ad1

Tuesday, 12 September 2023


बॅटरीचा मनोरंजक शोध!



फुल्ल स्पीड वायफायच्या जोडीला फुल्ल चार्जड मोबाईल बॅटरी म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग!  हल्लीच्या तरुण पिढीला एक वेळेस पोटात अन्नाचा कण नसला तरी चालतो पण हातातील मोबाईलची बॅटरी फुल्ल हवी असते. चार्जर सोबतच एक एक्सट्रा बॅटरीबँक सोबत घेऊन फिरणारे किती तरी महाभाग आपण बघत असतो.

बॅटरी.  आज वीजेप्रमाणेच बॅटरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे.  मोबाईलची बॅटरी, लॅपटॉपची बॅटरी, घड्याळाची बॅटरी, दोन-चाकी वाहनांची बॅटरी आणि एव्हडच नाही तर वीज गेल्यानंतर बॅक-अपसाठी आवश्यक असते ती इन्व्हर्टरची बॅटरी. आज जेंव्हा सर्वत्र संगणकीकरण होऊन 'डाटा' साठवून ठेवनं जोखमीचं काम झालं असल्यामुळे बॅटरीच महत्व जास्तच वाढलं. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीस बॅटरीवर चालणारी वाहन हा पुढील काळात सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. आपण वापरतो त्या विजेच्या निर्मितीचा शोध लागण्याआधी वैज्ञानिकांनी बॅटरीचा शोध लागला, होता.  विशेष म्हणजे हा शोध लागला एका छोट्या प्राण्याच्या प्रयोगातून. तो प्राणी म्हणजे एक बेडुक !

इटलीचा वैज्ञानिक, गॅलवानीचे विजेसंबंधित अनेक प्रयोग केले होते. त्यापैकी त्याचा बेडकाचा प्रयोग खूप महत्त्वाचा होता. या प्रयोगात गल्व्हनीनं एका मृत बेडकाचा पाय एका लोखंडी फेन्सला बेडकाचा पाय बांधून त्यास पितळी हुकने स्पर्श केला असता बेडकाच्या पायाने झटका दिला. या प्रयोगावरून गॅलवानी या निष्कर्षावर पोहचला कि बेडकाच्या शरीरात एक प्रकारची वीज निर्मिती होत असावी. त्या विजेस त्यानं बायोइलेक्ट्रिसिटी असं नावंही दिलं. गल्व्हणीच्या या प्रयोगाने जगात एकच खळबळ माजली.

गल्व्हनीचा प्रयोग आणि बायोइलेक्ट्रिसिटीची सर्वत्र चर्चा होत होती पण त्याचा सहयोगी व्होल्टा त्याशी सहमत नव्हता. त्याचा त्या प्रयोगाकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. १७९२ मध्ये त्यानं गल्व्हणीच्या प्रयोगाचा खूप अभ्यास केला. वेगवेगळ्या धातूच्या पट्टया वापरून त्यानं बेडकाचा प्रयोग करून पाहिला असता त्याच्या लक्षात आले की समान धातूच्या पट्ट्याने बेडकास स्पर्श केला असता त्यावर काहीही परिणाम होतं नव्हता. एव्हढंच नव्हे तर एका बेडकास भिन्न धातूच्या दोन पट्ट्याने  स्पर्श केले असता वेगवेगळा परिणाम मिळत असे. या वरून व्होल्टा या निष्कर्षावर पोहचला कि वीज बेडकाच्या शरीरात नसून ती दोन विभिन्न धातूच्या पट्यामुळं तयार होतं होती. बेडकाच्या शरीरातील द्रव्य हे इलेक्ट्रोलाइटचं काम करत होते.  थोडक्यात वीजनिर्मितीसाठी बेडूक किंवा इतर प्राण्यांच्या अवयवाची आवश्यकता नाही हे व्होल्टान दाखवून दिलं.  त्यासाठी बेडकाच्या शरीरातील द्रव्याऐवजी साधं मिठाचं पाणी आणि दोन भिन्न धातूच्या पट्या वीज निर्मितीसाठी पुरे आहेत हे व्होल्टान दाखवून दिलं. त्याला त्यानं 'इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स'  असं नावं दिलं. वेगवेगळ्या धातूच्या परिणामाचा अभ्यास करून व्होल्टान त्या धातूचे उतरत्याक्रमान यादीच तयार केली. अनुक्रमे झिंक,लेड,टिन, आयर्न, कॉपर, सिल्वर, गोल्ड, ग्राफाइट आणि मॅगनिझ अशी ती यादी होती. थोडक्यात झिंक आणि ग्राफाईट मूळे मिळणारा इलेक्ट्रोमोटिव्ही फोर्स हा झिंक-टिन पेक्षा जास्त असा त्यानं शोध लावला. बऱ्याच दिवस अभ्यास करून व्होल्टान १७९७ मध्ये कॉन्टॅक्ट 'थेअरी ऑफ इलेक्ट्रीसिटी'  पूर्ण केला. बेडकाला बाजूला सारून त्यानं थोडं किंचितसं खारट मिठाचं पाणी किंवा सौम्य आम्ल वापरून त्यानं प्रयोग केले. तसेच दोन वेगळ्या धातूचे तुकडे जिभेला लावले असता जिभेला झटका बसत असल्याचं व्होल्टाच्या लक्षात आलं.

वर्ष १८०० मध्ये व्होल्टान सिल्वर आणि झिंकच्या पट्ट्या वापरून प्रयोग केला. एका कपात सौम्य आम्ल घेऊन जेंव्हा दोन पट्या त्या आम्लात बुडवल्या असता त्याद्वारे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होत होता. अशा वेळी त्या कपात बोट बुडवले असता विजेचा झटका लागत असे.
पुढं व्होल्टान अनेक सिल्वर, झिंकच्या पट्ट्या आणि त्यामध्ये ओलसर कागद किंवा कपडा एकमेकांवर रचून इलेक्ट्रोमोटिव्ही फोर्स म्हणजेच व्होल्टेज कितीतरी पटीनं वाढत असल्याचे निदर्शनात आलं. यालाच 'व्होल्टायीक पाईल' असं नावं देण्यात आलं. आणि अशा प्रकारे सतत करंट देणाऱ्या बॅटरीचा जन्म झाला. १८०० मध्ये आपला बॅटरीविषयीचा प्रबंध व्होल्टान इंग्लडच्या रॉयल सोसायटीला सादर केला.  रॉयल सोसायटीच्या जोसेफ बँकन तो सर्व वैज्ञानिका पुढं मांडून त्यावर चर्चा केली आणि तो प्रसिद्धीला दिला गेला.

व्होल्टाच्या विजेच्या बॅटरीच्या शोधामुळं संपूर्ण वैज्ञानिक दुनियेत एक प्रकारची क्रांती घडली. व्होल्टाचा प्रयोग करून वैज्ञानिक आता पाहिजे तेव्हडी वीज निर्मिती, विजे संबंधी अभ्यास करू शकत होते. एव्हडच नाही तर रसायनशास्त्राचे वैज्ञानिकाला रासायनिक पदार्थाचा अभ्यास करणे सोपे झाले होते. विविध रासायनिक पदार्थ इलेक्ट्रोलाईटसारखे वापरून त्याचा अभ्यास ते करत होते.  त्याकाळी सिल्वर आणि कॉपरचे नाणे चलनात होते त्यामुळं ते दोन नाणे वापरून वैज्ञानिक सहज एक छोटी बॅटरी तयार करत असतं.
पुढं बॅटरीसाठी बेरियम, कॅल्शियम, लिथियम, मॅग्नेशियम, पोटेशीयम,सोडियम इत्यादीचा वापर सुरु झाला.

विजेच्या विज्ञानातील त्याच्या अमोल शोधाची पावती म्हणून विजेच्या भारच्या ऐकेकाला व्हॉल्ट असं नाव देण्यात आलं. व्होल्टाच्या मृत्यूनंतर विजेच्या भारच एकक व्हॉल्ट म्हणून ठेवण्यात आलं. तसेच युरो चलन येण्याआधी त्याचा फोटो 10000 लायर नोटवर झळकला. त्याच्या जीवनगौरव म्हणून कोमोमध्ये व्हॉल्टच्या नावाने एक म्युझियम बनवण्यात आलं. व्हॉल्टचा जन्मदिवस बॅटरी दिवस म्हणून साजरा करतात.


©प्रेम जैस्वाल, औरंगाबाद
   9822108775
(एस्पी अकॅडमी संस्थेचे संचालक व करियर मार्गदर्शक.)

No comments:

Post a Comment