'बाळपणीचा काळ सुखाचा किंवा लहानपण देगा देवा.....' आता या म्हणीचं काही खरं राहीलं नाही कारण आता बाळपणीचा काळ तेव्हड़ा काही सुखाचा राहिला नाही. शिक्षणाचा वाढता व्याप आणि त्रस्त पालकांच्या अवाजवी अपेक्षेचे ओझे त्यांच्यावर लादून त्यांच्या सुखावरच घाला जात असल्याचं चित्र दिसत आहेत.
पूर्वी बालपण म्हणजे उडाण टप्पूगिरी, आटयापाट्या,गोट्या, विटी-दांडुनी मैदानं, असा सर्व गल्याबोळयात दणदणाट व्हायचा. शाळा व्यतिरिक्त फक्त खेळच हा उद्योग असायचा. मुलं असो की मुली दिवसभर मुक्त मातीमधे खेळून गुडघे-कोपरे फोड़ून घरी यायचे, जुजबी इलाज करून दुसऱ्या दिवशी खेळायला हजर! त्यामुळे आपसुकचं शरीराची हालचाल आणि वाढत्या वयात आवश्यक व्यायाम होवून जायचा. मनोरंजनाचे इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुलांचं बालपण हे मनसोक्त खेळण्याचचं बालपण होत, कदाचित हेच कारण असावे की त्याकाळी सण- उत्सवसुद्धा सर्व कुटुंबात खुप आनंदाने साजरे व्हायचे आणि मुलंही त्यात पूर्णपणे सामील होवून वेगळा आनंद मिळवयाची. उतरंडीसारखी जास्त भावंडे आणि त्यातल्या त्यात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे ही मूलं कधी लहानाची मोठी व्हायची हे समजत नव्हतं. मोठ्याच्या खांद्यावर लहानाचे ओझे असं चित्र होतं.
८०च्या दशकात आपल्याकडे दुरचित्रवाणी आली आणि बालपणाला ग्रहण लागायला सुरुवात झाली. घरोघरी टीव्ही आले तसेच इतर भौतिक सुखांचे साधनं जसेकी फ्रिज, कूलर, म्यूसिक सिस्टम,वाशिंगमशीन ओवन आली. ह्या उपकरणांनी कुटुंबाचा खर्च आणि आर्थिक समीकरण बदलून टाकलं. त्यात इंग्रजी शाळेच्या खर्चाने फोड़णी दिली आणि झेपत नाही म्हणून ' हम दो हमारे दो' किंवा हल्ली 'एकच पुरे'चा नारा सुरु झाला. अर्थात समाज आणि देशाच्या लोकसंखेचा विचार केल्यास त्यात वावगं असं काहीच नाही. छोट्या अशा न्यूक्लियर कुटुंबात जोपर्यंत दुरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शन होत तोपर्यन्त वातावरण ठीक होतं. वाहिनी आणि त्यावर प्रक्षेपित होत असलेल्या सीरियल्स यावर माहिती प्रसारण मंत्रालयाचा अंकुश होता. मुळातंच या दूरदर्शनचा उद्देश माहिती, दूरसंचार आणि शिक्षणासाठी होता. पण जसजसे या टीवीवर खाजगी वाहिन्यांची गर्दी वाढली मग मुळ उद्देश बाजूला राहून सीरियल, डेली सोपने जागा व्यापली. एव्हड़च काय पण मुलासाठी 'खास स्टफ' म्हणून कार्टूनचं प्रसारण सुरु झालं आणि चित्र बदललं! खेळाच्या मैदानातील खेळणारी मूलं पक्के टीवीदर्शक, मार्केटिंगच्या भाषेत 'टारगेट ऑडियंस' बनली. विट्टी-दांण्डूु आट्यापाट्या, कब्बडी खोखो, कंचे सारखे मैदानी खेळ खेळणारी मंडळी डोरेमॉन, शिनच्यन, नोबीता हे कार्टून कैरेक्टर बघण्यासाठी रिमोटवर बोटं फिरवू लागली. आजही बरीच मूल कार्टूनच्या कैरेक्टरसारखी विचित्र बोलताना दिसतात. विभक्त कुटुंबपध्दतीत ना आईला वेळ ना बाबाला! संस्कार करण्याच काम येवून पडलं ते शाळेच्या शिक्षकावर आणि ड्राइंगहॉलच्या टीवीवर. सीरयलच मनोरंजन कमी म्हणून की काय मग मनोरजंक जाहिराती सुरु झाल्या जेणेकरून बसल्या जागेवरून उठुच नये.
हल्लीच्या जनरेशनला 'टीनेजर' म्हणावे कि 'स्क्रिनेजर' हेच समजत नाही. आज हया मुलाना शाळेचा वेळ सोडला तर खऱ्या जगाकड़े पाहण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. कोणती ना कोणती एक स्क्रिन मग ती मोबाइल, टैब असो कि टीवी की कंप्यूटर त्यांना हवी असते. यात फक्त त्यांचाच दोष आहे असे नाही कारण पालक मंडळी ही त्यास जबाबदार आहेतच. सहज सोपे मनोरंजनाचे साधन उपलब्ध असताना मूल बाहेर खेळायला जातीलच कशाला? हातात सामावणाऱ्या मोबाइलमधेच त्यांच मैदान आणि कोर्ट, त्यावरच मनसोक्त बोटे फिरवून क्रिकेट, बैडमिंटन आणि वाटेल ते खेळ खेळायचं, त्यावरच जिंकांयचं, हरायचं आणि धन्यता मानायची! त्यामुळे मैदानी खेळ खेळणारी मित्रमण्डळी घटूण फक्त स्क्रीन वर खेळनारे 'डिजिटल फ्रेंड्स' तयार झाले. आणि स्क्रिनच्या जाळयात ही बालमण्डळी एव्हढी अडकलेली आहेत की त्यांना एखाद्या शहरातील वाण्याच्या दुकानाचा पत्ता किंवा व्यवहारिक अशा काही गोष्टी जरी विचारल्या तर ते सरळ 'गूगल' मधे टाकतात. मोबाइल आणि माहिती तंत्रज्ञानामुळे दूरवरच जग जरी जवळ आल्यासारखं वाटत असेल पण मुळात जवळची माणसं दूर होताना दिसत आहे. या समस्येला फक्त मुलंच जबाबदार आहे असे म्हणणे चुकीचे होईल, उलट पालक जास्त जबाबदार आहेत. हल्ली बरेच पालक जेंव्हा आपल्या अगदी छोट्यामुलांच 'मोबाइलकौशल्या' ची फुशारकी मारतात तेंव्हा त्यांची कीव येते आणि वाईट वाटते. 'अहो आमच्या बंटी खूपच हुशार, त्याला मोबाइलचे कोणतेही ऑपरेशन विचार, सर्व माहित आहे त्याला, जे मला माहित नाही ते त्याला माहीत! पण शोकांतिका अशी की याच बंटीला आपल्या वडिलांचे जवळचे नातेवाईक जसे चुलत काका, मामा इत्यादि माहित नसतात. अगदी शरीराचे सर्व अवयव, बौद्विक क्षमता विकसित न झालेल्या बालअवस्थेत बाळ गुंतुन राहावे म्हणून पालक जेंव्हा मुलांच्या हातात मोबाइल देतात तेंव्हा त्यानी मोबाइलच्या दुष्परिणामांचा थोड़ातरी विचार करावयास हवा. आज कोवळया वयाची मूले मोठया नम्बरचा चष्मा वापरताना दिसत आहेत. अर्थात खाण्याच्या आधुनिक सवयी, जंकफ़ूड याचाही परिणाम डोळ्यावर होतोच.
जस जसा शिक्षणाचा प्रसार वाढला, स्पर्धा वाढली मग या स्पर्धेत आपला मुलगा मागे नको म्हणून पालक सतर्क झाले. जे आपल्याला मिळाले नाही किंवा जिथे आपण कमी पडलो ते मुलासोबत होता कामा नये म्हणून चांगल्या, उत्तम अति उत्तम शाळेत मुलांचा प्रवेश झाला. जशी मागणी तसा पुरवठा होणे गरजचे म्हणून जुजबी मैदान असलेल्या नेशनल, इंटेरनैशनल आईसीएसई, सीबीएसई शाळा सुरु झाल्या. शाळेच्या वारंवार घटक चाचण्या, सहामायीं आणि वार्षिक परिक्षेव्यतिरिक्त इतर परीक्षा सायन्स ओलिम्पियड, मैथ ओलिम्पियड, होमी भाभा अशा परीक्षेत छोटी मण्डळी गुंतत गेली विद्यार्थी न राहता तो फक्त परीक्षार्थी बनला. आज एखाद्या सीबीएसई किंवा आईसीएसई शाळेचा विद्यार्थी जेंव्हा घरी येतो तेंव्हा चेहऱ्यावर एखादा थकुन आलेल्या सुपरक्लासवन ऑफिसर, बँकेच्या मैनेजरसारखे थकलेले हावभाव आणि तनाव असतात. एव्हढा हया शिक्षणाच्या व्याप आणि तणावाने मुलांची खेळायची तर सोडा झोपायची वेळ खावून टाकली.

आज बरीच पालक मंडळी मुलाना वेगवेगळे कला आणि अवांतर शिक्षणाचे वर्ग लावताना दिसतात. आपला मुलगा कोणत्याच क्षेत्रात कमी पडु नये हा त्यामागील विचार. मुलांचा सर्वांगीण विकास, संस्कार किंवा छंद म्हणून ते आवश्यकच आहे पण त्यासही काही मर्यादा असावी. प्राथमिक शिक्षण घेणारा विद्यार्थी ट्यूशनसहित जर सकाळी चित्रकलेला, दुपारी शाळेतुन आल्यानन्तर बैडमिंटन, त्यानन्तर संगीतक्लास आणि रविवारी अबेकस क्लासला जात असेल तर यात तो विद्यार्थी काय काय साध्य करेल. जर वैज्ञानिक आईंस्टाईन, न्यूटन, पायथागोरस, एडिसन हे असेच क्लास लावत बसले असते तर त्यांना हे विज्ञानाचे शोध लावता आले असते का. साधेसरळ उदाहरण द्यायच तर बागेत किंवा शेतात जेंव्हा आपन एखाद फळ-फूल-धान्य देणार झाड़ लावतो तेंव्हा त्याच्या वाढीसाठी किंवा त्याला पूरक असं जीवनसत्व मिळावी म्हणून त्याबाजुचे तण आपण वाढू देत नाही आणि वाढलं तरी आपण ते नाहीसे करतो. जेणेकरून त्या झाड़ाला सम्पूर्ण शक्ति मिळावी आणि ती इतरत्र विभागली जावू नये. तसा एखादा छंद जोपासने ठीक आहे कारण त्यातच चांगला अभ्यास, रियाज मेहनत करून तो पुढे नाव, पैसा कमावू शकतो, करियर घडवू शकतो. पण 'एकना धड़' असे वेगवेगळे प्रशिक्षण घेवून मुळात काही साध्य होणार नाही.
बालपण हे वर्तमानात जगत असतं. गरज आहे पालकानी जागरूक होण्याची, मुलांच्या शैक्षणिकसह शारीरिक, बौद्धिक सर्वांगीण वाढीकड़े लक्ष देण्याची आणि त्यांना वर्तमानातच आनंदी ठेवण्याची. आजची मूलं म्हणजे उद्या देशाचं भविष्य घडवणारी पिढी, तिचे काळजीपुर्वक संगोपन होणे जरूरी आहे, तेंव्हा वेळीच जागे होने गरजेचे आहे.

There is a lot of truth in this article.People are taking away the childhood of their children.
ReplyDelete