जीपीएस: कसं काम करतं ?
काल विकएन्डला तुम्ही एका आवडीच्या रेस्टारेंटमध्ये पार्टीला गेला होता. सकाळी तुमच्या मोबाईलवर त्या रेस्तारेंटचा संदेश येतो,
' आम्ही आभारी आहोत, आमच्या रेस्टारेंटची सेवा आपल्याला कशी वाटली, कृपया रेटिंग द्या?'
सोमवारी ऑफिसला निघण्यापूर्वी तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक पूर्वसूचना मिळते,
'आज ट्राफिक नेहमीपेक्षा जास्त असणार, ऑफिस पोहचण्यासाठी वीस मिनटं जास्त लागतील.'
तुम्ही लगेच आपल्या कारने सुसाट निघता. मधेच एक संदेश येतो,
'हा रस्ता पुढं बंद आहे, पर्यायी रस्त्याने पुढं जा!'
आपल्याला प्रश्न पडतो कि आपण काल कुठे पार्टी केली हे कुणालाही सांगितलं नव्हतं, मग या मोबाईलला कसं कळलं ? पुढे ट्राफिक जास्त आहे, रस्ता बंद आहे, वळण, पूल आहे, अशी पूर्वसूचना हा मोबाईल कसं काय देत असावा ?
वाचक मित्रानों, हि सर्व करामत आहे जीपीएस म्हणजेच 'ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम' ची. प्राचिनकाळी सागरीप्रवासात दिशादर्शकासाठी काही आधुनिक साधन नव्हती. होकायंत्राचा शोध लागण्यापूर्वी नाविक आकाशातील सूर्य तसेच ताऱ्यांचे पुंज आणि त्यांच्या बदलत्या जागा, दिशा यावरून आपल्या सागरी प्रवासाची दिशा ठरवत असत. थोडक्यात पृथ्वीवरील प्रवास आकाशातील तारकापुंजावर आधारित होता. आजच जीपीएससुद्धा आकाशातुनच चालत असतं. फरक एव्हडाच कि वर तारकांचे नव्हे तर अनेक कृत्रिम उपग्रहाचे दाट जाळे असते. मुळात जीपीएसचा शोध 1964 मध्ये अमेरिकेच्या लष्करी सरंक्षण विभागाने लावला. अमेरिकेच्या सरंक्षणविभागाने क्षेपणास्त्र डागण्यासाठी, जहाजे, पाणबुडीला दिशा दर्शविण्यासाठी किंवा एकादया अज्ञात ठिकाणची माहिती घेण्यासाठी 'डॉप्लर' पद्धतीच्या दिशादर्शक जीपीएस वापरण्यास सुरुवात केली. वर्ष 1994 नंतर त्याचा उपयोग नागरीक कामासाठी करण्यास सुरुवात झाली. जीपीएस आज आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. एखाद्या नवीन कॉफी हाऊसला जायचं असेल किंवा दूर एखाद्या नवीन शहरात मनसोक्त भटकायचं झाल्यास जीपीएस तुम्हाला पूर्ण मदत करतो. एकूण अंतर किती कि.मी. पासून रस्त्याची स्थिती कशी, किती वेळ, किती खर्च या सर्वच गोष्टीची पूर्वकल्पना हा जीपीएस निघण्यापूर्वीच देत असतो. आज सर्वच उद्योगधंद्यात ग्राहकांना वेहीकल ट्रेकिंग, कुरियर ट्रेकिंग सारख्या सेवा देण्यासाठी जीपीएस खूपच उपयोगी आहे. लष्करी तसेच नागरी उडान करणारी विमाने, जहाजे, पाणबुडी तसेच खाजगी वाहतुकीसाठी जीपीएस म्हणजे मोठं वरदान आहे. थोडक्यात जीपीएसमुळे आपण प्रवासाचे योग्य नियोजन करून वारंवार विचारपूस करण्याची कटकट न राहता आपला प्रवास अगदी सुखाचा होतो. कसं काम करत असावा हा जीपीएस ?
मुळात जीपीएस प्रणालीमध्ये तीन वेगवेगळी उपकरनं आपसात वेळेच ताळमेळ लावून आपल्याला आपलं लोकेशन माहित करून देत असतात. हि तीन उपकरण कोणती? तर आकाशात सतत फिरणारे अनेक जीपीएस उपग्रह, त्या उपग्रहाची जमीनीवरून अचूक नियंत्रण करणारी नियंत्रण प्रणाली [कंट्रोल सिस्टीम] आणि तिसरं उपकरण म्हणजे आपल्या मोबाईलं किंवा चारचाकीमधील जीपीएसची छोटी चिप म्हणजेच जीपीएस रिसिव्हर. प्रथम आपण या तिन्ही उपकरणाची माहिती करून घेऊ आणि मग त्याच कार्य समजुन घेऊ.
1. जीपीएस सॅटेलाईट: सॅटेलाईट म्हणजे एका मोठ्या ग्रहाभोवती विशिष्ट कक्षेत फिरणारा उपग्रह. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा पृथ्वीचा उपग्रह आहे. अशाच प्रकारे पृथ्वीच्या भोवती फिरणारे अनेक 'कृत्रिम उपग्रह' आहेत जे विकसित देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रांस, जपान सह विकसनशील भारत देश यांनी सोडलेले आहेत. सौरऊर्जेवर स्वयंचलीत हे उपग्रह पृथ्वीच्या भोवती एका विशिष्ट कक्षेत फिरत असतात. प्रसिद्ध भौतिकशास्त्र वैज्ञानिक जॉन केपलरच्या सिध्दांतानुसार त्याच्या विशिष्ट वेगामुळे त्यावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होत नाही. हे उपग्रह अनेक प्रकारचे असतात. पृथ्वीच्या जवळील कक्षेतील इमेज घेणारे उपग्रह अति जास्त वेगाने प्रदक्षिणा घालत असतात, त्यापुढील कक्षेतील जीपीएस उपग्रह, दूरसंचारसाठी उपयुक्त उपग्रह थोड्या कमी वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतात. या उपग्रहाला संदेशाची आवकजावक करणारे 'ट्रान्स्पोन्डर', कॅमेरे तसेच दिशा-कोन बदलण्यासाठी मोटार लावलेली असते. आज जगात सर्वात पहिल्या अमेरिकेच्या जीपीएस सह आकाशात चार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमच मोठं जाळं आहे. रशियाची ग्लोनास, युरोपची गॅलिलियो, चीनची बीडॉउ तर जपान आणि भारताची स्वतःची ' नाविक' नेव्हिगेशन सिस्टम आहे. एकट्या अमेरिकेने 72 जीपीएस उपग्रह पाठविले पैकी बिघाड होऊन 31 कार्यान्वित आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था [इस्रो] ने 7 उपग्रह पाठविले असून देशा च्या 1500 किमी सीमेबाहेरच्या भागावर त्यांचं नियंत्रण आहे. हे उपग्रह साधारण पृथ्वीपासून 15000 किमी वर नियोजित कक्षेत फिरत असतात. जेंव्हा आपण एखादं लोकेशन बघतो त्यावेळेस कमीत कमी चार उपग्रहाच्या संपर्कात ती वस्तू आलेली असते. या सर्व उपग्रहाचा आपसातील मेळ साधण्यासाठी त्यामध्ये अचूक असे 'एटोमिक क्लॉक' लावलेले असते.
2. कंट्रोल सेंटर [नियंत्रण केंद्र]: आकाशातील अनेक उपग्रहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जमिनीवर वेगवेळ्या देशाचे एक नियंत्रण केंद्र असतात जे वर फिरणाऱ्या उपग्रहाची आटोमिक क्लॉकद्वारे अचूक वेळ, दिशा, कोन तसेच गति ठरवत असतो. अचूक लोकेशन दाखविण्यासाठी नियंत्रण केंद्र सर्व उपग्रहाच्या वेळेच तालमेळ बसवत असतो. एकंदरीत सर्व उपग्रहाच नियंत्रण जमिनीवरून होत असते. सध्या जीपीएसच नियंत्रण कक्ष अमेरिकेत आहे. याला 'मॉनिटर स्टेशन' असेही म्हणतात.
3. जीपीएस रिसिव्हर: तिसरं महत्वाचं उपकरण म्हणजे आपल्या मोबाईल किंवा कारच्या आत असलेली जीपीएस चिप म्हणजेच 'जीपीएस रिसिव्हर'. लाईव्ह लोकेशन बघण्यासाठी हा जीपीएस रिसिव्हर ' चालू असणे आवश्यक आहे. हा जीपीएस रिसिव्हर उपग्रहाकडून माहिती घेऊन 'ट्रीलेटेरेशन' पध्द्तीने निश्चित लोकेशन दाखवतो.
जीपीएस कसं काम करत ?
पृथ्वीवरील एखाद्या वस्तूचं लोकेशन आपल्याला माहित करून घेण्यासाठी जीपीएस 'ट्रीलेटेरेशन' या गणिती सिद्धांताचा उपयोग करत असतो. या पद्धतीत तीन माहित असलेल्या ठिकानारून चौथ्या वस्तूच लोकेशन आपल्याला माहित पडतं. येथे तीन वस्तू म्हणजे उपग्रहाच ठिकाण निश्चित असतं आणि चौथी वस्तू म्हणजे ज्याचं पृथ्वीवरील लोकेशन माहित करायचं आहे तो 'जीपीएस रिसिव्हर' असते. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अनेक उपग्रहापैकी कमीत कमी चार उपग्रहाच्या तरंग कक्षेत आपल्या मोबाईलचा 'जीपीएस रिसिव्हर' येतो. त्या चार उपग्रहाचे तीन वर्तुळाकार तरंग जेथे भेटतात ते ठिकाण म्हणजेच त्या वस्तूच लोकेशन होय. उपग्रहातून तरंग बाहेर निघून परत उपग्रहात आलेल्या तरंग लहरींच्या फरकाचा काळ [t] आणि लहरींच्या गती [c], समीकरण c=d/t यावरून उपग्रहाला त्या वस्तूच नेमकं अंतर[d=ct] कळतं. एकदा हे लोकेशन माहित पडलं की आपल्याजवळ असलेल्या मोबाईल किंवा कारच्या डॅशबोर्डवरील गुगल मॅपवर ते माहित होत. एव्हडच नाहीतर पृथ्वीपासून मोबाईलग्राहक किंवा जीपीएस रिसिव्हर किती उंचीवर आहे याचेही अंतर कळून जाते. अर्थात त्यासाठी आपल्या मोबाईलचा इंटरनेट व ' 'जीपीएस रिसिव्हर' चालू असणे आवश्यक असतं. कारण उपग्रह हे कायम आपल्या संपर्कात असतं. आज उपग्रह व विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जीपीएसद्वारे उपग्रह पृथ्वीवरील काही इंचाची हालचाल सहज टिपू शकतात.
गुगलला ट्राफिक कसं कळत ?
पूर्वी गुगल एखाद्या स्थळी आपण किती वेळेत पोहोचणार आणि जास्त रहदारी असेल तर किती वेळ लागणार याची माहिती जुन्या संग्रहित नोंदीवरून गुगल मॅपवर देत असे. अशाप्रकारे रहदारी दाखविण्याची जुनी पद्धत अचूक नव्हती. नवीन पद्धतीत करोडो मोबाईल जीपीएसद्वारे आपआपले लोकेशन गुगलला पाठवत असतात. या करोडो वेगवेगळ्या मोबाईलच्या लोकेशनच गुगल एनालिसिस करत असतं. मग मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची एका विशिष्ट रस्त्यावर होणारी हालचाल आणि गतीवरून त्या रस्त्यावर किती रहदारी आहे याचा गुगलला अंदाज येतो आणि तशी माहिती गुगल मॅपवर दिली जाते. तसेच एका मोबाईलच्या गतीची इतर हजारो मोबाईलच्या गतीशी तुलना करून गुगलला रहदारीचा एकूण अंदाज येत असतो. या गणितात जागोजागी थांबणाऱ्या स्कुलबससारख्या वाहनांना वगळण्यात येते. रस्ता रहदारीने जाम असेल तर गडद तांबडा, जास्त रहदारीच्या ठिकाणी तांबडा रंग, थोड्याकमी रहदारीच्या ठिकाणी भगवा आणि रस्ता रहदारीसाठी मोकळा असेल तर हिरवा रंग दाखविण्यात येतो.
जीपीएसचे सिग्नल हे फोनच्या सिग्नलपेक्षा कमजोर असतात. त्यामुळे पाण्याच्या खाली, झाडाच्या खाली किंवा गजबजलेल्या शहरी ठिकाणी बऱ्याचदा जीपीएस काम करत नाही. तसेच जीपीएसच्या साह्याने प्रवास करणाऱ्यानी आपला मोबाईल बॅटरी तसेच इंटरनेट डाटा कायम चार्जड ठेवावा लागतो. तसेच गरज पडल्यास वेगळा अँटेना लावू शकता. बऱ्याचदा वातावरणातील बदलामुळे जीपीएस चुकीची माहिती देऊ शकतो. तसेच वीजेंच्या कडकडाने, वातावरणातील इतर बदलामुळे जीपीएस चुकीच लोकेशन दाखवू शकतो
.
आजघडीला आपल्या देशात मोबाईल धारकाची संख्या हि देशाच्या लोकसंख्येइतकीच आहे. त्यामुळे साहजिकच जीपीएसचा वापर करणाऱ्यांची संख्या आता कमी नाही. असं असलं तरी संगणक आणि मोबाईल हाताळण्याच योग्य प्रशिक्षण, सराव नसल्या कारणाने जीपीएस वापरताना बऱ्याच चुका घडत असतात. तसेच बऱ्याच गाव-खेड्यातील तसेच राज्यमार्गाची दुरवस्था असल्याने, इंटरनेटची सोय, लोड-शेडिंगमुले जीपीएस खात्रीशीर सेवा देईलच याची शास्वती नसते. त्यामुळे पूर्णतः जीपीएसवरच अवलंबुन राहणे फायद्याचे नसते. गावखेड्यात फिरताना फक्त जीपीएसद्वारे प्रवास केल्यास कदाचित आपण नको त्या रानावनातील अरुंद गाडीवाटेमध्ये अडकण्याची शक्यता टाळता येत नाही. तसेच एकच नावाची अनेक गाव-खेडी जसेकी डीग्रस, माळेगाव, पिंपरी, लिंबी, असल्याने जीपीएसद्वारे प्रवास आपल्याला नको त्या भलत्याच गावी घेऊन जावू शकतो. किंवा इंग्रजीत टाईप केलेलं स्पेल्लींग समान असल्यामुळं आपण 'महड' च्या गणपतीऐवजी चवदार तळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'महाड' ला पोहचू शकतो. असे अनेक किस्से आपण ऐकलेच असणार, यात शंका नाही.
जीपीएस तंत्रज्ञानमुळे एखादं ठिकाण शोधणे, मनसोक्त फिरणे अगदी सोपं झालं आहे. उद्योगाचे अनेक द्वार त्यामुळं उघडले आहे. वेहीकल ट्रेकिंग, कुरियर ट्रेकिंगमुळे सुरक्षितता वाढून उद्योगाच्या बऱ्याच अडचणी कमी झाल्या आहेत. आज गरज आहे ह्या तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात तसेच उद्योग व्यवसायात योग्यप्रकारे उपयोग करून स्वतःची तसेच देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची.

-- प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com
'चतुर्थ स्थंब' ब्लॉगवर आपण इतरही लेख वाचू शकता.
[ हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही.]
© काॅपीराईट