भाषेत होता, वाचकांसाठी मी फक्त तो मराठी भाषेत अनुवादित केला आहे... प्रेम जैस्वाल पेडगावकर  ९८२२१०८७७५)


Monday, 2 September 2024

आयआयटी/एनआयटीच मृगजळ: एक वास्तवता




आयआयटी/एनआयटीच मृगजळ: एक वास्तवता 



हल्ली समाजमाध्यमामधे अनेक विषयावर चर्चा झडत असतात. अशाच एका शैक्षणिक चर्चेत एक सुशिक्षित जिज्ञासु महिला आयआयटी बद्दल प्रश्न विचारत होती. आयआयटी क्लासेसची फि किती? परीक्षा किती अवघड? कसा अभ्यास करावा? किती तास अभ्यास करावा? कुठे कोचिंग लावावे वगैरे. एव्हड़ी उत्सुकता आणि प्रश्नानन्तर प्रश्न विचारून भंडावून सोडलेल्या महिलेस मग उतर देणाऱ्या महाशयांनीही एक प्रश्न विचारला कि 'मैडम, आपका बच्चा कौनसी क्लासमें पढ़ रहा है?' तिकडून मिळालेले उत्तर ऐकुन ते थक्कच झाले. त्या मैडमच बाळ दुसऱ्या इयत्तेत शिकत होतं! मग या चर्चेत एक मानसोपचारतज्ञ डॉक्टरही शामिल होते त्यांनी लगेच एक मोठी कॉमेंट टाकली - 'माफ़ करा मैडम. तुम्ही आठ वर्षानी जगाच्या मागे आहात. आयआयटीच कोचिंग खुप आधीच सुरु होत असतं, त्यासाठी लहानपणीच वेगवेगळी ट्रेनिंग-कोचिंग दयावी लागते आणि त्याचेही क्लासेस शहरात उपलब्ध आहेत. आता तुमच्या बाळाच काही खरं नाही, झाला तो उशीर ठिक आता अजुन उशीर करु नका. आणि जमलंच तर माझ्या क्लिनिकला अपॉइंटमेंट घेवून या, आपण या विषयावर सविस्तर चर्चा करु.',  अर्थात ते डॉक्टर महाशय खुप चिडुन उपहासत्मकेने उत्तर देत होते. बिचारं हसर-रडनारं बाळ ज्याला या जगात येवून काही दिवसंच झालेले, अजुन आई-बाबाचे पुरेसे संस्कार मिळाले नाही, घरातील प्रत्येकांशी पुरेशी ओळख झाली नाही, शारीरिक बौद्धिक वाढ झालेली नसतानाही आई आतापासूनच त्याच्या आयआयटीचे स्वप्न रंगवत होती.   तो भविष्यात जगाच्या स्पर्धेत मागे राहू नये  हया भितिपोटी तिची हि धडपड.  हि वस्तुस्थिति आहे कि आज प्रत्येक पालकाला आपला मुलगा आयआयटीच व्हावा अशी इच्छा असते.  शिक्षण , नोकरी आणि उद्योग धन्द्यामधे एकापेक्षाएक सरस हजारो चांगले पर्याय उपलब्ध असताना सर्व पालकाना आपला मुलगा आयआयटीच व्हावा,असे का वाटावे? असं काय दडलयं या आयआयटी/एनआयटीमध्ये? खरोखरच आयआयटी म्हणजे करोड़च पैकेज का? गैरसमझ दूर होवून पालक व विद्यार्थ्याची मानसिकता बदलावी यासाठी हा लेख.

एकशे चाळीस कोटीच्या घरात जाणाऱ्या लोकसंख्येच्या आपल्या भारत देशात सर्व राज्यात जुने-नवीन मिळून २३ आयआयटी संस्था आहेत.  त्यात उपलब्ध जागा आजघडिला मात्र १६०५३ आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलींचा टक्का वाढावा म्हणून त्या पैकी २०% जागा मुलीसाठी राखीव असतील असा केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे. राज्यघटनेप्रमाणे एकंदरित जागेपैकी ५०%  जागा नियमाप्रमाणे इतर मागासवर्गीय जातिसाठी आरक्षित आहेत. त्यातही आयआयटीमध्ये काही शाखा अशा आहेत की ज्या विद्यार्थ्याना आवडत नाहीत.  १६ जुने विकसित,अनुभवी फैकल्टी असलेल्या आयआयटी संस्था सोडल्या तर इतर ७ संस्था पाहिजे तेव्हड़या विकसित झालेल्या नाहीत. आयआयटीच्या नियमानुसार त्यांच्याकड़े सर्व सुविधा, स्वतःची इमारत, प्रयोगशाळा, हॉस्टेल, लाइब्ररी विकसित झालेले नाहीत. स्वतःच्या इमारती तयार नाहीत त्यामुळे त्यांना इतर कॉलेजच्या भाडोत्री वास्तुमध्ये शिकवावे लागते. काही आयआयटी कॉलेज इतक्या रिमोट ठिकाणी आहेत की तेथे अनुभवी, उच्चशिक्षित प्राध्यापक रुजू होत नाही. काही चांगले आयआयटी सोडले तर इतर ठिकाणी उच्च शिक्षित प्राध्यापकाचा वानवा आहे.

दर वर्षी  बारावी विज्ञानशाखेचे साधारण 9 लाख विद्यार्थी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा देतात. यामधील गुणवंत विद्यार्थ्याला एनआयटी, आयआयआयटी  किंवा आयआयएसइआर सारख्या संस्थेत प्रवेश मिळतो.  9 लाखापैकी साधारण साधारण अडीच लाख गुणवंत विद्यार्थी पुढे जेईई एडवांस ही आयआयटी प्रवेशसाठी पात्र परीक्षा देतात. शेवटी त्यापैकी १६०५३ विद्यार्थी आयआयटीत प्रवेश घेतात.  जेईई  देशातील एक कठिन परीक्षा म्हणून गणली जाते. या परिक्षेचे प्रश्न खुप कठिन असतात  व ते रिपीटही होत नाहीत. 9 लाख मधून १०९९८ ची निवड यावरूनच स्पर्धेचा अंदाज येवू शकतो. अर्थातच वाढत्या स्पर्धेमुळे आणि उपलब्ध कमी जागेमुळे ही स्पर्धा जीवघेनी ठरते. प्रत्येक वर्षी या परिक्षेच्या अभ्यासाच्या तणावामुळे होत असलेल्या आत्महत्या आपण ऐकत असतो.  राजस्थानातील कोटासारख्या ३०० कोचिंग सेंटरची बाजारपेठ असलेल्या 'कोटा फॅक्टरी' मधे मागील काही वर्षात ७६ आत्महत्या झाल्या. त्या घडू नये म्हणून राजस्थान सरकारने एक समिति नेमून त्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला. तसेच विद्यार्थी वसतिगृहामध्ये समुपदेशकाची नेमणूक केली आहे.

आयआयटी ची सुरुवात :

ब्रिटिश राजवटीमधे भारतात उच्चतंत्रज्ञानाचे असे कोणतेही कॉलेज नव्हते. स्वातंत्र्योतर काळात विज्ञान-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात देशाची प्रगति व्हावी, देश स्वावलंबी व्हावा म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूनी दुसऱ्यां महायुद्धनन्तर एक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सर जोगेंद्रसिंग यांनी स्थापन केलेल्या या कमिटीचे श्री नलिनी सरकार हे अध्यक्ष होते. भारतातील विविध भागात उच्च तांत्रिक शिक्षण देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्याची जबाबदारी या कमिटीची होती.  या कमिटिने निष्कर्ष काढला कि खरोखरच देशाची उन्नति व्हायची असेल तर फक्त पैसा आणि भांडवल उपयोगी नसून देशात औद्योगिक उच्चतंत्रज्ञान देणारी संस्था आवश्यक आहे. ब्रिटीश राजवटीमधे सर्व छोटेमोठे उद्योग-कारखाने बंगाल प्रांतात एकवटलेले होते त्यांमुळे कमिटीने पहिले तंत्रज्ञान महाविद्यालय बंगालमध्येच सुरु करण्याचे सूचविले. त्यानुसार हिजली डिटेंशन कैंप खड़गपुर येथे पहिल्या आयआयटी संस्थेची सुरुवात मे १९५० मधे झाली. १५ सप्टेंबर १९५६ पार्लमेंटमधे सर्व सम्मतिने आयआयटीचा कायदा पास केला आणि त्याला 'इंस्टिट्यूट ऑफ़ नॅशनल इम्पोर्टेंस' असा दर्जा देण्यात आला. देशाच्या सर्वच भागाचा संतुलित विकास व्हावा म्हणून मग इतर चार संस्था एक एक वर्षाच्या अंतराने मुम्बई, मद्रास, कानपूर आणि दिल्ली येथे सुरु करण्यात आल्या. पुढे राजीव गांधी पन्तप्रधान असताना आसाममधे विद्यार्थीचा वाढता उद्रेक बघून एक आयआयटी संस्था १९९४ मध्ये गुवाहाटी येथे सुरु करण्यात आले. सन २००१ मधे रुड़की येथील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला. पुढे अटलबिहारी वाजपेयी पन्तप्रधान असताना इतर राज्यानाही एकएक आयआयटी देण्याचे ठरले. त्यांनंतर आयएसएम धनबाद,  बनारस हिंदू येथील उच्चशिक्षणाच्या कॉलेजला आयआयटी दर्जा देण्यात आला. आजघडिला अख्या देशात नवे-जुने मिळून २३ आयआयटी  संस्था आहेत. तसेच प्रत्येक राज्यात एक असे ३१ एनआयटी (राष्ट्रिय प्राद्योगिक संस्था) आणि २३ आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, किंवा ट्रिपल आयटी) आहेत. या सर्व संस्थाना शासनाने 'इंस्टिट्यूट ऑफ़ नेशनल इम्पोर्टन्स' असा दर्जा दिला आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी ह्या देशातील जागतिक दर्जेच्या संस्था म्हणून गणल्या जात असल्या तरी सर्वच संस्था दर्जा टिकवून आहेतच असे नाही. आधीचे १६ आयआयटी, पहिले १० एनआयटी आणि ५ ट्रिपल आयटी सोडले तर इतर संस्था दर्जेच्या मानांकनमध्ये मागे आहेत. जेईई मेन, जेईई एडवांस अशा कठिन परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यानाच या संस्थेमधे प्रवेश दिला जातो.

आयआयटी महत्व कसे वाढले ?

सन १९९१ पूर्वी आयआयटीबद्दल देशात तेव्हड़ी जागरूकता नव्हती. काही सुशिक्षित शहरी समाज सोडला तर इतर लोकांना या परिक्षेची माहितीसुद्धा नव्हती. प्रचार व प्रसार नसल्यामुळे खुप कमी विद्यार्थी जेईई या परिक्षेस बसत होते. १९९१ मधे सरकारने 'लायसन्सराज' बन्द करून 'मुक्त व्यापार' धोरण अवलंबिले त्यामुळे परदेशी कंपन्यासाठी देशाचे द्वार खुले झाले.  कंप्यूटरक्रांतिमुळे आयटी क्षेत्रात प्रचंड बदल होत गेले. कॉम्प्यूटर आणि माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होवून त्यात सॉफ्टवेयर अभियंत्याची प्रचंड मागणी वाढली.  तसेच बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यात भारतीय बुद्धिजीवी अभियंत्याना नोकऱ्या मिळू लागल्या. आयआयटी संस्थेमध्ये हुशार विद्यार्थ्याना करोड़ो रूपयाचे पैकेज देण्यात येत असल्याच्या बातम्या वृत्तमानपत्र तसेच टीव्हीवर झळकु लागल्या. जिथे पारंपरिक पदवी अभियंत्याना २० वर्षापेक्षा जास्त अनुभव असुनही वार्षिक १० लाखापेक्षा जास्त पगार मिळत नव्हता तिथे २२ वर्षाचे नुकतेच मिसरुडे फ़ुटलेली 'सॉफ्टवेयर इंजीनियर' मुलं मोठ मोठ्या पैकेजवर आयटी कंपनीत लागत होती. आयटी क्षेत्रात करोड़ोच पैकेज मिळवण्यासाठी तल्लख बुद्धिमत्तेशिवाय इतर संसाधनाची गरज नसते. इतर क्षेत्राप्रमाणे तिथे २५-३० वर्षाचा अनुभव लागत नाही. त्यामुळे कमीतकमी वर्षात जास्तीत जास्त पैकेज मिळवण्याचा हमखास मार्ग म्हणजे 'आयटी सॉफ्टवेयर इंजीनियर' हे समीकरण बनले. वृतमानपत्रात अशा बातम्या पहिल्यापानावर झळकु लागल्या आणि घरोघरी आयआयटीची चर्चा होवू लागली. आज समाजात  पारंपरिक अतान्त्रिक शिक्षणापेक्षा तांत्रिक शिक्षणाला जास्त महत्व आहे. अशात जेंव्हा सर्व विद्यार्थ्याचा लोंढा अभियांत्रिकीकड़े जात असेल तर आयआयटी/एनआयटीच महत्व वाढने साहजिक होते. त्यातच कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक त्यांचे प्रवेश वाढावे म्हणून मुलांच्या डोळयासमोर आयआयटीबद्दल एव्हडी काही रजंक स्वप्न रंगवतात की आयआयटीशिवाय या जगात काहीच मोठ नाही असं मुलांना वाटू लागतं.  पालकानाही वाटते की एकदा काय मुलाला आयआयटीत प्रवेश मिळाला की त्याला मोठ्या पैकेजची नोकरी मिळून त्याचे लवकर करियर घडेल म्हणून कोचिंगसाठी लाखो रुपये खर्च करण्यास तयार असतात. मग ज्याना शक्य आहे ते राजस्थानातील कोट्याला जावून स्वतः मुलासोबत राहून दोन वर्षासाठी साधारण ५-६ लाख रुपये खर्च करतात. आपल्याकड़े यश हे पैशामध्ये मोजले जाते तेंव्हा जेव्हड़ मोठं पैकेज तो तेव्हड़ा यशस्वी  हे समीकरण तयार झाले. एखाद्या शहरातुन कोणी आयआयटीला लागला म्हणजे त्याला चार वर्षानंतर करोड़च पैकेज मिळणार असा गैरसमझ समाजात रूढ़ झाला. मग शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमण्डली आणि सहकर्मचारी सर्वाना आपल्या मुलाने इतर काही नाही फक्त आयआयटीलाच प्रवेश घ्यावा असे वाटने साहजिक होते. आणि त्यामुळेच आयआयटीची अफाट प्रसिद्धि वाढली.
खरी वस्तुस्थिति काय आहे, खरोखरच कोटीच पैकेज मिळतं का?

मुळात आयआयटी/एनआयटी मधे शिकत असलेल्या विद्यार्थ्याना कोटिच पॅकेज मिळते हा निव्वळ गैरसमज आहे. एव्हडेच नाही तर हा सर्व धांदात खोटारडेपणा आणि फसवा प्रचार आहे. दरवर्षी गूगल, याहू, फेसबुक किंवा माइक्रोसॉफ्टसारख्या आयटी क्षेत्रातील बहुदेशीय आयटी कंपन्या नोकरभरतीसाठी आयआयटी/एनआयटीमधे कैंपस इंटरव्हिव घेत असतात.  चांगल्या आयआयटीच्या कंप्यूटर शाखेच्या एखादया खूपच  हुशार विद्यार्थ्यास १.५ ते २ करोड़च (डॉलरच्या रुपात ) पैकेज देतात.  लक्षात ठेवा फक्त कंप्यूटरशाखेच्या विद्यार्थ्यास आयटी कंपनीकडून हे पैकेज मिळत असत. इतर क्षेत्रातील कंपन्या एव्हड़ पैकेज देत नाही, किंबहुना त्यांना परवडत नाही. मग अशा मोठया पॅकेजच्या बातम्या वृतपत्राच्या पहिल्यापानावर झळकतात आणि समाजमाध्यमाद्वारे व्हायरल होतात. मग तो विद्यार्थी, तो शिकत असलेली आयआयटी संस्था आणि ती पैकेज देणारी कंपनी याची फुकटात देशभर जाहिरात आणि पब्लिसिटी होवून जाते.  पण वस्तुस्थिति वेगळीच असते.  ही पैकेजची ऑफर मुळात परकिय चलन म्हणजे डॉलर मध्ये असते. कंपनीचे इतर भत्ते, पीएफ, ग्रैजुटि शेअर वगैरेचा समावेश त्यात केलेला असतो.  सर्व वजाजाता हिशोब केला तर मिळणारी रक्कम खुप कमी असते. समजा गूगलने एका विद्यार्थ्यास  १ कोटि पैकेज युएस डॉलरची ऑफर दिली तर त्यास भारतीय रूपये स्वरुपात फक्त ४० लाख रूपये मिळत असतात. ते काम करत असलेल्या ठिकाणाच राहणीमान व इतर खर्च बघता मिळणारा पगार काही जास्त नसतो. कारण हा पगार डॉलर स्वरुपात असतो. तेथील राहण्याचा खर्च, मेडिकल, टैक्सेस आणि इतर सर्व बाबीचा विचार करून उरलेल्या चलनाचे भारतीय चलनात रूपांतर केल्यास हातात साधारण ४० लाख रुपये पडतात. हे आतलं सत्य सांगायला मिडियाकड़े वेळ नसतो. त्यामुळे 'करोड़च पैकेज' हा खोटारडा प्रचार ठरतो.

आयआयटी/एनआयटी म्हणजेच सक्सेस का?

मुळीच नाही, भारतीय समाजात यश फक्त पैशामध्ये मोजले जाते, ही खुप मोठी शोकांतिका आहे. ज्याच्याकड़े जेव्हड़ा जास्त पैसा तो तेव्हड़ा यशस्वी, हे समीकरण बनले आहे. त्यामुळे आयआयटी एखाद्यास १ करोड़च् मिळाले म्हणजे तो खूपच यशस्वी अशी धारणा झाली आहे.  मुळातच आयआयटी मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे बुद्धिजीवी, गुणवंत, मेहनती आणि हुशार असल्यामुळे मोठे उद्योजक तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या उद्योगात नवनवीन संशोधन व विकास करण्यासाठी अशा मनुष्यबळाची गरज असते.  आज मोठमोठ्या उद्योजकाच्या बोर्डवर एकतरी आयआयटिन असतोच त्यामुळे त्यांना यशाच शिखर गाठन त्यांना सोप जात. तसेच भारत सरकारची भागेदारी असलेल्या कम्पनी (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग)मधे जास्तीत जास्त भरती आयआयटी/एनआयटीची असते. परदेशातही भारतीय आयआयटीयन ला खुप मागणी आहे. तसेच त्यांच 'अल्युमनी नेटवर्क' पक्क असल्यामुळे त्यांना नोकरी-उद्योगामधे वरिष्ठाकडून सहायताही मिळते. इनफ़ोसिसचे नारायण मूर्ति, नन्दन नीलकेणी, अरविंद केजरीवाल, सुन्दर पिचाई  आणि चेतन भगत अशी काही लोक आहेत जे आयआयटीमध्ये शिकुन विविध क्षेत्रात खुप पुढं गेली आहेत.  त्यांनी पैसा आणि नावलौकिकही कमावला. बरेचसे आयआयटीयन आज आयएएस, आयपीएस सारख्या नागरी सेवेत रुजू आहेत. काही आयआयटीयन परदेशात उच्चशिक्षण घेवून तिथेच स्थायिक होतात, कालांतराने एखाद्या आयटी कंपनीचे सीईओ बनतात.  

पण याचा अर्थं सर्वच आयआयटीयन यशाच्या उंच शिखरावर पोहोचतातच किंवा त्यांना करोड़ोच पैकेज मिळतेच असे नाही. पालक किंवा विद्यार्थ्याने या भ्रमात राहु नये. तेथील चार वर्षात विद्यार्थी आपल्या अभ्यासासह इतर जड़नघड़नीवर, स्वतःचा बौद्धिक, मानसिक विकासावर किती भर देतो यावर त्याचा पुढचा प्रवास ठरतो. बरेचशे विद्यार्थी एकदा आयआयटीला प्रवेश मिळाला कि निश्चिन्त होतात, भरकटतात आणि अभ्यासात मागे पड़तात नि मागे राहतात.  जे खरोखरच हुशार आणि मेहनती आहेत अशा दोन-चार कंप्यूटर इंजियरिंगच्या विद्यार्थ्याला  कंपनी चांगल्या ऑफर देतात बाकिना साधारण  ९ लाख ते ११ लाखपर्यन्त पैकेज मिळतो. मग चांगली नोकरी मिळवन्यासाठी त्यांना अजुन पुढे शिकावे लागते. काही उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात आणि मग तिकडलेच होतात.

पण यशाच उंच शिखर गाठण्यासाठी फक्त आयआयटी/एनआयटीच पाहिजे असं नाही. एखाद्या चांगल्या दर्जेदार राज्यस्तरीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेवून नंतर परदेशात एमएस करून विद्यार्थी उज्वल करियर घडवू शकतो. जागतिक स्तरावर आयआयटी/एनआयटीसारख्या संस्थेत शिक्षण न घेताही खुप व्यक्ति बहुराष्ट्रीय कंपनीच्या उच्चपदावर पोहचलेल्या आहेत. भारतरत्न माजीराष्ट्रपति डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आयआयटीयन नव्हते. 'ऑपरेशन फ्लड' द्वारे देशात 'दुग्धक्रांति' घडवनारे पद्मविभुशन सन्मानित डॉ वर्गीस कुरियन हे आयआयटीयन नाहीत.  इस्रोचे अध्यक्ष अनिल वाकोडकर हे व्हिजेटीआयचे विद्यार्थी आहेत. माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेलासुद्धाही त्यापैकी एक. मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलोजी सारख्या साधारण कॉलेजमध्ये शिक्षण घेवून ते उच्चपदावर पोहोचले, माइक्रोसॉफ्टचे सीइओ झाले. वर्ष २००९ मधे ज्याना रसायनशास्त्रात नोबेल प्राईज नंतर पद्मविभूषण मिळविणारे वेंकट रामकृष्णन हे काही आयआयटीयन नाहीत. 'फादर ऑफ़ पेंटीयम चिप' अशी उपाधी ज्याना मिळाली ते विनोद धाम यांनी दिल्ली विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण घेतल आणि ते आयआयटी किंवा एनआयटीचे विद्यार्थी नाहीत. ज्या  हॉटमेलला माइक्रोसॉफ्टने विकत घेतले त्या हॉटमेलचे सबीर भाटिया काही आयआयटीयन किंवा एनआयटीयन नव्हते. एव्हड़च काय आज देशात अगनित उद्योजक, वैज्ञानिक आणि यशाच उंच शिखर गाठलेली मंडली आहेत ज्यांच शिक्षण खुप मोठ्या नामांकित कॉलेजमधे झालं नाही.  वैज्ञानिक संशोधन क्षेत्र तसेच इस्रोमधे आयआयटीचा भरना नाही.  विशेष म्हणजे, आज आयआयटी संस्था सुरु होवून ६७ वर्ष झाली पण एकही आयआयटीयनला 'नोबेल प्राईज' किंवा 'भारतरत्न' सारखा सर्वोच्च बहुमान मिळालेला नाही. कारण मानवजातीच्या कल्यानासाठी कितीतरी वर्ष रात्रंदिवस झटुन विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या साहित्य, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशात्र आणि जागतिक शांतता क्षेत्राच्या संशोधकास नोबेल प्राईज सारखा सन्मान मिळतो. आयआयटीचा प्रवास जेईईपासून सुरु होवून एका मोठ्या पैकेजची आरामदायक नोकरी किंवा परदेशी नोकरीवर येवून थांबतो. या पैकेजच्यापुढे आयआयटीयन विचार करत नाही. आज जरी वृतमानपत्र करोड़च्या पैकेजची दख्खल घेत असतील पण उद्याच्या इतिहासाच्या पानावर अब्जाधिशाबद्दल एक ओळही लिहीत जाणार नाही, हेही तेव्हडचं खरं. ज्यानी समाज आणि देशासाठी स्वतःला वाहून घेतले अशाच व्यक्तीची इतिहास नोंद घेतं.  साधी कला शाखेची पदवी घेवून, विपरीत परिस्थितीत २१ व्या वर्षी आयएएस, आयपीएस झालेले तरुण आपल्या देशात आपण बघतो. 'स्टे हंग्री स्टे फुलिश' किंवा 'कनेक्ट द डॉट्स' सारखी पुस्तके वाचून आपल्या लक्षात येईल कि हनुमंत गायकवाड़, विठ्ठल कामथ सारखी काही मंडली जुजबी शिक्षण घेवूनही आपल्या मेहनत, कौशल्य, सचोटी आणि जिद्दीच्या जोरावर यशाच्या उंच शिखरावर पोहचली आहे. तेंव्हा सक्सेससाठी मोठी पदवी लागतेच हा भ्रम दूर होतो.
        

  'सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे...जे सुदूर, जे असाध्य तेथे मन धावे' हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आज गरज आहे कि पालकानी वेळीच जागे होण्याची, आपल्या मुलाची प्रतिभा, क्षमता आणि कल ओळखण्याची. प्रत्येक विद्यार्थी हा प्रतिभाशाली असतोच, त्यामध्ये एक वेगळी प्रतिभा (टेलेंट) असते गरज आहे ती फक्त ओळखण्याची.  त्यामुळे शेजाऱ्याचा मुलाला आयआयटीत प्रवेश मिळाला म्हणजे माझ्याही मुलाला प्रवेश मिळावाच असा हट्ट धरून आपल्या अपेक्षेचे ओझे मुलावर लादू नये. कारण तुमचा मुलगा आयआयटी न करता आयआयएम, आयएएस, उद्योजक किंवा एखादा मोठा कलाकार होवून खुप पुढे जाऊ शकतो.   क्षमता असेल तर उत्तमच, नसता इयत्ता ११/१२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानेही कोचिंग क्लासेसच्या मोठ-मोठ्या जाहिराती, आमिषे, भूल-थापाला बळी न पड़ता सदसदविवेकबुद्धिंने योग्य तो निर्णय घ्यावा.  तसेच फक्त आयआयटी, एनआयटी अशा एकेरी विचार न करता इतर शैक्षणिक क्षेत्र आणि करियरचाही विचार करावा. कारण देशाच्या प्रगतीसाठी अभियांत्रिकीप्रमाणे इतर क्षेत्रही तेव्हडीच महत्वाची आहेत.


© प्रेम जैस्वाल. मो.९८२२१०८७७५
(लेखक 'एस्पी अकॅडमी' औरंगाबाद या शैक्षणिक संस्थेचे संचालक असून करियर विषयक सल्लागार आहेत. नावासह हा लेख सामायिक करण्यास लेखकाची हरकत नाही.)