हल्ली सर्वांच्या हातामध्ये मोबाईल गुरु आहे. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक गोष्ट आपण गुगलवर किंवा इन्स्टा सारख्या समाज माध्यमामध्ये शोधत असतो. मगं ते आरोग्या संबंधित आरोग्याविषयी असो की अजुन काही. एखाद्या बॉटलचं झाकन कसं उघडावं यावर दहा व्हिडीओ सापडतील. 'मी गुगल वर पाहिलं, गुगलवर कन्फर्म केलं ' गुगल म्हणजे माहितीचा खजिना आणि सर्व समस्याचे उत्तर गुगलकडे असतेच असा आता जनसामान्याचा समज झालेला आहे. पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे की गुगलवरची बरीच माहिती हि सरासर चुकीची असते. त्यामुळे एखाद्या समस्येच वास्तविक जगात समाधान न शोधता अभासी माध्यमात त्या समस्येच समाधान शोधने अत्यन्त घातक ठरू शकते. एका दवाखान्यातील फळ्यावर रुग्णाला उद्देशून स्पष्ट लिहिलं होतं -
' तुमच्या आजाराविषयी गुगलच ज्ञान फक्त तुमच्यापर्यंतचं ठेवा!'
अलीकडे इंस्टाग्राम, व्हाटसप सारख्या समाज माध्यमातून बरीच माहिती लोक घेत असतात. किंबहुना काही महाभाग इन्स्टा-व्हाटसप विद्यापीठाचे पदविधर, पीचडी झाल्यासारखे ज्ञान देत फिरत असतात. काय खावं, कधी खावं, किती खावं, कुणी खाऊ नये, कशामध्ये अँटी ऑक्सिडन्ट भरपूर असते आणि कशाने कॅन्सर होतो? विशेष म्हणजे कशामध्ये काही चांगल असेल तर ते - अँटीऑक्सिडन्ट! आणि काही खाण्यामध्ये वाईट होत असेल तर ते सरळ सरळ कॅन्सर! दुसरं तिसरं काही नाही. मग आयुर्वेदिक घ्यावं की होमिओपथी की एलोपथी अशा आरोग्यविषयक पोस्ट भरपूर वाढल्या आहेत. आणि या पोस्ट फक्त अन्न-औषधा बद्दलचं असतात असं नाही तर भांडी कोणती वापरावी? गॅस वापरावा का चूल का सोलार....तांदूळ, डाळ शिजवताना कशी शिजवावी जेणेकरून ऍसिडिटी होणार नाही वगैरे वगैरे. आधीच त्रस्त असलेली भाबडी लोकांसाठी असे उपदेश म्हणजे 'भित्या पाठी ब्रम्हराक्षसा सारखे असतात. मग बिचारी जनता त्या पोस्टच तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत असते. मग तवा, कढई, पिण्याच्या पाण्याची साठवण, फिल्टर पासून तर पाणी कसे प्यावे, कधी प्यावे कधी पिऊ नये, सकाळी लिंबू पिळून पाणी प्यावे का त्यात मध टाकावा का दोन्ही टाकून पाणी प्यावे .....अक्षरशः वैताग असतो. एकदा का इन्स्टाला कळलं की तुम्ही आरोग्याविषयक जागरूक आहात, मग तो तशाचं पोस्टचं खाद्य तुमच्या मेंदूला पुरवत असतो. थोडक्यात तुम्ही त्या दुष्ट चक्रात अडकून जाता.
डिमांड तसा सप्लाय. इन्स्टा किंवा गुगलवर अशा पोस्टचे रील टाकणारी मंडळी लाखोत असते. मग पोस्ट टाकणारे बहादर आपल्या पोस्टच्या लाईक वाढावे, स्क्रीनटाईम वाढावा, लोकांनी पोस्ट शेअर वाढवून पैशाची कमाई व्हावी म्हणून नको ते 'फेक' कन्टेन्ट गुगल किंवा इन्स्टावर 'लोड' करत असतात. भिती असलेलं कन्टेन्ट इन्स्टावर जास्त चालतं. इतरांना शेअर करुन आपण लोकांचे प्राण वाचवू शकू म्हणून लोकं अशा पोस्ट शेअर करतात. भित्री जनता त्यास बळी पडते, पोस्ट टाकणारा मात्र जाहिरातीद्वारे पैसे कमवून जातो.
कळत न कळत आपण पश्चिमात्य देशाचं अनुकरण करत असतो. मग पोस्ट खऱ्या वाटाव्या म्हणून त्यास पश्चिमात्य देश जसेकी इंग्लंड, युरोप किंवा अमेरिकेच्या 'फ़ोर्ब्स', 'नासा' किंवा एखाद्या अमेरिकी एजंसीचा हवाला दिलेला असतो. पोस्टची विश्वसनियत्ता वाढण्यासाठी याची मदत होते. मग आपली भोळी अशिक्षित जनता मुकाट ते मान्य करते. त्यात गोरी चमड़ीच्या लोकांना आपण प्राचीन काळापासूनच मान देत आलो आहोत. तो मग तो तिकड़चा विद्वान असो कि एखादा अगदी अशिक्षित भिकार मनुष्य असो. अस्खलित इंग्रजीत बोलतो ना म्हणजे ते अगदी खरं, मग ते खोट कस्!
तसे अमेरीका किंवा यूके मधे अशा भरपूर रिकामटेकड्या सर्वे एजेंसी आहे त्यांचे अहवाल आणि भन्नाट फाइंडिंग ऐकुन त्यांची किव येते. 3000-4000 लोकांचे नमूने घ्यायचे आणि त्याची एक एवरेज रिडींग काढ़ायची की झाला सर्वे! मग आपल्या वर्तमानपत्रात बातमी येते -
- जो सकाळीदोन कप चहा पितो
त्याचे आयुष 10 वर्षाने वाढते, फक्त गवती चहा प्या, दिवसातून दोन वेळा प्या, ग्रीन टी पीत असाल तर सावधान! कॉपी पिऊ नका, कॉफ़ी प्या तरुण रहा, कॉफी प्या म्हणजे पहिले अपत्य
मुलगा होईल! ई.
- जो कुत्रा पाळतो त्यास भूक
कमी लागते, कुत्रा पाळत असाल तर सावधान! कुत्रे पाळा तरुण रहा वगैरे.
-ज्यांची ऊँची जास्त ते कमी
रडतात, कमी उंची /जास्त उंची आरोग्यासाठी घातक! बोर्नव्हिटा प्या उंची वाढवा इत्यादी.
-ज्याच्या घरात मांजर ते जास्त
सुखी राहतात.
समजा या सर्वेवाल्यानी अख्या अमेरिकेच्या जनतेच जरी सैम्पल घेतले तरी ते आपल्या काय कामाचे? कारण त्यांची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक स्थिति तसेच खानपान राहनीमान एकन्दरीत सर्व आपल्यापेक्षा भिन्न. मग तुमचा सैम्पल सर्वे आमच्या विविधतेने नटलेल्या भारत देशात काय कामाचा? एव्हड़च काय महाराष्ट्राचे सैम्पल सर्वे आंध्रप्रदेशात चालू शकत नाही. पण आपल्या लोकांना अशा बातम्या किंवा पोस्ट वाचायला आवडतात. एक मनोरंजन म्हणून ठीक पण त्यावर विश्वास ठेवून त्याचं सरळ अनुकरण करने अगदी चुक. त्यामुळे आरोग्यविषयी तक्रारीसाठी इंस्टाग्राम न बघता आपल्या जवळच्या डॉक्टराचा सल्ला घेणे कधीही चांगले.
हल्ली इंस्टावर आरोग्य आणि ब्लड चाचणी विषयी अनेक पोस्ट दिसत असतात. अशा पोस्ट रील बघून लोकं स्वतःच रक्त चाचण्या करुन घेत आहेत. ते जवळच्या डॉक्टरांकडून आजाराची शहानिशासुद्धा करून घेत नाही आणि आयुर्वेद वगैरे सुरु करुन आजाराच्या दुष्ट चक्रात अडकून पडतात. अमेरिकेच्या जास्तीत जास्त वैद्यकिय चाचण्याचे एव्हरेज सर्वे रिपोर्ट आपण स्टॅण्डर्ड समजून ते डोळे बंद करुन पाळत असतो.
उदा.
-बीपी 80/120 असावा
-हार्टरेट 72 bpm असावा
तुमच वजन - से.मी.ऊँची -100 = तुमच वजन (kg)
एव्हडेच असावे.
-रक्ताच्या इतर चाचण्या. ई.
एखाद्या पंजाबी सरदार मुलाचे फॉर्मुलानुसार वजन 60kg असेल, म्हणजे तो हडकुळा असेल तर अशा हडकुळ्या मुलाला पंजाबप्रांतात विवाह योग्य मुलगी मिळणे कठिन होईल. कारण पंजाब मध्ये मुलांचं वजन सरासरी 75 किलो आहे म्हणजे तो 60kg असलेला मुलगा म्हणजे - कुपोषित मुंडा! बऱ्याच देशाची जनता बुटकी किंवा उंच असते म्हणजे ते एब्नॉर्मल आहेत अस समजायचं का? कित्येक पेशंटचा बीपी हा 120/140 असतो आणि ते मस्त जीवन जगतात. लक्षात घ्या या किंवा अशा टेस्टच्या फिगर म्हणजे 'फक्त एवरेज रिडींग' आहेत, आणि एवरेज हे स्टैण्डर्ड असू शकत नाही!
महत्वाचे, मानवी शरीराचा प्रत्येक व्यक्तीचा डिएनए वेगळा असतो. एकाचा चेहरा दुसऱ्याशी मिळत नाही, तुमच्या हाताचे ठस्से दुसऱ्यांशी मिळत नाही. त्याच प्रमाणे सर्वांचे अवयव आणि त्यांची संरचना सुद्धा वेगळी असू शकते. मग ते आतडी असो, मूत्रपिंड, ह्रदय किंवा त्वचा. हेच कारण कि सर्वांचे ब्लड प्रोफाइल थोडे फार वेगळे असू शकतात. हेच कारण आहे की निष्णात फिजिशियन ब्लड रिपोर्ट पेक्षा पेशन्टच्या क्लिनिकल चेकअप ला जास्त महत्व देतात. थोडक्यात 'They treat the patient and not the report'.
एखाद्या पंजाबी सरदार मुलाचे फॉर्मुलानुसार वजन 60kg असेल, म्हणजे तो हडकुळा असेल तर अशा हडकुळ्या मुलाला पंजाबप्रांतात विवाह योग्य मुलगी मिळणे कठिन होईल. कारण पंजाब मध्ये मुलांचं वजन सरासरी 75 किलो आहे म्हणजे तो 60kg असलेला मुलगा म्हणजे - कुपोषित मुंडा! बऱ्याच देशाची जनता बुटकी किंवा उंच असते म्हणजे ते एब्नॉर्मल आहेत अस समजायचं का? कित्येक पेशंटचा बीपी हा 120/140 असतो आणि ते मस्त जीवन जगतात. लक्षात घ्या या किंवा अशा टेस्टच्या फिगर म्हणजे 'फक्त एवरेज रिडींग' आहेत, आणि एवरेज हे स्टैण्डर्ड असू शकत नाही!
महत्वाचे, मानवी शरीराचा प्रत्येक व्यक्तीचा डिएनए वेगळा असतो. एकाचा चेहरा दुसऱ्याशी मिळत नाही, तुमच्या हाताचे ठस्से दुसऱ्यांशी मिळत नाही. त्याच प्रमाणे सर्वांचे अवयव आणि त्यांची संरचना सुद्धा वेगळी असू शकते. मग ते आतडी असो, मूत्रपिंड, ह्रदय किंवा त्वचा. हेच कारण कि सर्वांचे ब्लड प्रोफाइल थोडे फार वेगळे असू शकतात. हेच कारण आहे की निष्णात फिजिशियन ब्लड रिपोर्ट पेक्षा पेशन्टच्या क्लिनिकल चेकअप ला जास्त महत्व देतात. थोडक्यात 'They treat the patient and not the report'.
आरोग्याविषयी जागरूक रहाने कधीही चांगलेच. 'प्रेवेन्शन इज अल्वेज बेटर देन क्युअर.' पण निष्णात वैद्यांचा सल्ला न घेता सोशल मीडियालाच डॉक्टर मानून स्वतः औषध घेणे अत्यन्त चुकीचे होईल.
-प्रेम जैस्वाल (पेडगावकर )
ppedgaon@gmail.com
9822108775

No comments:
Post a Comment